यवतमाळ जिल्यात सर्वांना अन्न सुरक्षा ,घरासाठी व शेतीचे पट्टे यासाठी शेतकरी मिशनची मोहीम : केळापूर तालुक्यातील खैरगाव (देशमुख) कोलाम पोड येथे २५ आगस्टला "सरकार आपल्या दारी" कार्यक्रम
दिनांक २४ ऑगस्ट २०१७
मा . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सूचनेनुसार "सरकार आपल्या दारी" या कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण भागातील महसूल , कृषी ,ग्रामविकास ,वीज वितरण ,अन्न पुरवठा ,आरोग्य ,रोजगार ,शिक्षण , पोलीस प्रशासन यांच्या विभागाच्या तालुका व ग्रामस्तरीय अधिकारी -कर्मचारी यांच्या तक्रारीची सुनावणी व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांकडून समाधान व कारवाई साठी अधिकारी -कर्मचारी चेतना जागृती अभियानाचा एक भाग म्हणून यवतमाळ जिल्यात केळापूर तालुक्यातील खैरगाव (देशमुख) कोलाम पोड येथे २५ आगस्टला "सरकार आपल्या दारी" कार्यक्रम नसुनावणी ठेवण्यात आली आहे . खैरगाव देशमुख ,वांजरी ,झुली ,पहापळ,बोथ,जवाहर नगर,मारेगाव,जाम , कोदोरी सुकळी रूढा घुबडी वळवाट पिठापोंगरी खैरी येथील कोलाम पोडावरील आदिवासींच्या येथील गावकऱ्यांच्या जमिनीच्या मालकीचा प्रश्न ,घरकुल योजनेच्या अडचणी शेतकऱ्यांच्या शेती मालविक्रीसाठी येत असलेल्या अडचणी आतापर्यंत नवीन पिककर्ज ,मुद्रांकर्ज वाटप, ग्रामीण जनतेला काम व खावटी ,अन्न ,आरोग्य ,गुरांना चारा व पाणी यासह वीज वितरण ,शिक्षण ,प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न यांना सरकार ,प्रशासन ,लोक प्रतिनिधी व सामाजिक संस्था यांच्या पुढाकाराने सोडविण्यात येतील अशी माहीती मिशनचे प्रमुख किशोर तिवारी यांनी आज एका पत्रकाद्वारे दीली .
यवतमाळ जिल्यात आदिवासी बहुल भागात पिवळ्या शिधा वाटप नाहीत अशा प्रचंड तक्रारी येत आहेत अनेक कोलाम व पारधी पाड्यात जनतेला घरकुल योजना मिळत नसुन कारण घराचे पट्टे मालकीचे नाहीत अनेक तांत्रिक अडचणी प्रशासन समोर करीत वर्षानुवर्षं हा प्रश्न रेंगाळत आहे तसेच वंचितांना आजही अन्न ,आरोग्य ,गुरांना चारा व पाणी यासह वीज वितरण ,शिक्षण यांच्या समस्या आहेत यासर्व बाबीवर गंभीरपणे तोडगा काढण्यासाठी केळापूर तालुक्यातील खैरगाव देषमुख येथे येत्या ९ मार्चला "सरकार आपल्या दारी" कार्यक्रम हा कार्यक्रम कै वसंतराव नाईक शेतकरी मिशनने आयोजित केला आहे या कार्यक्रमाला प्रशासनकडून महसूल , कृषी ,ग्रामविकास ,वीज वितरण ,अन्न पुरवठा ,आरोग्य ,रोजगार ,शिक्षण , पोलीस प्रशासन यांच्या विभागाच्या तालुका व ग्रामस्तरीय अधिकारी -कर्मचारी उपस्थित राहणार असुन या भागातील लोकप्रिय आमदार डॉ अशोक उईके व आमदार राजाभाऊ तोडसाम यांचेसह सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सद्यस तसेच सर्व सरपंच व ग्रामपंचायतीचे सद्यस यांना सादर आमंत्रित करण्यात आले असुन ,ग्रामीण जनतेनी आपल्या सर्व अडचणी व सरकारी योजनामध्ये होणाऱ्या गैरप्रकार समोर आणण्याकरिता कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन शेतकरी मिशनचे अध्क्षश किशोर तिवारी यांनी केली आहे
================================================