आंध्राप्रमाणे महाराष्ट्रातही विधान परिषद बरखास्त करा-किशोर तिवारी
दिनांक - २९ जानेवारी २०२०
आंध्र प्रदेश राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने सोमवारी विधान परिषद बरखास्त करण्याचा ठराव संमत केला. असाच ठराव आता विधानसभेतही मंजूर केला जाणार असून, त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी तो ठराव नंतर केंद्र सरकारकडे पाठविला जाणार आहे यापुर्वी जम्मू आणि काश्मीरची विधानपरिषद नुकतीच बरखास्त झाली आहे. आसाम, मध्य प्रदेश, पंजाब, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यांनी पहिलेच बरखास्त केली आहे सध्या जेमतेम सात राज्यात विधान परीषद अस्तित्वात आहे सध्या या वरच्या सभागृहात येण्यासाठी जो प्रकार सुरु आहे त्याला पाहता घटनेच्या ३०८ कलमाखाली आर्टिकल १६९(१) अन्वये जर जनतेच्या प्रतिनिधींना दुसरे सभागृह म्हणजे विधान परिषद हवे असेल किंवा नको असेल, तर तसा २/३ मतांनी ठराव पास करून बरखास्त करावे अशी मागणी शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे कृषी सल्लागार शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी केली आहे . सध्या यवतमाळमध्ये विधान परिषदेचा निवडणुकीमध्ये जो खुला घोडेबाजार सुरु आहे त्यामुळे व्यथित होऊन आपण हि मागणी रेटत असल्याचा व हे आपले व्यक्तिगत मत असल्याचं खुलासा किशोर तिवारी यांनी केला आहे .
आजकल वरचे सभागृह जनतेनी नाकारलेले काळापैसा असणारे दलाली व चमचेगिरी करणारे नेत्यांसाठी जनमान्यतेचा मार्ग झाला आहे बहुतेक सर्व राजकीय पक्ष या वरच्या सभागृहाच्या बहुमताचा फायदा घेत सत्ताधारी लोकनियुक्त सरकारला अडचणीत आणण्यासाठी करतात तर अनेक वरच्या सभागृहाचे सदयस अनेक गोरखधंदे खुले आम करतात अनेक समाजकंटक व चोर काळ्या पैशाच्या आधारे खासदार आमदार कधी कधी मंत्रीही होतात त्यामुळे यावर चर्चा करण्यात यावी यासाठी ही मागणी करीत असल्याचा खुलासा किशोर तिवारी यांनी केला आहे .
यापूर्वी ‘विधान परिषद बरखास्त करा’ असा १९५३ मध्ये मुंबई असेंब्लीत असा ठराव विधानसभेने केला होता. एवढेच नाही तर तो ठराव संसदेच्या मान्यतेसाठी लोकसभेला पाठविण्यातही आला होता. परंतु तो ठराव पुढे संसदेत मान्यतेसाठी ठेवण्यातच आला नाही. त्यामुळे तो संमत होण्याचा प्रश्नच राहिला नाही.त्यानंतर १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर १९६१ मध्ये विधान परिषद बरखास्त करावी असा ठराव आला होता खरा, पण तो पुरस्कारला गेला नाही.
महाराष्ट्रात विधान परिषद १९३७ मध्ये अस्तित्वात आली. मुंबई प्रांत असताना विधान परिषदेची स्थापना झाली होती. २० जुलै १९३७ रोजी राज्य विधान परिषदेची पहिली बैठक ही पुण्यात झाली होती. स्वातंत्र्यपूर्व काळात १९३९ ते १९४६ या काळात विधान परिषद निलंबित अवस्थेत ठेवण्यात आली होती. १९८७ मध्ये राज्य विधान परिषदेचा सुवर्ण महोत्सव साजरा झाला होता. अन्य राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही अधूनमधून विधान परिषद बरखास्तीची मागणी होऊ लागली किंवा अशी चर्चा किंवा कुजबुज सुरू व्हायची. पण महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर विधान परिषद कधी बरखास्त झाली नाही किंवा तसा ठरावही विधानसभेत करण्यात आलेला नाही मात्र आता यावर विधान सभेत एकदा खुली चर्चा करा व विधान परिषदेच्या आमदारांच्या निवडीमध्ये होत असलेला नंगानाज समोर आना अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे .
===============================
No comments:
Post a Comment