सी. सी .आय. कापुस खरेदीवर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना बोनस द्या -किशोर तिवारी
कापसाच्या भावात आलेल्या तेजीमुळे सी. सी .आय.कापुस गाठीविक्रीवर झालेल्या नफ्यामधून महाराष्ट्राच्या कापुस उत्पादक शेतकऱ्यांना बोनस द्या -शेतकरी मिशनचे सरकारला साकडे
दिनांक -३१ जुलै २०१६
यावर्षी कापूस महामंडळास (सीसीआय) कापूस खरेदी हमीभावात केली असुन मात्र कापसाच्या गाठी फारच तेजीमध्ये सरासरी ४० हजार रुपये दरात विकली असुन जुलै पासुन सीसीआय कापसात आलेल्या जागतिक तेजीचा फायदा घेत कापसाच्या गाठी रुपये ५० हजाराच्या घरात जाऊन विकत आहे व सीसीआयकडे या तेजीमध्ये ६ लाखावर गाठी असुन या विक्रीमध्ये त्यांना विक्रमी फायदा होत असुन भारत सरकारने कापसाच्या भावात आलेल्या तेजीमुळे सी. सी .आय.कापुस गाठीविक्रीवर झालेल्या नफ्यामधून महाराष्ट्राच्या कापुस उत्पादक शेतकऱ्यांना कमीतकमी गुजरात सरकार देत आहे त्याधर्तीवर क्विंटलमागे ६५० रुपये बोनस द्या अशी मागणी शेतकरी मिशनचे प्रमुख किशोर तिवारी यांनी भारत सरकारला महाराष्ट्र सरकार मार्फत केली आहे .
मागीलवर्षी महाराष्ट्राच्या कापुस ४० लाखावर शेतकऱ्यांना नापिकीचा सामना करावा लागला व तर विदर्भाच्या दुष्काळग्रस्त शेतकऱयांना पीक विम्याच्या नुकसान भरपाई सुद्धा नाकारण्यात आली आहे त्या सोबतच दुष्काळग्रस्त देण्यात आलेले केंद्रीय मदतीपासुन सुद्धा वंचित ठेवण्यात आले आहे अशा कठीण समयी महाराष्ट्र सरकारने सी. सी .आय.कापुस गाठीविक्रीवर झालेल्या नफ्यामधून महाराष्ट्राच्या कापुस उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्यास भाग पाडावे अशी आग्रही मागणी किशोर तिवारी यांनी रेटली आहे .
आपल्या निवेदनात तिवारी भाजप शाषित गुजरात सरकारने कापूस महामंडळास (सीसीआय) कापूस विक्री केलेल्या शेतकर्यांना क्विंटलमागे ६५० रुपये बोनस यापूर्वीच जाहीर केले असल्याचे व गुजरात प्रमाणे महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकरी यावर्षीच्या अभूतपूर्व नापिकीमुळे प्रचंड अडचणीत व कर्जात बुडाले असुन या आत्महत्याग्रस्त भागातील कोरडवाहू शेतकऱ्यांना सरकारने राज्यातही कापूस महामंडळास (सीसीआय) कापूस विक्री केलेल्या शेतकर्यांना क्विंटलमागे ६५० रुपये बोनस द्यावा अशी मागणी किशोर तिवारी यांनी राज्य सरकारला केली आहे मागील डिसेंबर महीन्यात केली होती व भारतात गुजरात सरकारने फक्त सीसीआयकडे कापूस विक्री करणार्या शेतकर्यांना बोनस देण्याचे घोषित केले आहे याचे स्वागत किशोर तिवारी केले आहे पण गुजरातेत बोनस जाहीर झाल्याने तेथे कापसाला राज्याच्या तुलनेत अधिक भाव मिळेल. अर्थातच राज्यात कापसाची खरेदी करून अनेक व्यापारी गुजरातेत कापूस नेतील. यामुळे राज्यातील जिनींग उद्योगाला फटका बसेल, त्यामुळे कापसाचे जिनींग उद्योग जिवंत ठेवण्यासाठीही बोनस देणे गरजेचे झाले आहे अशी भीती व्यक्त केली होती त्यामुळे महाराष्ट्रातही कापूस उत्पादकांना सरसकट बोनस द्यावा राज्यातील कापूस उत्पादकांना वाचवावे असे आव्हान तिवारी यांनी केले आहे.
मागील दोन वर्षांपासून दुष्काळ व नापिकीला महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त भागातील कोरडवाहू जागतिक मंदी व बी . टी . कापसाने प्रचंड खर्च करूनही दगा दिल्याने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी आपण सरकारला ही आग्रही विनंती करीत असल्याचे ,तिवारी यांनी आपली निवेदनात म्हटले आहे .
No comments:
Post a Comment