Tuesday, July 26, 2016

प्रधानमंत्री पीक विमा योजनेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याची शेतकरी मिशनची सरकारला मागणी


 प्रधानमंत्री पीक विमा योजनेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याची शेतकरी मिशनची सरकारला मागणी   

दिनांक २७ जुलै २०१६
राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यात सर्व जिल्ह्यातुन शेतकऱ्यांची व बँकांची मागणी तसेच राज्य अग्रीम बँकेशी झालेल्या चर्चेनंतर शेतकरी मिशनने प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०१६ साठी  पीक विमा काढण्याची अंतिम मुदत ३१ जुलै  कमीतकमी ३१ ऑगस्ट करावी अशी विनंती भारत सरकारला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत शेतकरी मिशनचे किशोर तिवारी यांनी केली आहे कारण २६ जुलै पर्यंत २० टक्के पेक्षा कमी शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असुन सध्या पीक विमा काढण्यासाठी अवघे चार दिवस उरले असल्याने विदर्भ व मराठवाड्याच्या  विविध बँकांमध्ये हजारो शेतकर्‍यांची झुंबड उडाली आहे. बँकांमध्ये पाय ठेवायलाही जागा नसून शेतकरी विविध कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त आहे. मराठवाड्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना बँकेसमोर आंदोलन करावी लागत असुन सरकारने   तात्काळ मुदतवाढ देण्याची आग्रही मागणी किशोर तिवारी केली आहे 
नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान झाल्यास शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसतो. त्यामुळे शेतकरी आपल्या पिकांचा विमा काढतात.दरवर्षी सातबाराचा उतारा, आठ अ, तलाठी पेरेपत्रक व अर्ज भरुन पीक विमा काढला जातो. परंतु यंदा पीक विमा योजनेचे प्रारुप बदलून कागदपत्रे कोणती लागणार याविषयी संभ्रमावस्था होती.  त्यानंतर पंतप्रधान पीक विमा योजनेचा नवीन अर्ज उशीरा आला असुन यामध्ये  सातबाराचा उतारा पेरेपत्रक, आधार कार्ड आदींचा उल्लेख आहे. शेतकरी पेरे प्रमाणपत्रासाठी तलाठय़ांकडे गेले असता तलाठय़ांनी पेरे प्रमाणपत्र देण्यास असर्थता दर्शविली. आमचा पीक पाहणीचा कालावधी महसूल अधिनियमातील खंड ४ नुसार पेरेपत्रक ऑगस्ट महिन्यात उभ्या पिकाची पाहणी केल्यानंतर दिले जाते असे सांगण्यात येत  असल्यामुळे शेतकऱ्यांना  पीक विम्यात सहभागी होण्यासाठी ३१ जुलै ही तांत्रिक अडचण निर्माण झाली. अनेक बँका सूचना दिल्यानंतरही  शेतकर्‍यांनी स्वघोषणा पत्र भरुन बँकेत विमा काढत नसल्याच्या तक्रारी येत आहेत यामुळे हजारो  शेतकर्‍यांची बँकांमध्ये गर्दी झाली आहे. त्यातच पीक विमा योजनेच्या अर्जाचा तुटवडा निर्माण झाला आहे. या सर्व कारणांनी लाखो शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०१६ वंजीत राहणार अशी भीती व्यक्त केली जात असुन तात्काळ ३१ ऑगस्ट पर्यंत  मुदतवाढ देणे गरजेचे असल्याचे किशोर तिवारी आपल्या विनंती पत्रात म्हटले आहे . 
प्रधानमंत्री पीक विमा योजना पिकाशी निगडित विविध जोखीमेमुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या पिकांच्या नुकसानापासून संरक्षण देण्याचे एक माध्यम आहे. नैसर्गिक आपत्ती व इतर कारणांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई पीक विमा योजनेद्वारे करता येते. नव्याने प्रथमच अंमलात आणलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील जास्तीत जास्त  शेतकऱ्यांनी  पीक विमा प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन किशोर तिवारी  यांनी केले आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०१६ साठी भात, सोयाबीन, तुर, कापूस, ज्वारी, भुईमुंग, तीळ, मुंग व उडीद या पिकासाठी राबविण्यात येत आहे. योजनेचे वैशिष्ट्य नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा योजनेद्वारे संरक्षण मिळते.  विमा हप्ता खरीप हंगामासाठी २ टक्के व नगदी पिकासाठी ५ टक्के आहे. जोखीमस्तर सर्व पिकांसाठी ७० टक्के ठेवण्यात आला आहे. उंबरठा उत्पन्न हे मागील ७ वर्षाचे सरासरी उत्पन्न गुणिले त्या पिकाचा जोखीमस्तर विचारात घेवून निश्चित केले जाणार आकहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत जोखीमची व्याप्ती वाढविण्यात आली असून संरक्षणाच्या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. संरक्षणाच्या बाबी - प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पीक पेरणी पासून कापणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट जसे नसैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी पासून पिकांची नुकसान झाल्यास विम्याचा लाभ मिळू शकतो. पीक पेरणी पूर्व तसेच लावणी पूर्व नुकसान झाल्यास विम्याचा लाभ मिळू शकतो. पीक पेरणीपूर्व तसेच लावणीपूर्व नुकसान यात अपुरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे मुख्य पिकांची व्यापक प्रमाणावर पेरणी, लावणी न झालेल्या क्षेत्रासाठी विमा संरक्षण देय राहील. पुर पावसामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पन्नामध्ये उंबरठा उत्पन्नाच्या ८० टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर विमा संरक्षण देय राहील. शेतात कापणी करुन वाळविण्यासाठी पडलेल्या पिकास कापणी पासून जास्तीत जास्त १४ दिवस नैसर्गिकरित्या नुकसान झाल्यास वैयक्तिकरित्या पंचनामे करुन नुकसान भरपाई दिली जाणार आहे. पुराचे पाणी शेतात शिरुन पिकाचे झालेले नुकसान, भुस्खलन व गारपीट तसेच स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकाच्या नुकसानीस भरपाई वैयक्तिस्तरावर दिली जाणार. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी सर्व्हेनंबर नुसार बाधीत पीक व बाधीत क्षेत्राबाबत घटना घडल्यास ४८ तासाच्या आत याबाबतची सुचना विमा कंपनी, संबंधीत बँक, कृषी व महसूल विभागास कळविणे बंधनकारक आहे. पिकांच्या नुकसानीचा लाभ मिळावा यासाठी प्रधानमंत्री विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन किशोर तिवारी यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment