आदीवासी भागात संपुर्ण दारूबंदी करा : पांढरकवडा येथे पेसा गावाच्या सरपंच मेळाव्यात एकमुखी ठराव
ग्रामसभेने विविध ठराव घेवून प्रशासनाकडे पाठवावे - किशोर तिवारी
दिनांक -१३ ऑगस्ट २०१७
अनुसुचित क्षेत्र स्थानिक स्वराज्य विकास मंडळ (महासंघ) पांढरकवडा व पेसा कायदा वनहक्क कायदया अंतर्गत असलेल्या ग्रामसभांचा सरपंचाच्या यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत पेसा लोकप्रतिनिधींचीमेळाव्यात स्था निक सुराणा भवन पांढरकवडा येथे आज शनिवारी संपुर्ण दारूबंदी सह आदिवासींच्या घटनादत्त अधिकारांच्या पुनर्स्थापनेसाठी रणशिंग फुकण्यात आले .या मेळाव्यात कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष मा. श्री किशोर तिवारी (राज्यमंत्री दर्जा) यांची प्रामुख्याने उपस्थित होते . यावेळी पांढरकवडा येथील तहसिलदार महादेवराव जोरवार पांढरकवडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मधुकरराव घसाळकर. राळेगांव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी खेडकर, सरपंच महासंघाचे अध्यक्ष तुळशीराम कुमरे, पंचायत समीती पांढरकवड्याचे संतोषराव बोडेवार , आदीवासी नेते धर्माभाऊ आत्राम, शेतकरी नेते सुरेशभाऊ बोलेनवार यांच्या मेळाव्यात उपस्थित होते . यावेळी किशोर तिवारी यांनी मार्गदर्शन करतांना पेसा अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायतच्या ग्रामसभेने कोणकोणते ठराव घ्यावेत यावर ठरावाचे वाचन करीत मार्गदर्शन केले. त्यात प्रमुखपणे दारू विक्री व संपुर्ण दारूबंदी ठराव, पेसा ग्रामपंचातमध्ये १००टक्के अंत्योदय लागू करावा ,पेसा गावात विविध संस्थांना प्रतिबंध घालून ग्रामसभेने ठराव मंजूर करूनच परवानगी घेतलेल्यांना विकास कामे करण्यासाठी अनुमती मिळावी, पेसा गावाला थेट निधी आवंटीत करावा, पेसा गावात आरोग्य उपकेंद्रे स्थापन करण्यात यावे, पेसा ग्रामपंचायतच्या वनपरिक्षेत्रातील वृक्ष कटाई पुढील १० वर्षाकरिता प्रतिबंधीत करावी असे महत्वाचे एकुण २५ ठराव मेळाव्यात ठेवण्यात आले व उपस्थित सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवकांनी त्याला आपले अनुमोदन दिले त्यानंतर उपस्थितांना हे ठराव येत्या १५ आगस्टला आम सभेत पारीत करण्याचे आवाहन मा.ना. किशोर तिवारी यांनी केले. त्यानंतर मंचावर उपस्थितांपैकी तुळशीराम कुमरे, धर्माभाऊ आत्राम, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी घसाळकर राळेगांव चे गटविकास अधिकारी खेडकर व काही सरपंचांनी मंचावर येवून पेसा अंतर्गत येणार्र्या ग्रामपंचायतींसाठी ठराव सुचविले त्यात गौण उत्खननाची परवानगी ग्रामसभेतून घ्यावी व हर्रास झालेली रक्कम त्या पेसा ग्रामसभेला मिळावी, गोडाऊन व मंगलकार्यालय बांधावे, पेसाचा एका गावाला एकच ग्रामसेवक असावा, कम्युनिटी राईटस् च्या नावाखाली विकास कामांमध्ये असलेले वनसंस्थांचे सरकारी अतिक्रमण पेसा ग्रामपंचायत मधून हटवावे, पेसा अंतर्गत ग्रामंचायत मध्ये राहणाऱ्या आदिवासी बांधवांना शुध्द पिण्याचे पाणी देण्यात यावे, मागेल त्याला घर ही योजना राबविण्यात यावी प्रत्येक गावाला विद्युत पुरवठा आणि मराठी गोंडी कोलामी भाषा येणारा शिक्षक पेसा ग्रामपंचायत मध्ये येणाऱ्या शाळांमध्ये नियुक्त करावे असे विविध ठराव सुचविण्यात येवून ते ग्रामसभेने पारीत करून शासनदरबारी पाठवावे अशा सुचना या मेळाव्यात करण्यात आली . सदर मेळाव्याला पेसा अंतर्गत येणार्र्या ग्रामपंचायतशी संबंधीत लोकप्रतिनिधींची उपस्थिती लाभल्याने कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी जनप्रतिनिधींना धन्यवाद दिलें त्याचबरोबर सदर ग्रामसभेने जे जनप्रतिनिधी विकास कामांच्या आपल्या सेवेत खरे उतरणार नाही त्यांना परत बोलविण्याचा अधिकार प्रदान करावा असा ठराव घेण्याबाबतही यावेळी मेळाव्यात उपस्थित ग्रामसेवक सरपंच व उपसरपंच यांना सुचविण्यात आले. या मेळाव्याचा समारोप खेळीमेळीच्या वातावरणात झाला यावेळी उपस्थितांचे आभार पेसा अधिकारी आशिष विनकरे यांनी मानले .
No comments:
Post a Comment