किशोर तिवारी यांचा उमरी पठार येथील वृद्धाश्रमात ऐन दिवाळीत सरकार आपल्या दारी कार्यक्रम
दिनांक -४ नोव्हेंबर २०१८
उद्या ५ नोव्हेंबर सोमवारला शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी उमरी पठार तालुका आर्णी ,जिल्हा यवतमाळ येथील संत श्री डोला महाराज वृद्धाश्रमातील अडचणीच्या व समस्यांची सुनावणी
समाज कल्याण अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी ,जिल्हा जिल्हा अन्न पुरवडा अधिकारी यांच्या समवेत करणार आहेत . या वृद्धाश्रमात एकूण ९२ निराधार वृद्ध आहेत यामध्ये ४१ महिला तर ३६ पुरुष वृद्ध आहेत मात्र प्रशासनातील अधिकारी फक्त २४ वृद्धांची मान्यता असल्यामुळे यामधील अनेक वृद्धाना आरोग्य सुरक्षा ,अन्न सुरक्षा ,सामाजिक सुरक्षा सर्वोच न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत .समाज सेवक शेषराव डोंगरे मोबाईल नंबर ९३२६४४३४४७ मागील दोन दशकापासून अती दुर्गम शेतकरी आत्महत्याग्रस्त मागास भागात हा वृद्धाश्रम समाजाच्या सहकार्याने करीत असून यांना आपल्या आई वडिलांपेक्षाही चांगली राहण्याची खाण्याची आरोग्याची देखभाल करीत असुन या वृद्धाश्रमात फार दूरवरून वृद्धाची संख्या वाढतच असल्यामुळे नेर येथील समाजसेवक गणेशभाऊ राऊत यांनी वरील वृद्धाश्रमाच्या प्रकल्पाची माहीती किशोर तिवारी यांना दिल्यावर त्यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव दिनेशचन्द्रजी जैन यांना कल्पना दिल्यावर त्यांनी आपण त्या वृद्धाश्रमाला भेट देऊन आवश्यक सुचना सरकारला सादर करण्याची सूचना केली .
ही दिवाळी उपेक्षित कोलाम पारधी समाजासोबत राहून साजरी करण्याचा मानस असतांना धन तेरस ह्या दिवाळी सणाच्या पहील्या दिवशी वृद्धाश्रमातील वृद्धांसोबत आपल्या आईच्या मायेची पोकळी कमी करण्यासाठी आपला प्रयन्त असल्याचे तिवारी यांनी यावेळी सांगीतले . यावेळी ब्राम्हण समाजचे कार्यकर्ते समाज सेवक विलासभाऊ महाजन यांनी प्रत्येक वृद्धांना मायेची उब देण्यासाठी ब्लॅंकेट देण्याचा तसेच वणीयेथील आदीवासी सेवक डॉ महेंद्रभाऊ लोढा यांनी वृद्धाश्रमातील सर्व वृद्धांना साडी चोळी वा सदरा लुगडे देऊन दिवाळी साजरा करण्याची घोषणा यावेळी केली .
उद्या ५ नोव्हेंबर सोमवारला सर्व वृद्धांसोबत दुपारी ३ वाजता वृद्धाश्रमातील आजी-आजोबा यांना दिवाळी फराळ वाटप करून, त्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे ,आपला घरचा दिवाळी फराळ देऊन आपण या उपक्रमात सहभागी होऊ शकता यासाठी समाज सेवक शेषराव डोंगरे मोबाईल नंबर ९३२६४४३४४७ आपण संपर्क साधावा अशी विनंती आदीवासी कार्यकर्ते अंकित नैताम यांनी केली आहे . उमरी पठार हे जवळा तालुका आर्णी वरून ८ किलोमीटर आत आहे .
===========================================================
No comments:
Post a Comment