स्व. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन पत्रपरीषद निवेदन
दिनांक -९ ऑगस्ट २०१७
दिनांक -९ ऑगस्ट २०१७
मागील पत्रपरीषदमध्ये ठरल्याप्रमाणे शेतकरी मिशनच्या कारवाईचा अहवाल व पाठपुरावा या विषयावर आपणाशी चर्चा करण्यासाठी आज ही पत्रपरीषद घेण्यात येत आहे .
स्व. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनकडुन महाराष्ट्राच्या कृषीसंकटाचा व ग्रामीण भागातील आर्थिक समस्याबाबत नीतीआयोगासमोर व पंतप्रधान कार्यालयात विस्तृत मांडणीकरून राज्य सरकारच्या कामाचा आढावा सादर करण्यात आला (नीती आयोगाच्या बैठकीचा अहवाल सोबत जोडला आहे ( जोड पत्र -१). शेतकरी मिशनकडून यवतमाळ ,वाशीम ,वर्धा व अमरावती जिल्ह्याचा कामाचा आढावा घेण्यात आला . स्व. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनची मासीक बैठक ३१ जुलै रोजी घेण्यात आली यामध्ये सर्व जिल्हाधिकारी ,मुख्यकार्यपालन अधिकारी ,पोलीस अधिकारी ,कृषी ,आरोग्य ,पतपुरवडा ,सहकार ,वीज ,सिंचन ,दुग्ध ,मत्स्य ,वन व आदिवासी विभागाच्या कामाचा आढावा घेण्यात आला व खालील निर्णय घेण्यात आले .
ग्रामीण भागात मागेल त्याला अन्न
ग्रामीण भागातील गरीब व पात्र असणाऱ्या सर्वांना अन्न सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला (पहा जोड पत्र २)
आदीवासी शेतकरी व शेतमजुरांना नव्याने खावटी कर्ज
सर्व आदीवासी शेतकरी व शेतमजुरांना जुने खावटी कर्ज माफ करून नवीन खावटी कर्ज देण्याचा प्रस्ताव मिशनने सरकारला दीला आहे . (पहा जोड पत्र ३)
राज्यातील मक्तेदार वा बटाईदार शेतकऱ्यांच्या कर्जमाफी समावेश करावा
राज्यातील मक्तेदार वा बटाईदार शेतकऱ्यांच्या कर्जमाफी समावेश करण्याची अतिशय महत्वाची मागणी मिशनने सरकारला केली आहे (पहा जोड पत्र ४).
पीक कर्जमाफी व पिकविम्याबाबत मिशनकडून राज्यपातळीवर शेतकऱ्यांना सहकार्य
अडचणीच्या पात्र शेतकऱ्यांना तातडीची १० हजाराची मदत व पीक कर्जमाफीच्या व्याप्तीची संपुर्ण माहीती देण्याची महत्वाची मागणी मिशन कामगीरी पार पाडत आहे .
स्व. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन अस्तिव व सामाजीक बांधिलकी
स्व. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन हे महाराष्ट्राच्या हरीत क्रांतीचे जनक व शोषितांचा आवाज म्हणुन अमर झालेले माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांचे स्वप्न साकार करण्यासाठी अशासकीय शेतकरी चळवळीच्या सामान्य कार्यकर्त्यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ व मराठवाड्याच्या १४ जिल्ह्यात सुरू केलेला प्रयोग असुन सरकारला आज पर्यंत कवडीची निधी न मागता आपण सर्व भ्रष्ट्र अधिकारी व पोटभरू नाकर्ते राजकीय नेते यांचे गोरखधंदे बंद करुन वंचितांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयन्त आहे आपण याला सहकार्य करावे
आपला नम्र
किशोर तिवारी
No comments:
Post a Comment