Wednesday, May 22, 2019

नवीन भाजपप्रणीत सरकार व भाजपमध्ये सत्ताकेंद्रे विभागाण्याबाबत सर संघचालक मा.श्री.डॉ.मोहन भागवत यांना निवेदन तजी

संदर्भ -२०१९/निवडणुक निकाल /२६                                              दिनांक -२३ मे २०१९                                                     
प्रति ,


पुज्यनीय सर संघचालक 
मा.श्री.डॉ.मोहन भागवतजी  
महाल ,नागपुर 








संदर्भ -लोकसभा निवडणुका २०१९ चे निकाल . 
विषय -नवीन भाजपप्रणीत सरकार व भाजपमध्ये सत्ताकेंद्रे विभागाण्याबाबत .  
आदरणीय महोदय ,
सादर प्रणाम ,
मी विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आदीवासी भागातील सामाजिक कार्यकर्ता आहे व  मागील डिसेंबरमधे कांहीं राज्यातील निवडणुकीच्या निकालानंतर बोध घेवून भाजपचे नेतृत्व नितीन गडकरी यांना द्यावे अशी विनंती मी संघश्रेष्ठीना केली होती. त्यावेळी  नितीन गडकरी यांना भरपुर मानसीक त्रास झाला व होत आहे,ते हाडाचे कार्यकर्ते आहेत. त्यांना पदाची लालसा नाही, हे सत्य आता भारताला कळले आहे मात्र पुन्हा एकदा हा मुद्दा आपणासमोर सविनय चर्चेला ठेवत आहे कारण आज राष्ट्रीय स्तरावर भाजपमध्ये मा. अटलबिहारी वाजपेयी गेल्यानंतर एक सर्वांना सोबत घेऊन चालण्याची क्षमता असलेला समावेशक नेता भाजपने दिला नाही अशी गंभीर चर्चा होत आहे ,कारण आज राजकीय,सामाजिक,औदयोगिक, शिक्षण व धार्मिक क्षेत्रात विचारवंत परिस्थितीच्या दुराव्याने चिंतीत आहेत. ही विचारधारा संघ परिवारातही चर्चेत आहेत. मात्र अटलबिहारी वाजपेयी  यांच्या कार्यकाळात ही कटुता दिसत नव्हती, यावर संघाने गंभीरपणे विचार करण्याची गरज असल्यामुळे जनतेमध्ये काम करणारे व जनतेमधुन निवडणुक जिंकणारे नेते महत्वाच्या पदावर बसविण्याची गरज निर्माण झाली आहे. 
मोदी सरकारमध्ये  आर्थिक राजकीय , सामाजिक , औदयोगिक ,शिक्षण, ऊर्जा, व्यापार ,वाणिज्य ,विदेश संबंध  व धार्मिक क्षेत्रात धोरणात्मक निर्णय घेणारी चमू मागील दारेने  येणारी असल्यामुळे व जनतेमध्ये हिशोब देण्यासाठी जाणे गरजेचे नसल्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण होत होते संघ परीवारातील  व भाजपच्या तळागाळाच्या  कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्याच्या तक्रारी वारंवार येत होत्या  अशावेळी भाजपप्रणीत सरकार व भाजपमध्ये सत्ताकेंद्रे विभागणे ही काळाची गरज आहे,कारण व्यक्ती ही राष्ट्रापेक्षा व संघटनेपेक्षा मोठा होऊ शकत नाही. यावर यावेळी हा विचार  झालाच पाहीजे ही विनंती करण्यासाठी आपणास पात्र देत आहे . भाजपला आजच्या दैदित्यामान स्तरावर आणणाऱ्या कार्यकर्त्यांना यावेळी आपणच  न्याय देऊ शकतात, असे मला वाटते कारण ज्या भाजप नेत्यांनी  यांच्या अहोरात्र मेहनतीने देशात रस्ते व जल वाहतूक क्षेत्रात झालेल्या क्रांतिकारक विकासा च्या कामाची खुद काँग्रेस नेत्या सोनियाजी गांधी व लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मुक्त कंठाने तारीफ केली, अशा समावेशक- विकास पुरुष लोकनेत्याला धर्म व जातीच्या बंधनात  अडकविण्याचा सुरु असलेला  प्रयन्त, राष्ट्रीय राजकीय अस्थितेला आमंत्रण देणारा असल्याचे मला वाटते कारण देशात  सर्व समावेशक राजकारणाची सुरुवात संघ परिवाराने करावी ही काळाची गरज आहे.
आपला नम्र 
किशोर तिवारी, 
अध्यक्ष, 
विदर्भ जनआंदोलन समिती
९४२२१०८८४६