ठाणेदार अनिलसिंग गौतम यांची बदली हा दोन नंबरच्या मस्तवालांचा जनतेच्या अस्मीतेवर झालेला विजय -किशोर तिवारी
दिनांक -२८ फेबू. २०१९
मंत्रीपदा हुद्दा सरकारने दिलेल्या चळवळीच्या नेत्याने लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने चालू असलेला वरळी मटका जुगार भ्र्ष्ट पोलीस यंत्रणेसमोर व्हिडीओ शूटींग करून समाजाच्या वेशीवर टांगल्यानंतर सडलेली व कुचलेली व्यवस्था झोपेतुन जगल्याचे सोंग करते व लोकलाजेस्तव मस्तवाल ठाणेदाराची तात्काळ बदली करून अनिलसिंग गौतम सारख्या कर्तव्यवेड्या जिंदादिल माणसाची ठाणेदार म्हणून पांढरकवड्यात बदली करण्यात येते व एका रात्रीतुन सारे अवैद्य धंदे बंद होतात अख्ख्या जिल्ह्यात या घटनेचे प्रतिसाद उमटतात सगळीकडे शहरातीलच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात खेडयापाडयात दारू मटका गुटखा जवळपास बंद होतो यामुळे तालुक्यातील अवैध धंदे, दारू मटका गुटखा जुगार यावरील प्रतिदिन जवळपास दीड कोटी रुपये जनतेचे वाचणे सुरु होते ,विनाकारण जलणारा पेट्रोल डिझेल वरील खर्च कमी झाला, पूर्ण तालुक्यातील जनता रात्री १० वाजता घरी कुटूंबासोबत शांततेने राहतात ,शेतकरी शेतमजूर त्यांचे कुटुंब महिला मूले आनंदी व सुखी होतात म्हणूनच सर्व दोननंबरचे धंदे करणाऱ्या लोकांच्या पोटदुखीतून ठाणेदार गौतम यांच्या विरोधात आरोप कटकारस्थान करण्यात येते व फक्त ३८ दिवसात समाजाच्या सुखाकरीता तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचे राज्य पुनर्स्थापीत करणाऱ्या ठाणेदार अनिलसिंग गौतम यांच्या उचलबांगडी म्हणजे दोन नंबरच्या मस्तवालांचा राजकीय दिवाळखोरीला लागलेला नेत्यांच्या मदतीने सामान्य वंचीत उपेक्षित जनतेच्या अस्मितेवर विजय असल्याची जळजळीत प्रतिक्रिया कै वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे .
आपणास ही बदली निवडणूक आयोगाच्या सुधारीत सूचनांचा पालन करण्यास करण्यात आल्याचे सुरुवातीला सांगण्यात आहे मात्र यावर आपण निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना ठाणेदार गौतम यांच्या अभूतपूर्व कार्यशैलीची व पांढरकवडा परीसरात ३० दिवसात केलेल्या सुधारणेची माहीती दिल्यावर हा निवडणूक आयोगाच्या सूचनांचा पोटभरू अधिकाऱ्यांनी राजकीय दडपणाखाली झाल्याचे सांगण्यात आले त्यातच आपण मागील चार दिवसापासून तालुक्यात दौरे करीत असतांना मला प्रत्येक गावात दोनच दिवसात बंद झालेला दारू मटका गुटखा सुरु झाल्याची ओरड व तक्रारी करीत असुन दोन नंबरवाल्याची दलाली करणाऱ्या नेत्यांना शिव्या देण्यात येत असल्यामुळे आपले फिरणे कठीण झाले असल्याची खंत किशोर तिवारी यांनी व्यक्त केली असुन आता जनतेनी मशाली घेऊन या सर्व दोन नंबरचे धंदे करणारे त्यांच्या मदतीने राजकारण करणारे ढोंगी नेते यांना बदलल्याशिवाय परिस्थिती सुधारणार नाही असा इशाराही किशोर तिवारी यांनी यावेळी दिला .
मागील काही दिवसापासून संपूर्ण जिल्ह्यात अनिलसिंग गौतम यांना कोणत्याही परिस्थितीमधे आई पी एल क्रिकेट पूर्वी व निवडणुकीच्या जुगारापूर्वी याला कंट्रोल रूम ठेवा यासाठी डी आई जी पासुन सर्व भाडखाऊ नेत्यांना मोठी रक्कम देण्यात आल्याची चर्चा सुरु होती त्यातच पोलीस स्टेशन विक्रीचा सोहळा नुकताच पार पाडण्यात आल्याची माहीती पोलीस स्टेशन विकत घेण्यात कमी पडलेल्या पोलीस अधिकाऱ्याने आपणास दिली असल्याची माहीती किशोर तिवारी यांनी दिली असुन आपण हा सर्व प्रकार पंतप्रधान नरेंद्र मोदींना सादर करणार असून यासर्व नेत्यांची हकालपट्टी करा वा आम्हचा रामराम घ्या अशी निर्वाणीची विनंती करणार असल्याची माहीती किशोर तिवारी यांनी यावेळी दिली .
===============================================================================================================
No comments:
Post a Comment