किशोर तिवारी २१ ऑगस्टला यवतमाळ जिल्हात
दिनांक २० ऑगस्ट २०१७
स्व वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी २१ ऑगस्टला यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी व केळापुर तालुक्यातील आदीवासी वंचितांच्या वीज पुरवढ्यामध्ये खंड , आरोग्याच्या समस्या ,अन्न सुरक्षा ,निराधार , पीककर्ज ,शिक्षण ,ग्रामीण विकास ,आदीवासी योजना,वरळीमटका ,जुगार ,दारू विक्री व टिप्पेश्वर अभयारण्यामुळे होत असलेला वन्यप्राण्याचा त्रास , टिप्पेश्वर अभयारण्यामध्ये होत असलेली जंगल तोड ,पारवा व अर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरावस्था याची पाहणी व जनतेच्या समस्याची सुनावणी जिल्ह्यातील सर्व उच्च अधिकाऱ्यासोबत करणार आहेत . या दौऱ्यात किशोर तिवारी दुपारी ४ वाजता सावंगी (सगदा ),संध्याकाळी ५ वाजता मंगी येथे ,संध्याकाळी ६ वाजता भीमकुंड येथील टेकडीवर राहणाऱ्या आदिवासींच्या समस्यांची सुनावणी व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे तसेच संध्याकाळी ७ वाजता जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सोबत अर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट व प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचारी वर्गास पाऊसामुळे होत असलेल्या त्रासापासुन वाजविण्याकरिता उपाय योजनेवर चर्चा करतील . या जनसंपर्क दौऱ्याचा फायदा वंचितांना व आदिवासींनी घ्यावा अशी विनंती स्व वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे जनसपंर्क अधिकारी अशोक कापर्तीवार यांनी केली आहे .
No comments:
Post a Comment