किशोर तिवारी करणार २३ ऑगस्टला पुरग्रस्त दुर्भा -सतपेल्ली भागाचा दौरा
दिनांक -२२ ऑगस्ट २०१८
पैनगंगेच्या पुराने झरी तालुक्यातील धानोरा दुर्भा दिग्रस सतपेल्ली वढोली या गावालगतच्या हजारो हेक्टर वरील उभे पीक खरडून गेल्याने तसेच धानोरा दुर्भा दिग्रस सतपेल्ली वढोली वस्तीतील घरे मोठ्याप्रमाणात नुकसानीच्या पाहणी करण्यासाठी कै वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी येत्या गुरुवार २३ ऑगस्टला पाहणी दौरा करणार असुन त्यांच्या सोबत जिल्हा परिषद सद्यस सुरेशभाऊ मानकर व मीनाक्षी सुरेश बोलेनवर दुर्भ्याचे सरपंच सतीशभाऊ नागले सुद्धा राहणार आहेत .
यावेळेस झरी तालुक्यातील पैनगंगेच्या नदीच्या पुरबुडीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी सोबतच दुर्भा येथे किशोर तिवारी यांचा येत्या २३ ऑगस्टला दुपारी ३ वाजता "सरकार आपल्या दारी कार्यक्रम "आयोजित करण्यात आला आहे .
झरी तालुक्यातील लिंगटी धानोरा दुर्भा दिग्रस सतपल्ली वाढोली परीसरातील शेतकऱ्यांच् या पुरबुडीचे नुकसान पीककर्ज वाटप,तसेच आदीवासी ,कोलाम पारधी, शेतकरी यांच्या कडुन आदिवासी विकास ,ग्राम विकास ,कृषी ,महसुल ,वन ,आरोग्य ,सहकार ,वीज ,सिचन ,शिक्षण ,पोलीस , अन्न सुरक्षा या विभागाच्या प्रचंड तक्रारी आल्यामुळे या विभागाच्या सर्व जिल्हा स्तरीय अधिकाऱ्यांसह तक्रारीचे समाधान करण्यासाठी कै वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांचा हा सरकार आपल्यादारी कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहीती आदीवासी नेते धर्माभाऊ आत्राम व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामलू इटवार यांनी दिली .
किशोर तिवारी २३ ऑगस्टला दुपारी २ वाजता धानोऱ्याला ३ वाजता दुर्भ्याला ३.३०वाजता दिग्रसला ४ वाजता सतपेल्लीला व ५ वाजता वढोलीला भेट देणार आहेत अशी माहीती दौऱ्याचे संयोजक दुर्भ्याचे सरपंच सतीशभाऊ नागले यांनी दिली .
No comments:
Post a Comment