Sunday, November 4, 2018

किशोर तिवारी यांचा उमरी पठार येथील वृद्धाश्रमात ऐन दिवाळीत सरकार आपल्या दारी कार्यक्रम

किशोर तिवारी यांचा  उमरी पठार येथील वृद्धाश्रमात ऐन दिवाळीत सरकार आपल्या दारी कार्यक्रम 
दिनांक -४ नोव्हेंबर २०१८
उद्या ५ नोव्हेंबर सोमवारला शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी उमरी पठार तालुका आर्णी ,जिल्हा यवतमाळ येथील संत श्री डोला महाराज वृद्धाश्रमातील अडचणीच्या व समस्यांची सुनावणी

समाज कल्याण अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी ,जिल्हा  जिल्हा अन्न पुरवडा अधिकारी यांच्या समवेत  करणार  आहेत . या   वृद्धाश्रमात  एकूण ९२ निराधार  वृद्ध आहेत यामध्ये ४१ महिला तर ३६  पुरुष वृद्ध आहेत मात्र प्रशासनातील अधिकारी फक्त २४ वृद्धांची मान्यता असल्यामुळे   यामधील अनेक  वृद्धाना आरोग्य सुरक्षा ,अन्न सुरक्षा ,सामाजिक सुरक्षा सर्वोच न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत .समाज सेवक शेषराव डोंगरे  मोबाईल नंबर ९३२६४४३४४७ मागील दोन दशकापासून अती दुर्गम शेतकरी आत्महत्याग्रस्त मागास भागात हा वृद्धाश्रम समाजाच्या सहकार्याने करीत असून यांना आपल्या  आई वडिलांपेक्षाही चांगली राहण्याची खाण्याची आरोग्याची देखभाल करीत असुन या वृद्धाश्रमात फार दूरवरून  वृद्धाची संख्या वाढतच असल्यामुळे नेर येथील समाजसेवक गणेशभाऊ राऊत यांनी वरील वृद्धाश्रमाच्या प्रकल्पाची माहीती किशोर तिवारी यांना दिल्यावर त्यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव दिनेशचन्द्रजी जैन यांना कल्पना दिल्यावर त्यांनी आपण त्या वृद्धाश्रमाला भेट देऊन आवश्यक सुचना सरकारला सादर करण्याची सूचना केली . 
ही दिवाळी उपेक्षित कोलाम पारधी समाजासोबत राहून साजरी करण्याचा मानस असतांना धन तेरस ह्या दिवाळी सणाच्या पहील्या दिवशी वृद्धाश्रमातील वृद्धांसोबत आपल्या आईच्या मायेची पोकळी कमी करण्यासाठी आपला प्रयन्त असल्याचे तिवारी यांनी यावेळी सांगीतले . यावेळी ब्राम्हण समाजचे कार्यकर्ते समाज सेवक विलासभाऊ महाजन यांनी प्रत्येक वृद्धांना मायेची उब देण्यासाठी ब्लॅंकेट  देण्याचा तसेच वणीयेथील आदीवासी सेवक डॉ महेंद्रभाऊ लोढा यांनी  वृद्धाश्रमातील सर्व वृद्धांना साडी चोळी वा सदरा लुगडे देऊन दिवाळी साजरा करण्याची घोषणा यावेळी केली . 
उद्या ५ नोव्हेंबर सोमवारला सर्व वृद्धांसोबत दुपारी ३ वाजता वृद्धाश्रमातील आजी-आजोबा यांना दिवाळी फराळ वाटप करून, त्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे ,आपला घरचा दिवाळी फराळ देऊन आपण या उपक्रमात सहभागी होऊ शकता यासाठी समाज सेवक शेषराव डोंगरे  मोबाईल नंबर ९३२६४४३४४७ आपण संपर्क साधावा अशी विनंती आदीवासी कार्यकर्ते अंकित नैताम यांनी केली आहे . उमरी पठार हे जवळा तालुका आर्णी वरून ८ किलोमीटर आत आहे . 
===========================================================

Saturday, October 27, 2018

Maha Agri Task Force Chief Pulls up firm for Load-Shedding- Press Trust of India

Maha Agri Task Force Chief Pulls up firm for Load-Shedding- Press Trust of India 
 October 27, 2018 Last Updated at 19:55 IST 
https://www.business-standard.com/article/pti-stories/maha-agri-taskforce-chief-pulls-up-firm-for-load-shedding-118102700638_1.html

Farm activist Kishor Tiwari Saturday lashed out at state-run Maharashtra State Electricity Board's power distribution arm for "undeclared load-shedding" here which he claimed was causing immense loss to farmers. Tiwari is the chairman of the Vasantrao Naik Sheti Swavalamban Mission, a special taskforce set up by the state government to look into agricultural issues and curb farmers' suicides in 14 districts in Maharashtra. 
Speaking to reporters, Tiwari said that power-cuts, which last for over 10 hours daily, were depriving farmers of benefits of state-run schemes like Jalyukt Shivar, a water conservation project that involves deepening and widening of streams, construction of cement and earthen stop dams and digging of farm ponds. "The MSEDCL (Maharashtra State Electricity Distribution Company Limited) officials are indifferent to the problems of farmers despite the state government's promise of uninterrupted electricity supply for 12 hours a day for agricultural purposes, Officials are not replacing defunct transformers for several weeks," Tiwari said. 

He claimed farmers are set to lose crops over an area of 10,000 hectares and face monetary loss of up to Rs 2,000 crore due to load-shedding. He was speaking here after touring villages in Ghatanji tehsil. 
The power firm's officials could not be contacted despite repeated attempts.
======================================

Wednesday, August 22, 2018

किशोर तिवारी करणार २३ ऑगस्टला पुरग्रस्त दुर्भा -सतपेल्ली भागाचा दौरा

किशोर तिवारी करणार २३ ऑगस्टला पुरग्रस्त दुर्भा -सतपेल्ली भागाचा दौरा 
दिनांक -२२ ऑगस्ट २०१८
पैनगंगेच्या पुराने झरी तालुक्यातील धानोरा दुर्भा दिग्रस सतपेल्ली वढोली या गावालगतच्या हजारो हेक्टर वरील उभे पीक खरडून गेल्याने तसेच धानोरा दुर्भा दिग्रस सतपेल्ली वढोली वस्तीतील घरे मोठ्याप्रमाणात नुकसानीच्या पाहणी करण्यासाठी कै वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी येत्या गुरुवार २३ ऑगस्टला पाहणी दौरा करणार असुन त्यांच्या सोबत जिल्हा परिषद सद्यस सुरेशभाऊ मानकर व  मीनाक्षी सुरेश बोलेनवर  दुर्भ्याचे सरपंच सतीशभाऊ नागले सुद्धा राहणार आहेत . 
 यावेळेस  झरी तालुक्यातील पैनगंगेच्या नदीच्या पुरबुडीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी सोबतच दुर्भा   येथे किशोर तिवारी यांचा येत्या २३ ऑगस्टला  दुपारी ३ वाजता  "सरकार आपल्या दारी कार्यक्रम "आयोजित करण्यात आला आहे  . 
झरी    तालुक्यातील लिंगटी धानोरा दुर्भा दिग्रस सतपल्ली वाढोली परीसरातील  शेतकऱ्यांच्या पुरबुडीचे नुकसान पीककर्ज वाटप,तसेच  आदीवासी ,कोलाम पारधी, शेतकरी यांच्या कडुन आदिवासी विकास ,ग्राम विकास ,कृषी ,महसुल ,वन ,आरोग्य ,सहकार ,वीज ,सिचन ,शिक्षण ,पोलीस , अन्न  सुरक्षा या विभागाच्या प्रचंड तक्रारी आल्यामुळे या विभागाच्या सर्व जिल्हा स्तरीय अधिकाऱ्यांसह तक्रारीचे  समाधान करण्यासाठी कै वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांचा  हा  सरकार आपल्यादारी कार्यक्रम  आयोजित करण्यात आल्याची माहीती आदीवासी नेते धर्माभाऊ आत्राम व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामलू इटवार यांनी दिली  . 
किशोर तिवारी २३ ऑगस्टला दुपारी २ वाजता धानोऱ्याला ३ वाजता दुर्भ्याला ३.३०वाजता दिग्रसला ४ वाजता सतपेल्लीला व ५ वाजता  वढोलीला भेट देणार आहेत अशी माहीती दौऱ्याचे संयोजक दुर्भ्याचे सरपंच सतीशभाऊ नागले यांनी दिली . 

Saturday, August 18, 2018

घुबडी तालुका केळापूर येथे किशोर तिवारी यांचा येत्या २१ ऑगस्टला   "सरकार आपल्या दारी कार्यक्रम "
दिनांक -१९ ऑगस्ट २०१८
केळापूर तालुक्यातील चनाका ,कोदोरी ,कारेगाव ,हिवरी ,रूढा,घुबडी,वळवाट,खैरी,पिठापोंगरी, पिंपळशेंडा ,अर्ली 
परीसरातील शेतकऱ्यांच्या वन्यप्राणी ,पीककर्ज माफी  पीककर्ज वाटप,तसेच  आदीवासी ,कोलाम पारधी, शेतकरी यांच्या कडुन आदिवासी विकास ,ग्राम विकास ,कृषी ,महसुल ,वन ,आरोग्य ,सहकार ,वीज ,सिचन ,शिक्षण ,पोलीस , अन्न  सुरक्षा या विभागाच्या प्रचंड तक्रारी आल्यामुळे या विभागाच्या सर्व जिल्हा स्तरीय अधिकाऱ्यांसह तक्रारीचे  समाधान करण्यासाठी कै वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांचा   सरकार आपल्यादारी कार्यक्रम   येत्या २१ ऑगस्टला दुपारी ४ वाजता  घुबडी येथे आयोजित करण्यात आला  आहे.  महाराष्ट्र सरकारच्या बळीराजा चेतना  अभियानाचा एक भाग म्हणून ग्रामीण जनतेच्या विकासाच्या व   लोककल्याणाच्या  योजना राबविणाऱ्या विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांना गावाच्या चावडी हजर करून सर्व  तक्रारीचे समाधान करण्यासाठी  असा अभिनव उपक्रम शेतकरी मिशन तर्फे  आयोजित करण्यात येत असुन हळुहळु सर्व राजकीय पक्षाच्या व सामाजिक संघटनांच्या सहकार्याने या मोहीमेला गती आली असुन  व जिल्हा प्रशासनाने अशा  कार्यक्रमाचे संपुर्ण नियोजन करण्यास पुढाकार घेतला असल्यामुळे सर्व विभागाचे अधिकारी या  सरकार आपल्यादारी कार्यक्रमाला उपस्थित रहात असल्यामुळे एक चळवळ म्हणुन समोर येत आहे . 
या सरकार आपल्या दरबारी कार्यक्रमात खालील   विषयाच्या तक्रारीचे समाधान करण्यात येणार आहे त्यामध्ये   आदिवासी विकासच्या  कोलाम घरकुल योजना , समाज मंदिर ,युवा रोजगार ,कौशल्य विकास ,आदिवासी विभागाच्या या भागातील कोलाम व पारध्यांना मिळालेला लाभ ,विषारी पिण्याच्या पाण्याची समस्या ,  ग्राम विकास विभागाच्या  घरकुल ,ग्राम विकास योजनांचा या भागातील जनतेला  मिळालेला लाभ , 

         कृषी विभागाच्या योजनांचा या भागातील आदिवासी ,कोलाम व पारध्यांना मिळालेला लाभ , बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतकऱ्यांच्या समस्या ,कर्जमाफीच्या योजनांचा या भागातील शेतकऱ्यांना मिळालेला लाभ,महसूल -या जनतेला  घराचे व शेताचे मालकीचे पट्टे देण्याचे सर्व प्रकरण ,वन्य प्राण्याचा त्रासामुळे रोजगार गमावलेल्याना नुकसान भरपाई ,या जनतेला गॅस जोडणी ,वन रोजगार ,सिंचन विभागाच्या    केळापूर   तालुक्यातील चनाका ,कोदोरी ,कारेगाव ,हिवरी ,रूढा ,अर्ली   परीसरातील शेतकऱ्यांच्या समस्या ,वीज विभागाच्या   केळापूर   तालुक्यातील चनाका ,कोदोरी ,कारेगाव ,हिवरी ,रूढा ,अर्ली  परीसरातील वीज जोडणी ,वीज पुरवढा या विषयी  समस्या ,शिक्षण - केळापूर   तालुक्यातील चनाका ,कोदोरी ,कारेगाव ,हिवरी ,रूढा ,अर्ली   परीसरातील जनतेच्या  शिक्षणाच्या सवलती व लाभ ,पोलीस प्रशासनाची   केळापूर   तालुक्यातील चनाका ,कोदोरी ,कारेगाव ,हिवरी ,रूढा ,अर्ली  परीसरातीलवरळी मटका व कोंबडा बाजाराचा होत असलेला त्रास  ,दारू विक्रीचा हैदोस रोखण्यासाठी उपाययोजना उपाययोजना ,  अन्न सुरक्षा विभागच्या   उच्चं न्यायालयाचा आदेश नुसार या भागातील गरीब ,कोलाम व पारध्यांना अंत्योदय योजनेपासून वंचित ठेवणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यावर केलेल्या कारवाईचा अहवाल तसेच  सहकार विभागाच्या कर्जमाफी पासुन  वंचित असलेल्या या भागातील शेतकऱ्यांची  यादीमध्ये असलेला घोळ दूर करणे ,स्टेट बँक  पाटणबोरीमध्ये तीन तीन चकरा मारूनही नवीन पीककर्ज  वाटपामध्ये होत असलेल्या विलंबावर त्यासोबतच अर्ली प्राथमिक  आरोग्यकेंद्राच्या समस्यावर जनसुनवाई यावेळी किशोर तिवारी करणार आहेत .  या घुबडी  येथील  सरकार आपल्यादारी कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जी. प. पाटणबोरीचे प्रतिनिधीप्रतिनिधी गजुभाऊ बेजंकीवार ,आदिवासी  नेते अंकित नैताम हिवरीचे शिवारेड्डी घुबडीचे गंगारेड्डी तर अर्लीचे नरेंद्र रेड्डी सहभागी होणार आहे 
==========================

Monday, April 2, 2018

मुकींदपूर -पारधी बेड्यावर सर्व पारधी समाजाला अंत्योदय योजनेत अन्न वाटप सुरु - शेतकरी मिशनच्या पाठपुरावा

मुकींदपूर -पारधी बेड्यावर सर्व   पारधी समाजाला  अंत्योदय योजनेत  अन्न वाटप सुरु - शेतकरी मिशनच्या पाठपुरावा 

दिनांक -२ एप्रिल २०१८
उच्चंन्यायालयाच्या आदेशाची सतत पायमल्लीकरून यवतमाळ जिल्ह्यातील हजारो  कोलाम पारध्यांना अंत्योदय योजनेपासून वंचित ठेवण्याच्या सर्व नागरी पुरवडा विभागाच्या सर्व जबाबदार  अधिकाऱ्यांवर आदिवासी अत्याचार नियंत्रण कायद्याखाली सरकारने कारवाई आदेश  स्व वसंतराव नाईक  स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी मागील महिन्यात नेर तालुक्यातील मुकींदपूर पारधी बेड्यावरील‘सरकार आपल्या दारी’ कार्यक्रमात दिल्यावर महसूल विभागाच्या   मस्तवाल अधिकाऱ्यांची कुंभकर्णी झोप उखडलीमोडली असुन मार्च महिन्यापासून  मुकींदपूर पारधी बेड्यावरील सर्व पारधी शिथापत्रिका धारकांना अंत्योदय योजनेमधुन अन्न देण्यास सुरुवात केल्याची माहीती तहसीलदार अमोल पोवार यांनी दिली . सामाजिक कार्यकर्ते गणेश राऊत ,
मुख्यमंत्री ग्राम फेलो राजू केंद्रे सह सुनील धोटकर ,तालुका अध्यक्ष पंजाब शिरभाते यांच्या विषेय प्रयासाने हा महत्वाचा विषय मार्गी लागला . 
मुकींदपूर पारधी बेडा भयाण वास्तव असून विकासाच्या नावाचा येथे कुठेही लवलेश नाही. पोट भरण्याच्या संघर्षात विकास यांच्यापासून कोसो दूर  गेलेला आहे. दररोज उद्याचे काय? हा प्रश्‍न यांच्या पाचवीला पुजलेला. या पारधी पोडाच्या समस्या जाणून घेण्यासाठी किशोर तिवारी यांनी या बेड्याला भेट  मागील बुधवारी ता.७ फेबु च्या भेटीत दिली असता  साहेब आमच्या बेड्यावर पाणी नाही, रस्ता नाही, साधी नालीही नाही व खायला धान्यपण नाही. सांगा आम्ही जगाव तरी कस?’ असला आर्त टाहो नेर तालुक्यातील मुकींदपूर पारधी बेड्यावरील नागरिकांनी शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवार समोर फोडला होता त्यावेळी आपण ज्या ज्या कोलाम पोडावर व पारधी बेड्यावर सरकार आपल्या दारी कार्यक्रम घेतो तेंव्हा  कोलाम पारध्यांना  मूलभूत सुविधांपासून तसेच  अंत्योदय योजनेपासून वंचित ठेवण्याचे संघटीत षडयंत्र असल्याचे दुःख प्रगत केले होते . 
आपल्या भेटीत  किशोर तिवारींनी पारधी बेड्यावर घराघरात जावून प्रत्येकाच्या समस्या जाणून घेतल्या. प्रत्येक घरातील चुलीपर्यंत जावून त्यांच्या अडी-अडचणी समजून घेत संबंधित अधिकार्‍यांना त्या सोडविण्याच्या सूचनाही दिल्या. या पोडावर रस्ते, नाल्या, पिण्याचे पाणी, अंत्योदयाचे धान्य, आरोग्याच्या समस्या अशा अनेक समस्या त्यांच्या निदर्शनास आल्या. यानंतर त्यांनी येथील नागरिकांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना किशोर तिवारी म्हणाले  ज्या नागरिकांच्या घरकुलाच्या समस्या, प्लॉटच्या समस्या आहे. त्या निवारण्याची जबाबदारी तहसीलदारांची राहील. धान्याच्या समस्येसबंधी ते म्हणाले , येत्या सात दिवसात अंत्योदयाच्या लाभ प्रत्येक नागरिकास मिळाला पाहिजे, कुणीही यापासून वंचित राहता कामा नये. या पोडाला तात्काळ महसुली दर्जा देवून दोन ते तीन गावांची ग्रामपंचायत करण्यात यावी, अंतर्गत रस्त्यांसाठी तत्काळ प्रस्ताव सादर करा, वीजेची समस्या त्वरित मार्गी लावावी. आरोग्या संदर्भात काही अडचण असल्यास मला फोन करावा, असेही त्यांनी सांगितले. संघर्षाशिवाय तुम्हाला काहीही मिळणार नाही, तेव्हा जागृत होवून आपल्या मागण्यांसाठी संघर्ष करा, असे आवाहन यावेळी केले. आदिवासी विभागाच्या सचिव वर्मा यांच्याशी व जिल्हाधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून येथील समस्येशी त्यांना अवगत केले होते 
=========================================================

Friday, March 30, 2018

येत्या खरीप हंगामात अमरावती जिल्ह्यात २ हजार कोटीचे कर्ज वाटप व "मागेल त्याला पीक कर्ज " योजना मिशन मोडमध्ये राबविणार -शेतकरी मिशनच्या आढावा बैठकीत निर्णय

येत्या खरीप हंगामात अमरावती जिल्ह्यात २ हजार कोटीचे कर्ज वाटप व "मागेल त्याला पीक कर्ज " योजना मिशन मोडमध्ये  राबविणार -शेतकरी मिशनच्या आढावा बैठकीत निर्णय 
दिनांक - ३० मार्च २०१८
यावर्षी २००१ पासुन थकीत कृषीकर्जाला त्यामध्ये पिक कर्ज व सर्व मध्यम मुदतीचे शेतीसाठी घेतलेले कर्जाचा समावेश असल्यामुळे ९० टक्के कर्जबाजारी व अडचणीत असलेले शेतकऱ्यांना बँकांची दरवाजे पुन्हा उघडण्यात आली असुन आता यासर्व शेतकऱ्यांना नवीन पत  पुरवडा १ एप्रिल पासून सुरु करण्याचा व "मागेल त्याला पीक कर्ज " योजना मिशन मोडमध्ये राबविण्याचा महत्वाचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यलयात आयोजित कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनच्या खरीप हंगाम आढावा बैठकीत घेण्यात आला . या बैठकीला कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी ,विभागीय आयुक्त पीयूषसिंग ,जिल्हाधिकारी अभिजित बांगर , मुख्य कार्यपालन अधिकारी मनीषा खत्री उप संचालक कृषी नागरे  उप संचालक आरोग्य नितीन आंबडेकर   जिल्हा कृषी अधिकारी अनिल खर्चानं यासह आरोग्य ,वन ,वीज वितरण ,महसूल ,अन्न पुरवडा ,आदिवासी विकास, शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते . 
यावर्षी सरकारने शेतकऱ्यांवरील थकीत झालेले २००१ पासुन जून  २०१७ पर्यंतचे सर्व पिक कर्ज व सर्व मध्यम मुदतीचे शेतीसाठी घेतलेले दीड लाखपर्यंतचे कर्ज बँकांना दिले असुन आता आजच्या पिकाप्रमाणे प्रति हेक्टरी पत मर्यादेप्रमाणे पिक कर्ज वाटप करणे अत्यंत आवश्यक असुन यासाठी जिल्हा बँकर समितीने दोन हजार कोटीचे लक्ष निर्धारीत केले असुन त्याप्रमाणे " मागेल त्याला पीककर्ज " योजना सुरु करण्याची व बँकांनी सरकारच्या कर्ज माफीमध्ये न आलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरकारला दिलेल्या सवलती प्रमाणे फायदा देऊन नवीन पत पुरवडा करावा असा आदेश किशोर तिवारी यांनी यावेळी दिला . मागील २००८च्या कृषी कर्ज माफीमध्ये बँकांनी आपले खिसे भरले मात्र शेतकऱ्यांना नवीन  पत पुरवडा सुरु केला नाही हा प्रकार यावेळी होणार नाही यासाठी सर्व प्रशासनाने शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी नवीन पिक कर्ज वाटप होणार याची जबाबदारी घ्यावी अशा सूचनाही तिवारी यांनी यावेळी दिल्या  . 
सरकारी बँका कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांच्या यादी आपल्या बँकांच्या दर्शनी भागात लावत नसुन शेतकऱ्यांना माहीती देण्यासही नकार देत असल्याच्या प्रचंड तक्रारी वर विभागीय आयुक्त पीयुष सिंग यांनी नाराजी दाखवत सर्व बँकांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या रकमेसह यादी लावाव्या व खरीप हंगामासाठी १ एप्रिल पासुन पीककर्ज वाटप सुरु झाले असल्याचे फलक लावण्याचे आदेश यावेळी दिले . 
सध्या येत असलेल्या तक्रारी प्रमाणे शेतकऱ्यांची तूर मंदीच्या नावावर तीन  हजार पाचशे ते चार हजार रुपये क्विंटल या पडेल भावात घ्यावी व अधिकाऱ्यांच्या संगनमताने या खाजगी व्यापाऱ्यांची तूर सरकारी नाफेडच्या खरेदीमध्ये विकण्यात येत असल्याच्या प्रकारावर किशोर तिवारी यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली तसेच या मागील दोन वर्षांपासून राजरोसपणे सुरु असलेला धंदा बंद करण्यासाठी सरकारने सुरु केलेली पारदर्शक ऑन पद्धती सुरु केल्यांनतर आता शेतकऱ्यांकडून सातबारे गोळाकडून त्यांच्या नावावर नाफेडच्या खरेदी केंद्रावर हमीभाव ५ हजार चारशे दराने हेच व्यापारी विकत असल्याने  शेतकऱ्यांनी या व्यापाऱ्यांना आपला सातबारा वापर करू देऊ नये अशी विनंती  किशोर तिवारी यांनी केली व  जे व्यापारी व अधिकारी - कर्मचारी अशा प्रकारे त्यांनी माहीती शेतकरी मिशन द्यावी असे आवाहन केले आहे. 
प्रत्येक जिल्हापरिषद ब्लॉक मध्ये एक शेतकरी उत्पादक संस्था ,त्याला जोडलेले प्रत्येक गावाचे शेतकरी गट व ब्लॉकप्रमाणे कृषी कॅल्स्टर निर्माण करण्याची व यासर्व शेतकरी उत्पादक संस्थाचा जिल्हा स्तरीय फेडरेशन स्थापन करण्यात यावा व त्याला प्रक्रिया व बाजार उपलब्ध करण्यासाठी निधी देण्याच्या विविध योजनांचा सुरवात करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला . 
अचलपूर व मोर्शी येथे डायलिसीस सुविधा तात्काळ नाविन्यपूर्ण योजनेत सुरु करण्याचा निर्णय यावेळी जिल्हाधिकारी अभिजित बांगर घेतला व आरोग्य विभागाच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी तात्काळ प्रस्ताव देण्याचे आदेश यावेळी दिले . 
=========================================

Monday, February 5, 2018

मुकींदपुर पारधी बेड़ा (नेर )येथे किशोर तिवारी यांचा येत्या ७ फेबु . ला "सरकार आपल्या दारी कार्यक्रम "

मुकींदपुर पारधी बेड़ा (नेर )येथे किशोर तिवारी यांचा येत्या ७ फेबु . ला  "सरकार आपल्या दारी कार्यक्रम "
दिनांक -  ६ फेबु.२०१८
नेर तालुक्यातील आजंती व  
मुकींदपुर पारधी बेड़ा  सरकारी उदासीनतेमुळे येत असलेल्या अन्न ,वस्त्र .निवारा .रस्ता .साधे पिण्याचे शुद्ध पाणी या सारख्या समस्या  
चर्चेत आल्यानंतर  आदीवासी ,कोलाम पारधी, शेतकरी यांच्या कडुन आदिवासी विकास ,ग्राम विकास ,कृषी ,महसुल ,वन ,आरोग्य ,सहकार ,वीज ,सिचन ,शिक्षण ,पोलीस , अन्न  सुरक्षा या विभागाच्या प्रचंड तक्रारी सरकार दरबारी आल्यामुळे या विभागाच्या सर्व जिल्हा स्तरीय अधिकाऱ्यांसह तक्रारीचे  समाधान करण्यासाठी कै वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांचा  येत्या ७ फेबु.ला  
मुकींदपुर पारधी बेड़ा (नेर) सरकार आपल्यादारी कार्यक्रम    आयोजित करण्यात आले  आहे .  
महाराष्ट्र सरकारच्या बळीराजा चेतना  अभियानाचा एक भाग म्हणून ग्रामीण जनतेच्या विकासाच्या व   लोककल्याणाच्या योजना राबविणाऱ्या विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांना गावाच्या चावडी हजर करून सर्व  तक्रारीचे समाधान करण्यासाठी  असा अभिनव उपक्रम शेतकरी मिशन तर्फे  आयोजित करण्यात येत असुन हळुहळु सर्व राजकीय पक्षाच्या व सामाजिक संघटनांच्या सहकार्याने या मोहीमेला गती आली असुन  व जिल्हा प्रशासनाने अशा  कार्यक्रमाचे संपुर्ण नियोजन करण्यास पुढाकार घेतला असल्यामुळे सर्व विभागाचे अधिकारी या  सरकार आपल्यादारी कार्यक्रमाला उपस्थित रहात असल्यामुळे एक चळवळ म्हणुन समोर येत आहे . 
या सरकार आपल्या दरबारी कार्यक्रमात  खालील   विषयाच्या तक्रारीचे समाधान करण्यात येणार आहे त्यामध्ये  
मुकींदपुर पारधी बेड़ा याला  
महसूली गावाचा दर्जा नाही,  पाण्याची समस्याव रस्ता नाही ,बेड्यात अंतर्गत रस्ते नाहीत , विज मीटर व वीज जोडणीची समस्या , रस्त्यावर विज खाम्ब नाहीत ,तसेच  गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार* हा कार्यक्रम इंद्रठाणा व मुकिंदपुर (नेर) दोन पाझर तलावांद्वारे तात्काळ लागू केल्यास किमान १५० पारधी शेतकरी बांधवांना फायदा होईल व १००० पेक्षा जास्त एकरामध्ये गाळ टाकल्या जाईल - व त्यामुळे या दोन्ही पाझर तलावात ३०% पाणी साठा वाढेल, असा  विश्वास  मुख्यमंत्री ग्राम विकास  योजनेचे विषेय अधिकारी व कार्यक्रमाचे संयोजक   आहे राजु केंद्रे  यांनी व्यक्त केला आहे . 
महाराष्ट्राचे महामहिन राज्यपाल विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारधी व कोलामांच्या  घरकुल योजना , समाज मंदिर ,युवा रोजगार ,कौशल्य विकास ,आदिवासी विभागाच्या या भागातील कोलाम व पारध्यांना मिळालेला लाभ ,विषारी पिण्याच्या पाण्याची समस्या , कृषी विभागाच्या योजनांचा या भागातील आदिवासी ,कोलाम व पारध्यांना मिळालेला लाभ , बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतकऱ्यांच्या समस्या ,कर्जमाफीच्या योजनांचा या भागातील शेतकऱ्यांना मिळालेला लाभ,या जनतेला  घराचे व शेताचे मालकीचे पट्टे देण्याचे सर्व प्रकरण , वन्य प्राण्याचा त्रासामुळे रोजगार गमावलेल्याना नुकसान भरपाई ,या जनतेला गॅस जोडणी ,वन रोजगार ,या  परीसरातील वरळी मटका व कोंबडा बाजाराचा ,दारू विक्रीचा हैदोस रोखण्यासाठी उपाययोजना  , उच्चं न्यायालयाचा आदेश नुसार या भागातील कोलाम व पारध्यांना अंत्योदय योजनेपासून वंचित ठेवणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यावर केलेल्या कारवाईचा अहवालतसेच कर्जमाफी पासुन  वंचित असलेल्या या भागातील शेतकऱ्यांची  यादी ,  नेर तालुक्यातील  प्राथमिक  आरोग्य केंद्राच्या समस्या यावर अहवाल मागीतला असल्यामुळे या कार्यक्रमास  विषेय महत्व आले आहे .   नेर तालुक्यातील सर्व पारधी बांधवानी या सरकार आपल्या दारी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन पोलीस पाटील अनोज पवार ,उपसरपंच आजुबा भोसले ,पुजा पवार . मुख्यमंत्री ग्राम विकास दुत राजू केंद्रे यांनी केले आहे . 

=============================================