Friday, January 31, 2020

केंद्रीय अर्थसंकल्पातील १६ कलमी कार्यक्रम एक धूळफेक -पत पुरवडा ,हमीभाव ,पीकविमा योजना सुधारणा बगल दिली -किशोर तिवारी

 केंद्रीय अर्थसंकल्पातील १६ कलमी कार्यक्रम एक  धूळफेक -पत  पुरवडा ,हमीभाव ,पीकविमा योजना सुधारणा बगल दिली -किशोर तिवारी 
नागपूर- १ फेबु २०२०
सध्या स्थुल घरगुती उत्पादनाचा (जी डी पी ) निर्देशांक घसरत असुन भारतात आर्थिक संकट वाढतच असुन केंद्रीय अर्थ मंत्र्यांनी यावर्षी अर्थ संकल्प सादर  केलेला  १६ कलमी कार्यक्रम एक धूळफेक   असून यामुळे  कृषी संकट वाढणार असुन याचे कारण मागील ६ वर्षातील सरकारच्या विकासाच्या व आर्थिक धोरणाचा चुका असुन यामुळे सर्वात जास्त संकट ग्रामीण क्षेत्रात आले असुन शेतकरी सर्वात जास्त आर्थिक अडचणीत आले आहे त्यामुळे सगळे व्यवसाय धोक्यात आले आहे व या आर्थिक आणीबाणीच्या वेळी फक्त कृषी क्षेत्रातील गुंतवतणूक वा मूळ धोरणात्मक बदल भारताला बाहेर काढू शकतो असा विश्वास प्रगट करीत येत्या केंद्रीय अर्थ संकल्पात कृषी क्षेत्रासाठी कमीतकमी ३ लाख कोटीचे राष्ट्रीय पॅकेज द्यावे  अशी आग्रहाची विनंती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना महाराष्ट्राच्या शेतकरी मिशनचे अध्यक्ष व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कृषी सल्लागार किशोर तिवारी यांनी केली होती मात्र   त्याला . संपूर्ण बगल देण्यात आल्याचे दुःख प्रगट करीत आंदोलनाचा ईशारा दिला आहे 

मागील सहा वर्षात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी क्षेत्रावर विषेय लक्ष देण्यासाठी शेतकऱ्यांचे उत्त्पन्न येत्या २०२२ पर्यंत दुपट्ट करण्याचा धाडसी कार्यक्रम जाहीर केला त्यासाठी त्यांनी लागवडीचा खर्च व शेतीमालाला रास्त भाव ,बाजारात होणारी लुबाडणूक रोखण्यासाठी तसेच पेरणीपूर्वी पासुन बाजारात विक्रीपर्यंत पूर्ण  संरक्षण देणारी विमा योजना ,बँकांनी शेतीसाठी सुमारे १३ लाख कोटीचे पिककर्ज शेतकऱ्यांच्या दारावर जाऊन देण्याचा कार्यक्रम राबविला त्यामध्ये डॉ स्वामिनाथन यांच्या बहुतेक सर्व शिफारशी लागू करण्याच्या दावा सुद्धा करण्यात आला मात्र याचा परीणाम विपरीत झाला देशातील सर्व प्रकारचे शेतकरी मागील ६ वर्षात कंगाल झाले त्यामुळेपंजाब, तेलंगणा, आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश एम.पी., महाराष्ट्र यासारख्या पुरोगामी राज्यांनी  २ लाख कोटींपेक्षा जास्त कृषी कर्जमाफी या सहा वर्षात दिली त्याच्या जोडीला  स्थानिक अनुदान आणि मदत पॅकेजवर सुमारे  २ लाख कोटी राज्याच्या तीजोरीतून खर्च केला त्यासोबत राष्ट्रीय आपदा प्रबंधन निधीमधून केंद्राने या राज्यांना सुमारे ३ लाख कोटी या वर्षात दिले त्याच बरोबर विमा कंपन्यांना राज्यांनी तसेच केंद्रांनी सुमारे २ लाख  खिशात कोंबले त्याचवेळी या सहावर्षात कृषी व ग्रामीण क्षेत्रातील विविध सिंचनसह सर्व योजनांच्या नावावर सुमारे ११ लाख कोटी रुपयांची  खैरात वाटण्यात आली मात्र चुकीच्या नियोजनामुळे व योजनाचा केंद्रबिंदू कृषीउद्योग ,ग्राहक व बँकांचे हित असल्यामुळे सारा पैसा पाण्यात गेला व आज कृषिक्षेत्र सर्वात जास्त संकटात आला आहे  त्यामुळे येत्या केंद्रीय अर्थसंकल्पात या क्षेत्रातील अभ्यास असणाऱ्या समाजातील सर्व राजकीय विचारांच्या व क्षेत्रातल्या व्यक्तींना बोलावून सल्ला घेण्यात यावा अशी विनंती किशोर तिवारी यांनी केली होत्री मात्र १`६ कलमी कार्यक्रम देतांना त्याच चुका केल्याचा अनुभव पुन्हा आला आहे 

भारताचे विद्यमान अर्थमंत्री यांना भारताच्या ग्रामीण अर्थिक क्षेत्रातील अनुभव तसाच त्यांनी वाणिज्य मंत्री म्हणून घेतलेल्या प्रचंड आयातीच्या निर्णयामुळे  डाळ उत्पादक क्षेत्रातील शेतकऱ्यांना  प्रचंड नुकसानीचा सामना करावा लागला तसेच त्यांच्या सतत  गैर-व्यावसायिक कामकाजामुळे देशाच्या  आर्थिक संकटाकडे पाहण्याचा द्रुष्टीकोन समुळ बदलणे अत्यंत गरजेचे असुन आज बँकिंग, आयात-निर्यात, विकास आणि कमकुवत पायाभूत सुविधा आणि पर्यावरणीय मुद्द्यांमध्ये घेण्यात आलेल्या चुकीच्या धोरणांचा परिणाम आहे परंतु या सरकारने वारंवार दिलेले सर्व पॅकेज  अयशस्वी ठरले आहे फक्त आता कृषी क्षेत्रात पॅकेज सोबतच  आयात निर्यात, थेट गुंतवणूकीसाठी आरबीआय ला निर्देश राज्य  नियंत्रित शेती पत धोरण व नफा न देणारे सदोष कृषी समर्थन मूल्य एम एस पी  सध्याच्या धोरणामध्ये व   कार्यक्रमांमध्ये  बदल होणे आवश्यक होता मात्र अर्थ संकलपात याला  धारा देण्यात  आली नाही असा आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे 

यापुर्वी प्रमुख मागण्यांमध्ये - कापूस तूर आणि सोयाबीनसाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) उत्पादन खर्चाच्या खऱ्या  १५० टक्क्यांच्या नफ्यासह करणे  शेतकर्‍यांचे सर्व प्रकारचे थकीत कृषी कर्ज केंद्राकडून माफ करून नवीन पीक कर्ज देण्याचा कायदा करणे , शेती आणि सिंचन क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान आणन्यासाठी शेतकर्‍यांना आर्थिक मदत आणि १०० टक्के अनुदानावर शेतीसाठी कुंपण ,गावासाठी वखार ,तारणासाठी बँकेचे कवच तसेच कृषीमालाच्या हमीभावाच्या हमी देण्यासाठी केंद्राचा विषेय कृषिमाल स्थावर निधी  करण्याची  गरज असुन यामुळे  शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्यांना लांब पल्ल्याच्या सकारात्मक विकासाच्या योजना लागु करण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करावा अशी  विनंती किशोर तिवारी होती मात्र त्याला   अर्थमंत्रानी केराची टोपली दाखविली याचे दुःख यावेळी प्रगट केले 

================================================

किशोर तिवारी यांच्याशी संपर्क साधण्याकरिता 


 मोबाइल -09422108846

Tuesday, January 28, 2020

महाराष्ट्रातही विधान परिषद बरखास्त करा - किशोर तिवारी

आंध्राप्रमाणे  महाराष्ट्रातही विधान परिषद बरखास्त करा-किशोर तिवारी 
दिनांक - २९ जानेवारी २०२०

आंध्र प्रदेश राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने सोमवारी विधान परिषद बरखास्त करण्याचा ठराव संमत केला. असाच ठराव आता विधानसभेतही मंजूर केला जाणार असून, त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी तो ठराव नंतर केंद्र सरकारकडे पाठविला जाणार आहे यापुर्वी जम्मू आणि काश्मीरची विधानपरिषद नुकतीच बरखास्त झाली आहे. आसाम, मध्य प्रदेश, पंजाब, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यांनी पहिलेच  बरखास्त केली आहे सध्या जेमतेम सात राज्यात विधान परीषद अस्तित्वात आहे सध्या या वरच्या सभागृहात येण्यासाठी जो प्रकार सुरु आहे त्याला पाहता  घटनेच्या ३०८ कलमाखाली आर्टिकल १६९(१) अन्वये जर जनतेच्या प्रतिनिधींना दुसरे सभागृह म्हणजे विधान परिषद हवे असेल किंवा नको असेल, तर तसा २/३ मतांनी ठराव पास करून बरखास्त करावे अशी मागणी शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे कृषी सल्लागार शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी केली आहे . सध्या यवतमाळमध्ये विधान परिषदेचा निवडणुकीमध्ये जो खुला घोडेबाजार सुरु आहे त्यामुळे व्यथित होऊन आपण हि मागणी रेटत असल्याचा व हे आपले व्यक्तिगत मत असल्याचं  खुलासा किशोर तिवारी यांनी केला आहे . 

आजकल वरचे सभागृह जनतेनी नाकारलेले काळापैसा असणारे दलाली व चमचेगिरी करणारे नेत्यांसाठी जनमान्यतेचा मार्ग झाला आहे बहुतेक सर्व राजकीय पक्ष या वरच्या सभागृहाच्या बहुमताचा फायदा घेत सत्ताधारी लोकनियुक्त सरकारला अडचणीत आणण्यासाठी करतात तर अनेक वरच्या सभागृहाचे सदयस अनेक गोरखधंदे खुले आम करतात अनेक समाजकंटक व  चोर काळ्या पैशाच्या आधारे खासदार आमदार कधी कधी मंत्रीही होतात त्यामुळे यावर चर्चा करण्यात यावी  यासाठी ही मागणी करीत असल्याचा खुलासा किशोर तिवारी यांनी केला आहे . 

यापूर्वी  ‘विधान परिषद बरखास्त करा’ असा १९५३ मध्ये मुंबई असेंब्लीत असा ठराव विधानसभेने केला होता. एवढेच नाही तर तो ठराव संसदेच्या मान्यतेसाठी लोकसभेला पाठविण्यातही आला होता. परंतु तो ठराव पुढे संसदेत मान्यतेसाठी ठेवण्यातच आला नाही. त्यामुळे तो संमत होण्याचा प्रश्नच राहिला नाही.त्यानंतर १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर १९६१ मध्ये विधान परिषद बरखास्त करावी असा ठराव आला होता खरा, पण तो पुरस्कारला गेला नाही.

 महाराष्ट्रात विधान परिषद १९३७ मध्ये अस्तित्वात आली. मुंबई प्रांत असताना विधान परिषदेची स्थापना झाली होती. २० जुलै १९३७ रोजी राज्य विधान परिषदेची पहिली बैठक ही पुण्यात झाली होती. स्वातंत्र्यपूर्व काळात १९३९ ते १९४६ या काळात विधान परिषद निलंबित अवस्थेत ठेवण्यात आली होती. १९८७ मध्ये राज्य विधान परिषदेचा सुवर्ण महोत्सव साजरा झाला होता. अन्य राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही अधूनमधून विधान परिषद  बरखास्तीची मागणी होऊ लागली  किंवा अशी चर्चा किंवा कुजबुज सुरू व्हायची. पण महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर विधान परिषद कधी बरखास्त झाली नाही किंवा तसा ठरावही विधानसभेत करण्यात आलेला नाही मात्र आता यावर विधान  सभेत एकदा खुली चर्चा करा व विधान परिषदेच्या आमदारांच्या निवडीमध्ये होत असलेला नंगानाज समोर आना अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे .
===============================