कांदा महाग झाल्याचे कारण हा महागाई नाही तर हा निर्सगाचा प्रकोप-साऱ्या भारताला स्वस्त कांदा महाराष्ट्र महिन्याभरात देणार -किशोर तिवारी
दिनांक -६ डिसेंबर २०१९
कांद्याचा नापिकीमुळे झालेल्या तुटीमुळे वाढलेल्या किमतींचा राजकीय पक्षांनी सुरु केलेली ओरड कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आयातीत कांद्यामुळे प्रचंड आर्थिक संकटात आणू शकते व एक ही राष्ट्रीय विपदा मद्यम वर्गीय ग्राहकांवर आली असुन अनेक गरीबांचे बळी पडतील देश आर्थिक संकटात येणार असा समज पसरू नका फक्त महीना दीड महिन्यात लासलगाव नाशीकचा कांदा भारताचा बाजारात येणार हे निश्चित असुन सध्याची प्रचंड दार वाढ साठेबाज करीत असुन शहरातील जनतेनी आपली ओरड कमी करून सहकार्य करावे कारण भारत सरकारने स्वस्त भावाचा कांदा पाकीस्थान मधुन मोठ्या प्रमाणात आणला तर जानेवारी नंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आपला कांदा व्यापाऱ्यांना मोतीमोल भावात विकून आत्महत्या कराव्या लागतील तरी आपल्या कांडा भाववाढ याला राष्ट्रोय संकटाचे स्वरूप न देता शेतकऱ्यांना सहकार्य करावे असे आव्हान शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी केले आहे
आपल्या निवेदनात कांद्याचे संकट हे दिवाळी दरम्यान झालेल्या अकाली पाऊसामुळे असुन यामध्ये महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचे सुमारे ४० हजार कोटींचे उभे पीक नष्ट झाले आहे व याचा भारत सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणाचा संबंध नसुन महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आपल्या फक्त १० टक्के उरलेल्या कांद्याला थोडा भाव मिळत असल्यामुळे ग्राहक संघटना सहकार्य करीत आहेत फक्त मूठभर माध्यमांनी साऱ्या मध्यम वर्गीयांचा ठेका घेत सतत कांदा हा विषय लावून धरला आहे ही ओरड करणाऱ्यांनी जैन बांधवांचा सल्ला घ्यावा कारण युगाणयुगे ते कांदा लसूण शिवाय जगतायेत अनेक समाजात चार चार महीने कांदा न खाता सहज जगतात व त्यांचे विकारही कमी होतात आता सर्वच धर्मीय शेतकऱ्यासाठी आम्हीही कांद्याशिवाय वा कमी कांद्याने जगू शकतो न दाखून दिले आहे कारण आजकाल एका कुटुंबाला महिन्यात जास्तीत जास्त ५ किलो कांदा लागतो आणि बजेट ६० रुपये कांदा या भावाने केले असेल तर कांदा फक्त ३ किलो खरेदी करा वाढलेलं बजेट सौदर्य प्रसाधन सिनेमा हॉटेल आणि इतर खर्च करून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे रहा फक्त हे दोन महिन्यासाठी आहे पुढे रब्बी चा कांदा आला की कांद्याचे भाव जेमतेम २० रुपये होतील असा विश्वास किशोर तिवारी यांनी व्यक्त केला आहे .
जेव्हा कांदा २० रुपये किलोच्या खाली होतो तेव्हा शेतकरी सतत तोट्यात असतो कांही तोटा आज कमी होतोय तर ही ओरड करण्याचे मोठे निमित्त दिसत नाही कारण शेती ही चॅरिटी नाही सतत तोट्यात असलेला व्यवसाय आहे हे मान्य करावयाला पाहीजे सद्याची भाववाढ ही निर्सगाचा प्रकोपामुळे केवळ मागणी आणि पुरवठा यामध्ये दोन महिन्याकरिता झाली आहे हे लक्षात घेण्याची गरज असल्याचे किशोर तिवारी म्हटले आहे कांदा ही जीवनाव्यशक वस्तू आहे आहे हा यावर खुली चर्चा करण्याचे आवाहन किशोर तिवारी यांनी केले आहे .
कांदा झाला नाहीतर गरिबांचे काय होईल याची चिंता करणाऱ्या सरकारने कांद्यावर सरळ १०० टक्के अनुदान द्यावे कारण आपलं बजेट सांभाळून चटणी भाकरी खाऊन आनंदी असतात त्यामुळे विवेकशील ग्राहकांनी मूठभर लोकांनी प्रसिद्धीसाठी सुरु केलेल्या कांगावा नजरअंदाज करावा अशी विनंती शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी केली आहे .
============================== ==================
No comments:
Post a Comment