Friday, January 31, 2020

केंद्रीय अर्थसंकल्पातील १६ कलमी कार्यक्रम एक धूळफेक -पत पुरवडा ,हमीभाव ,पीकविमा योजना सुधारणा बगल दिली -किशोर तिवारी

 केंद्रीय अर्थसंकल्पातील १६ कलमी कार्यक्रम एक  धूळफेक -पत  पुरवडा ,हमीभाव ,पीकविमा योजना सुधारणा बगल दिली -किशोर तिवारी 
नागपूर- १ फेबु २०२०
सध्या स्थुल घरगुती उत्पादनाचा (जी डी पी ) निर्देशांक घसरत असुन भारतात आर्थिक संकट वाढतच असुन केंद्रीय अर्थ मंत्र्यांनी यावर्षी अर्थ संकल्प सादर  केलेला  १६ कलमी कार्यक्रम एक धूळफेक   असून यामुळे  कृषी संकट वाढणार असुन याचे कारण मागील ६ वर्षातील सरकारच्या विकासाच्या व आर्थिक धोरणाचा चुका असुन यामुळे सर्वात जास्त संकट ग्रामीण क्षेत्रात आले असुन शेतकरी सर्वात जास्त आर्थिक अडचणीत आले आहे त्यामुळे सगळे व्यवसाय धोक्यात आले आहे व या आर्थिक आणीबाणीच्या वेळी फक्त कृषी क्षेत्रातील गुंतवतणूक वा मूळ धोरणात्मक बदल भारताला बाहेर काढू शकतो असा विश्वास प्रगट करीत येत्या केंद्रीय अर्थ संकल्पात कृषी क्षेत्रासाठी कमीतकमी ३ लाख कोटीचे राष्ट्रीय पॅकेज द्यावे  अशी आग्रहाची विनंती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना महाराष्ट्राच्या शेतकरी मिशनचे अध्यक्ष व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कृषी सल्लागार किशोर तिवारी यांनी केली होती मात्र   त्याला . संपूर्ण बगल देण्यात आल्याचे दुःख प्रगट करीत आंदोलनाचा ईशारा दिला आहे 

मागील सहा वर्षात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी क्षेत्रावर विषेय लक्ष देण्यासाठी शेतकऱ्यांचे उत्त्पन्न येत्या २०२२ पर्यंत दुपट्ट करण्याचा धाडसी कार्यक्रम जाहीर केला त्यासाठी त्यांनी लागवडीचा खर्च व शेतीमालाला रास्त भाव ,बाजारात होणारी लुबाडणूक रोखण्यासाठी तसेच पेरणीपूर्वी पासुन बाजारात विक्रीपर्यंत पूर्ण  संरक्षण देणारी विमा योजना ,बँकांनी शेतीसाठी सुमारे १३ लाख कोटीचे पिककर्ज शेतकऱ्यांच्या दारावर जाऊन देण्याचा कार्यक्रम राबविला त्यामध्ये डॉ स्वामिनाथन यांच्या बहुतेक सर्व शिफारशी लागू करण्याच्या दावा सुद्धा करण्यात आला मात्र याचा परीणाम विपरीत झाला देशातील सर्व प्रकारचे शेतकरी मागील ६ वर्षात कंगाल झाले त्यामुळेपंजाब, तेलंगणा, आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश एम.पी., महाराष्ट्र यासारख्या पुरोगामी राज्यांनी  २ लाख कोटींपेक्षा जास्त कृषी कर्जमाफी या सहा वर्षात दिली त्याच्या जोडीला  स्थानिक अनुदान आणि मदत पॅकेजवर सुमारे  २ लाख कोटी राज्याच्या तीजोरीतून खर्च केला त्यासोबत राष्ट्रीय आपदा प्रबंधन निधीमधून केंद्राने या राज्यांना सुमारे ३ लाख कोटी या वर्षात दिले त्याच बरोबर विमा कंपन्यांना राज्यांनी तसेच केंद्रांनी सुमारे २ लाख  खिशात कोंबले त्याचवेळी या सहावर्षात कृषी व ग्रामीण क्षेत्रातील विविध सिंचनसह सर्व योजनांच्या नावावर सुमारे ११ लाख कोटी रुपयांची  खैरात वाटण्यात आली मात्र चुकीच्या नियोजनामुळे व योजनाचा केंद्रबिंदू कृषीउद्योग ,ग्राहक व बँकांचे हित असल्यामुळे सारा पैसा पाण्यात गेला व आज कृषिक्षेत्र सर्वात जास्त संकटात आला आहे  त्यामुळे येत्या केंद्रीय अर्थसंकल्पात या क्षेत्रातील अभ्यास असणाऱ्या समाजातील सर्व राजकीय विचारांच्या व क्षेत्रातल्या व्यक्तींना बोलावून सल्ला घेण्यात यावा अशी विनंती किशोर तिवारी यांनी केली होत्री मात्र १`६ कलमी कार्यक्रम देतांना त्याच चुका केल्याचा अनुभव पुन्हा आला आहे 

भारताचे विद्यमान अर्थमंत्री यांना भारताच्या ग्रामीण अर्थिक क्षेत्रातील अनुभव तसाच त्यांनी वाणिज्य मंत्री म्हणून घेतलेल्या प्रचंड आयातीच्या निर्णयामुळे  डाळ उत्पादक क्षेत्रातील शेतकऱ्यांना  प्रचंड नुकसानीचा सामना करावा लागला तसेच त्यांच्या सतत  गैर-व्यावसायिक कामकाजामुळे देशाच्या  आर्थिक संकटाकडे पाहण्याचा द्रुष्टीकोन समुळ बदलणे अत्यंत गरजेचे असुन आज बँकिंग, आयात-निर्यात, विकास आणि कमकुवत पायाभूत सुविधा आणि पर्यावरणीय मुद्द्यांमध्ये घेण्यात आलेल्या चुकीच्या धोरणांचा परिणाम आहे परंतु या सरकारने वारंवार दिलेले सर्व पॅकेज  अयशस्वी ठरले आहे फक्त आता कृषी क्षेत्रात पॅकेज सोबतच  आयात निर्यात, थेट गुंतवणूकीसाठी आरबीआय ला निर्देश राज्य  नियंत्रित शेती पत धोरण व नफा न देणारे सदोष कृषी समर्थन मूल्य एम एस पी  सध्याच्या धोरणामध्ये व   कार्यक्रमांमध्ये  बदल होणे आवश्यक होता मात्र अर्थ संकलपात याला  धारा देण्यात  आली नाही असा आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे 

यापुर्वी प्रमुख मागण्यांमध्ये - कापूस तूर आणि सोयाबीनसाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) उत्पादन खर्चाच्या खऱ्या  १५० टक्क्यांच्या नफ्यासह करणे  शेतकर्‍यांचे सर्व प्रकारचे थकीत कृषी कर्ज केंद्राकडून माफ करून नवीन पीक कर्ज देण्याचा कायदा करणे , शेती आणि सिंचन क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान आणन्यासाठी शेतकर्‍यांना आर्थिक मदत आणि १०० टक्के अनुदानावर शेतीसाठी कुंपण ,गावासाठी वखार ,तारणासाठी बँकेचे कवच तसेच कृषीमालाच्या हमीभावाच्या हमी देण्यासाठी केंद्राचा विषेय कृषिमाल स्थावर निधी  करण्याची  गरज असुन यामुळे  शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्यांना लांब पल्ल्याच्या सकारात्मक विकासाच्या योजना लागु करण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करावा अशी  विनंती किशोर तिवारी होती मात्र त्याला   अर्थमंत्रानी केराची टोपली दाखविली याचे दुःख यावेळी प्रगट केले 

================================================

किशोर तिवारी यांच्याशी संपर्क साधण्याकरिता 



 मोबाइल -09422108846

Tuesday, January 28, 2020

महाराष्ट्रातही विधान परिषद बरखास्त करा - किशोर तिवारी

आंध्राप्रमाणे  महाराष्ट्रातही विधान परिषद बरखास्त करा-किशोर तिवारी 
दिनांक - २९ जानेवारी २०२०

आंध्र प्रदेश राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने सोमवारी विधान परिषद बरखास्त करण्याचा ठराव संमत केला. असाच ठराव आता विधानसभेतही मंजूर केला जाणार असून, त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी तो ठराव नंतर केंद्र सरकारकडे पाठविला जाणार आहे यापुर्वी जम्मू आणि काश्मीरची विधानपरिषद नुकतीच बरखास्त झाली आहे. आसाम, मध्य प्रदेश, पंजाब, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यांनी पहिलेच  बरखास्त केली आहे सध्या जेमतेम सात राज्यात विधान परीषद अस्तित्वात आहे सध्या या वरच्या सभागृहात येण्यासाठी जो प्रकार सुरु आहे त्याला पाहता  घटनेच्या ३०८ कलमाखाली आर्टिकल १६९(१) अन्वये जर जनतेच्या प्रतिनिधींना दुसरे सभागृह म्हणजे विधान परिषद हवे असेल किंवा नको असेल, तर तसा २/३ मतांनी ठराव पास करून बरखास्त करावे अशी मागणी शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे कृषी सल्लागार शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी केली आहे . सध्या यवतमाळमध्ये विधान परिषदेचा निवडणुकीमध्ये जो खुला घोडेबाजार सुरु आहे त्यामुळे व्यथित होऊन आपण हि मागणी रेटत असल्याचा व हे आपले व्यक्तिगत मत असल्याचं  खुलासा किशोर तिवारी यांनी केला आहे . 

आजकल वरचे सभागृह जनतेनी नाकारलेले काळापैसा असणारे दलाली व चमचेगिरी करणारे नेत्यांसाठी जनमान्यतेचा मार्ग झाला आहे बहुतेक सर्व राजकीय पक्ष या वरच्या सभागृहाच्या बहुमताचा फायदा घेत सत्ताधारी लोकनियुक्त सरकारला अडचणीत आणण्यासाठी करतात तर अनेक वरच्या सभागृहाचे सदयस अनेक गोरखधंदे खुले आम करतात अनेक समाजकंटक व  चोर काळ्या पैशाच्या आधारे खासदार आमदार कधी कधी मंत्रीही होतात त्यामुळे यावर चर्चा करण्यात यावी  यासाठी ही मागणी करीत असल्याचा खुलासा किशोर तिवारी यांनी केला आहे . 

यापूर्वी  ‘विधान परिषद बरखास्त करा’ असा १९५३ मध्ये मुंबई असेंब्लीत असा ठराव विधानसभेने केला होता. एवढेच नाही तर तो ठराव संसदेच्या मान्यतेसाठी लोकसभेला पाठविण्यातही आला होता. परंतु तो ठराव पुढे संसदेत मान्यतेसाठी ठेवण्यातच आला नाही. त्यामुळे तो संमत होण्याचा प्रश्नच राहिला नाही.त्यानंतर १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर १९६१ मध्ये विधान परिषद बरखास्त करावी असा ठराव आला होता खरा, पण तो पुरस्कारला गेला नाही.

 महाराष्ट्रात विधान परिषद १९३७ मध्ये अस्तित्वात आली. मुंबई प्रांत असताना विधान परिषदेची स्थापना झाली होती. २० जुलै १९३७ रोजी राज्य विधान परिषदेची पहिली बैठक ही पुण्यात झाली होती. स्वातंत्र्यपूर्व काळात १९३९ ते १९४६ या काळात विधान परिषद निलंबित अवस्थेत ठेवण्यात आली होती. १९८७ मध्ये राज्य विधान परिषदेचा सुवर्ण महोत्सव साजरा झाला होता. अन्य राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही अधूनमधून विधान परिषद  बरखास्तीची मागणी होऊ लागली  किंवा अशी चर्चा किंवा कुजबुज सुरू व्हायची. पण महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर विधान परिषद कधी बरखास्त झाली नाही किंवा तसा ठरावही विधानसभेत करण्यात आलेला नाही मात्र आता यावर विधान  सभेत एकदा खुली चर्चा करा व विधान परिषदेच्या आमदारांच्या निवडीमध्ये होत असलेला नंगानाज समोर आना अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे .
===============================





Thursday, December 5, 2019

कांदा महाग झाल्याचे कारण हा महागाई नाही तर हा निर्सगाचा प्रकोप-साऱ्या भारताला स्वस्त कांदा महाराष्ट्र महिन्याभरात देणार -किशोर तिवारी

कांदा महाग झाल्याचे कारण हा महागाई नाही तर हा निर्सगाचा प्रकोप-साऱ्या भारताला स्वस्त कांदा महाराष्ट्र महिन्याभरात देणार -किशोर तिवारी 
दिनांक -६ डिसेंबर २०१९

कांद्याचा नापिकीमुळे झालेल्या तुटीमुळे वाढलेल्या किमतींचा राजकीय पक्षांनी सुरु केलेली ओरड कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आयातीत कांद्यामुळे प्रचंड आर्थिक संकटात आणू शकते व एक  ही राष्ट्रीय विपदा मद्यम वर्गीय ग्राहकांवर आली असुन अनेक गरीबांचे बळी पडतील देश आर्थिक संकटात येणार असा समज पसरू नका फक्त महीना दीड महिन्यात लासलगाव नाशीकचा  कांदा भारताचा बाजारात येणार हे निश्चित असुन सध्याची प्रचंड दार वाढ साठेबाज करीत असुन शहरातील जनतेनी आपली  ओरड कमी करून सहकार्य करावे कारण  भारत सरकारने स्वस्त भावाचा कांदा पाकीस्थान मधुन मोठ्या प्रमाणात आणला तर जानेवारी नंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आपला कांदा व्यापाऱ्यांना मोतीमोल भावात विकून आत्महत्या कराव्या लागतील तरी आपल्या  कांडा भाववाढ याला राष्ट्रोय संकटाचे स्वरूप न देता  शेतकऱ्यांना सहकार्य करावे असे आव्हान शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी केले आहे 
आपल्या निवेदनात कांद्याचे संकट हे दिवाळी दरम्यान झालेल्या अकाली पाऊसामुळे असुन यामध्ये महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचे सुमारे ४० हजार कोटींचे उभे पीक नष्ट झाले आहे व याचा भारत सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणाचा संबंध नसुन महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आपल्या फक्त १० टक्के उरलेल्या कांद्याला थोडा भाव मिळत असल्यामुळे ग्राहक संघटना सहकार्य करीत आहेत फक्त मूठभर  माध्यमांनी साऱ्या मध्यम वर्गीयांचा ठेका घेत सतत कांदा हा विषय लावून धरला आहे ही ओरड करणाऱ्यांनी  जैन बांधवांचा सल्ला घ्यावा कारण युगाणयुगे ते कांदा लसूण शिवाय जगतायेत अनेक समाजात चार चार महीने कांदा न खाता सहज जगतात व त्यांचे विकारही कमी होतात आता सर्वच धर्मीय शेतकऱ्यासाठी आम्हीही कांद्याशिवाय वा कमी कांद्याने    जगू शकतो न दाखून दिले आहे कारण आजकाल एका  कुटुंबाला महिन्यात  जास्तीत जास्त ५  किलो कांदा लागतो  आणि बजेट ६०  रुपये कांदा या भावाने केले असेल तर कांदा फक्त ३ किलो खरेदी करा वाढलेलं बजेट सौदर्य प्रसाधन सिनेमा हॉटेल  आणि इतर  खर्च करून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे रहा फक्त हे दोन महिन्यासाठी आहे पुढे रब्बी चा कांदा आला की कांद्याचे भाव जेमतेम २० रुपये  होतील असा विश्वास किशोर तिवारी यांनी व्यक्त केला आहे . 
जेव्हा कांदा २० रुपये किलोच्या खाली होतो तेव्हा शेतकरी सतत तोट्यात असतो  कांही तोटा आज  कमी होतोय तर ही  ओरड करण्याचे मोठे निमित्त दिसत नाही  कारण शेती ही चॅरिटी नाही सतत तोट्यात असलेला व्यवसाय आहे  हे मान्य करावयाला पाहीजे  सद्याची भाववाढ ही निर्सगाचा प्रकोपामुळे केवळ मागणी आणि पुरवठा यामध्ये दोन महिन्याकरिता झाली आहे हे लक्षात घेण्याची गरज असल्याचे किशोर तिवारी म्हटले आहे   कांदा ही  जीवनाव्यशक वस्तू आहे आहे   हा यावर खुली चर्चा करण्याचे आवाहन किशोर तिवारी यांनी केले आहे . 
कांदा झाला नाहीतर   गरिबांचे  काय होईल याची चिंता करणाऱ्या सरकारने कांद्यावर सरळ १०० टक्के अनुदान द्यावे कारण  आपलं बजेट सांभाळून चटणी भाकरी खाऊन आनंदी  असतात त्यामुळे विवेकशील  ग्राहकांनी मूठभर लोकांनी प्रसिद्धीसाठी सुरु केलेल्या कांगावा नजरअंदाज करावा  अशी विनंती शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी केली आहे . 
================================================

Wednesday, November 6, 2019

परतीच्या पाऊसाचा कहर सुरूच -८० लाख हेक्टरमधील पिकांचे नुकसान -किशोर तिवारी यांचा ७ नोव्हेंबरचा यवतमाळ जिल्हा दौरा

 परतीच्या पाऊसाचा कहर सुरूच -८० लाख हेक्टरमधील पिकांचे नुकसान -किशोर तिवारी यांचा ७ नोव्हेंबरचा यवतमाळ जिल्हा दौरा 
दिनांक - ६ नोव्हेंबर  २०१९ 

दररोज पडत असलेल्या परतीच्या वादळी पाऊसाचा कहर दररोज नवीन नवीन क्षेत्रात पसरत असुन आता खरीपासोबत रबीचे क्षेत्र नापिकीच्या व नुकसानीच्या पट्टयात आले असुन आता संपुर्ण महाराष्ट्राचे -८० लाख हेक्टरमधील ३० हजार कोटीचे पिकांचे नुकसान झाले असुन यापुर्वी ऐन दिवाळीत प्रचंड वादळी पाऊसाने कहर केला असुन अख्ख्या महाराष्ट्रात अंदाजे कमीतकमी ६०  लाख हेक्टरमधील  सोयाबीन धान कापुस व तुरीचे सह भाजीपाला व फळ बागायतीचे प्रचंड नुकसान झाले होते मात्र महसुल खात्याचे माजलेले अधिकारी व कर्मचारी त्यामध्येच अधिकारी व कर्मचारीच नसलेल्या कृषी विभागाच्या झळामुळे शेतकरी वैतागले असुन सारे आमदार मंत्रिपदासाठी एकदिवसाचा धावता दौरा करून व आपले फोटो सोशल व प्रिंट मीडियामध्ये प्रसिद्ध करून आपले शेतकरी प्रेम दाखवून मोकळे झाले आहेत त्यातच आजही विमा कंपनीचे अधिकारी व पंचनामे होत नसल्याच्या तक्रारींचा पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी नेते व शिवसेना प्रमुखांचे कृषी सल्लागार किशोर तिवारी यांनी केळापूर व घाटंजी तालुक्यात शेतकऱ्यांच्या अडचणी व कोणीही नुकसानभरपाई पासुन वंचित राहणार नाही यासाठी वगारा टाकली, मंगी सगदा सावंगी गणेरी रामपूर भिमकुंड ( तालुका घाटंजी ) तसेच केळापूर तालुक्यातील कारेगाव बंडल  येथे घुबडी हिवरी कोदोरी चन्नाका खैरी अर्ली परिसरातील शेतकऱ्यांना ७ नोव्हेंबरला भेटणार  आहेत . 

महाराष्ट्र सरकारने १० हजार कोटीची तातडीची मदत देऊन तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेसह सर्व खासदार व आमदारांनी नासीडीच्या शेतात जाऊन  शेतकऱ्यांचे अश्रु पुसण्याचा  प्रयन्त केल्याबद्दल शेतकरी नेते व शिवसेना प्रमुखांचे कृषी सल्लागार किशोर तिवारी यांनी आभार मानले आहेत असुन यावर्षी दिवाळीच्या एकदिवसा पूर्वीपर्यंत  आठवाड्याभरापासून महाराष्ट्रात अवकाळी परतीच्या  दमदार पाऊस सुरू झाला होता   ऐन दिवाळीमध्येही पावसाने विदर्भ  आणि मराठवाड्यतील जिल्ह्यातील अनेक गावांना झोडपून काढले. शुक्रवारी (२५ ऑक्टोबर) सकाळी साडेआठ वाजेपर्यंत या विभागातील ८० टक्के   महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली होती मात्र मागून आलेल्या  पावसानंतर मराठवाड  पाठोपाठ आता विदर्भातील अनेक  जिल्ह्याने पावसाची वार्षिक सरासरीपेक्षा दिंडी ओलांडली आहे.या अवकाळी पावसाने केलेल्या प्रचंड नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे दररोज होत असलेल्या पाऊसाने तसेच १५ दिवसांपासून ओला झालेला  सोयाबीन धान कापुस व तुरीचे सह भाजीपाला व फळ बागायतीतील माल पंचनाम्याची वाट पाहून थकलेल्या शेतकऱ्यांनी कोंब निघत असल्यामुळे महसुल व कृषी विभाग हतबल असुन आता मुख्यमंत्र्यांनी आपल्या ग्रामीण नुकसानग्रस्त क्षेत्रातील पन्ना प्रमुख ,बुथ प्रमुख ,शक्ती प्रमुख ,विधानसभा क्षेत्र विस्तारक ह्या कंत्राटी फौजेसह वॉर रुममधील पगारी नियंत्रक सर्वे टीमचे खोटे रीपोर्ट देणारे कर्मचारी ,निकामी पगारी प्रवक्ते यांना कमी लाऊन ज्या ग्रामीण महाराष्ट्राने भाजप तेल लावलेले उमेद्वाराना आमदार केले व सत्तेचा वाट दाखविली त्याना वाचविण्यासाठी २४ तासात फोटो-पंचनामे करण्याचे आदेश द्यावे  असे आवाहन शेतकरी नेते व शिवसेना प्रमुखांचे कृषी सल्लागार किशोर तिवारी यांनी केले आहे .
==================================================================

Wednesday, May 22, 2019

नवीन भाजपप्रणीत सरकार व भाजपमध्ये सत्ताकेंद्रे विभागाण्याबाबत सर संघचालक मा.श्री.डॉ.मोहन भागवत यांना निवेदन तजी

संदर्भ -२०१९/निवडणुक निकाल /२६                                              दिनांक -२३ मे २०१९                                                     
प्रति ,


पुज्यनीय सर संघचालक 
मा.श्री.डॉ.मोहन भागवतजी  
महाल ,नागपुर 








संदर्भ -लोकसभा निवडणुका २०१९ चे निकाल . 
विषय -नवीन भाजपप्रणीत सरकार व भाजपमध्ये सत्ताकेंद्रे विभागाण्याबाबत .  
आदरणीय महोदय ,
सादर प्रणाम ,
मी विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आदीवासी भागातील सामाजिक कार्यकर्ता आहे व  मागील डिसेंबरमधे कांहीं राज्यातील निवडणुकीच्या निकालानंतर बोध घेवून भाजपचे नेतृत्व नितीन गडकरी यांना द्यावे अशी विनंती मी संघश्रेष्ठीना केली होती. त्यावेळी  नितीन गडकरी यांना भरपुर मानसीक त्रास झाला व होत आहे,ते हाडाचे कार्यकर्ते आहेत. त्यांना पदाची लालसा नाही, हे सत्य आता भारताला कळले आहे मात्र पुन्हा एकदा हा मुद्दा आपणासमोर सविनय चर्चेला ठेवत आहे कारण आज राष्ट्रीय स्तरावर भाजपमध्ये मा. अटलबिहारी वाजपेयी गेल्यानंतर एक सर्वांना सोबत घेऊन चालण्याची क्षमता असलेला समावेशक नेता भाजपने दिला नाही अशी गंभीर चर्चा होत आहे ,कारण आज राजकीय,सामाजिक,औदयोगिक, शिक्षण व धार्मिक क्षेत्रात विचारवंत परिस्थितीच्या दुराव्याने चिंतीत आहेत. ही विचारधारा संघ परिवारातही चर्चेत आहेत. मात्र अटलबिहारी वाजपेयी  यांच्या कार्यकाळात ही कटुता दिसत नव्हती, यावर संघाने गंभीरपणे विचार करण्याची गरज असल्यामुळे जनतेमध्ये काम करणारे व जनतेमधुन निवडणुक जिंकणारे नेते महत्वाच्या पदावर बसविण्याची गरज निर्माण झाली आहे. 
मोदी सरकारमध्ये  आर्थिक राजकीय , सामाजिक , औदयोगिक ,शिक्षण, ऊर्जा, व्यापार ,वाणिज्य ,विदेश संबंध  व धार्मिक क्षेत्रात धोरणात्मक निर्णय घेणारी चमू मागील दारेने  येणारी असल्यामुळे व जनतेमध्ये हिशोब देण्यासाठी जाणे गरजेचे नसल्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण होत होते संघ परीवारातील  व भाजपच्या तळागाळाच्या  कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्याच्या तक्रारी वारंवार येत होत्या  अशावेळी भाजपप्रणीत सरकार व भाजपमध्ये सत्ताकेंद्रे विभागणे ही काळाची गरज आहे,कारण व्यक्ती ही राष्ट्रापेक्षा व संघटनेपेक्षा मोठा होऊ शकत नाही. यावर यावेळी हा विचार  झालाच पाहीजे ही विनंती करण्यासाठी आपणास पात्र देत आहे . भाजपला आजच्या दैदित्यामान स्तरावर आणणाऱ्या कार्यकर्त्यांना यावेळी आपणच  न्याय देऊ शकतात, असे मला वाटते कारण ज्या भाजप नेत्यांनी  यांच्या अहोरात्र मेहनतीने देशात रस्ते व जल वाहतूक क्षेत्रात झालेल्या क्रांतिकारक विकासा च्या कामाची खुद काँग्रेस नेत्या सोनियाजी गांधी व लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मुक्त कंठाने तारीफ केली, अशा समावेशक- विकास पुरुष लोकनेत्याला धर्म व जातीच्या बंधनात  अडकविण्याचा सुरु असलेला  प्रयन्त, राष्ट्रीय राजकीय अस्थितेला आमंत्रण देणारा असल्याचे मला वाटते कारण देशात  सर्व समावेशक राजकारणाची सुरुवात संघ परिवाराने करावी ही काळाची गरज आहे.
आपला नम्र 
किशोर तिवारी, 
अध्यक्ष, 
विदर्भ जनआंदोलन समिती
९४२२१०८८४६

Sunday, March 3, 2019

हिंस्त्रवन्य प्राण्यांच्या संचार व दहशतीमुळे शेतकरी / शेतमजूर यांचे होणारे उपजिविका नुकसानीकरीता अर्थसहाय्य निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकार द्वारे एक उच्चाधिकार अभ्यास समिती गठित : महाराष्ट्र सरकारचे फार चांगले सकारात्मक पाऊल : किशोर तिवा


हिंस्त्रवन्य प्राण्यांच्या संचार व दहशतीमुळे शेतकरी / शेतमजूर यांचे होणारे उपजिविका नुकसानीकरीता अर्थसहाय्य निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकार द्वारे एक उच्चाधिकार अभ्यास समिती गठित : महाराष्ट्र सरकारचे फार चांगले सकारात्मक पाऊल : किशोर तिवारी
दिनांक ३ मार्च २०१९

हिंस्त्रवन्य प्राण्यांच्या संचार व दहशतीमुळे शेतकरी / शेतमजूर यांचे होणारे उपजिविकेच्या नुकसानीकरीता अर्थसहाय्य निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक उच्चाधिकार अभ्यास समिती गठित केली असून वन्यप्राण्यांच्या शेती व नागरी क्षेत्रातील प्रचंड हैदोसाने होणाऱ्या अतोनात नुकसानीचे आकलन करण्यासाठी एक प्रभावी कायदा त्वरित अमलात आणावा , ही महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केलेली मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वन मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी मान्य केली आहे. 
या संबंधीचा शासन आदेश नुकताच काढण्यात आला असून राज्याच्या वन्य जीव संरक्षण चेअतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक सुनिल लिमये या समितीचे अध्यक्ष तर महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण चे विधी सदस्य तथा ज्येष्ठ विधितद्यं एड. विनोद तिवारी या समितीचे समन्वयक सदस्य असून नामवंत विधी तज्ञ एड. फिरदौस मिर्झा (नागपूर/यवतमाळ), एड. सुहास तुळजापूरकर (औरंगाबाद), सौ. मुग्धा रोहन चांदूरकर ( उच्च न्यायालय नागपूर), एड. इंतियाज खैरडी (सोलापूरकर), एड. नीतेश भूतेकर पाटील (वाशिम) व शेतकरी आंदोलक मोहन किसन जाधव (यवतमाळ) यांचे सह माजी प्रधान मुख्य वनसंरक्षक तस्निम अहमद , मुख्य वन संरक्षक रविकिरण गोवेकर हे या समितीचे सदस्य आहेत. मुख्य वन संरक्षक अमित कळसकर हे या उच्चाधिकार समिती चे सदस्य सचिव आहेत. 

यवतमाळ जिल्ह्यातील टी-१ अवनी वाघिणीच्या हल्ल्यात पांढरकवडा वनविभागांतर्गत १३ निष्पाप शेतकरी व आदिवासींचे बळी गेलेत. हे बळी घेणा-या वाघिणीला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशनुसार गोळी घालून ठार करण्यात आले. मात्र त्यावर देशभर मोठे वादळ उठले आहे. या पार्श्वभूमीवर किशोर तिवारी यांनी ही मागणी केली होती.
नागरी क्षेत्रात व जंगलाशेजारील शेतीमध्ये वन्यप्राण्यांनी घातलेल्या हैदोसाने व दहशतीने  महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील शेतकरी, ग्रामीण जनता त्रस्त आहे. त्यांचे कोट्यवधींचे  नुकसान व जीवितहानी होत आहे. त्याची भरपाई देण्यासाठी स्वतंत्र कायदा देशात अस्तित्वात नाही. म्हणूनच त्वरित एक सक्षम कायदा करावा, शेती व नागरी नुकसानीचे व दहशतीने झालेले अप्रत्यक्ष नुकसानाचे आकलन करण्यासाठी स्वतंत्र संवैधानिक आयोग स्थापन करावा, अशी महत्त्वपूर्ण सूचना वजा मागणी किशोर तिवारी यांनी सातत्याने केली होती. 

एकी कडे वन्यप्राण्यांच्या प्रेमापोटी व प्राणी संवर्धन संस्थांच्या दबावाखाली सरकार हिंस श्र्वपदांच्या बंदोबस्तासाठी कोणतीही उपाययोजना करू शकत नाही. प्राण्यांची शिकार व हत्या होऊ नये, हे जितके महत्त्वपूर्ण आहे, त्या पेक्षाही जास्त शेतकरी व ग्रामीण जनतेचा माल व जीवन सुरक्षित करणे व उपजीविका अबाधित राखणे आवश्यक आहे. ग्रामीण जनता व शेतकरी हतबल झाले असून विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांच्या सत्रामागे हे सुद्धा एक प्रमुख कारण पुढे आले आहे. मात्र त्याची शासनाने या पूर्वी दखल घेतली नसल्याने तिवारी यांनी या संबंधात मागणी रेटली होती. ती राज्य सरकारने मान्य करून नवीन कायदा व नुकसान भरपाई चे मूल्यमापन या साठी अभ्यास समिती स्थापन करून सकारात्मक पुढाकार घेणारे महाराष्ट्र आपल्या देशातील पहिले राज्य ठरले आहे.
हिंस्त्रवन्य प्राण्यांच्या संचार व दहशतीमुळे शेतकरी / शेतमजूर यांचे होणारे उपजिविकेचे नुकसानीकरीता अर्थसहाय्य निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने फार चांगले पाऊल उचलले आहे, अशी प्रतिक्रीया किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे.
==========================================

Thursday, February 28, 2019

ठाणेदार अनिलसिंग गौतम यांची बदली हा दोन नंबरच्या मस्तवालांचा जनतेच्या अस्मीतेवर झालेला विजय -किशोर तिवारी

ठाणेदार अनिलसिंग गौतम यांची बदली हा दोन नंबरच्या मस्तवालांचा जनतेच्या अस्मीतेवर झालेला विजय -किशोर तिवारी    
दिनांक -२८ फेबू. २०१९
मंत्रीपदा हुद्दा सरकारने दिलेल्या चळवळीच्या नेत्याने लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने चालू असलेला वरळी मटका जुगार भ्र्ष्ट पोलीस यंत्रणेसमोर व्हिडीओ शूटींग करून समाजाच्या वेशीवर टांगल्यानंतर सडलेली व कुचलेली व्यवस्था झोपेतुन जगल्याचे सोंग करते व लोकलाजेस्तव मस्तवाल ठाणेदाराची तात्काळ बदली करून  अनिलसिंग गौतम सारख्या कर्तव्यवेड्या जिंदादिल माणसाची ठाणेदार म्हणून पांढरकवड्यात बदली करण्यात येते व एका रात्रीतुन सारे अवैद्य धंदे बंद होतात अख्ख्या जिल्ह्यात या घटनेचे प्रतिसाद उमटतात सगळीकडे  शहरातीलच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात खेडयापाडयात दारू मटका गुटखा जवळपास बंद होतो यामुळे तालुक्यातील अवैध धंदे, दारू मटका गुटखा जुगार यावरील प्रतिदिन जवळपास दीड  कोटी  रुपये जनतेचे वाचणे सुरु होते ,विनाकारण जलणारा पेट्रोल डिझेल वरील खर्च कमी झाला, पूर्ण तालुक्यातील जनता रात्री १० वाजता घरी कुटूंबासोबत शांततेने राहतात ,शेतकरी शेतमजूर त्यांचे कुटुंब महिला मूले आनंदी व सुखी होतात म्हणूनच सर्व दोननंबरचे धंदे करणाऱ्या  लोकांच्या पोटदुखीतून ठाणेदार गौतम यांच्या विरोधात आरोप कटकारस्थान करण्यात येते व फक्त ३८ दिवसात समाजाच्या सुखाकरीता तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचे राज्य पुनर्स्थापीत करणाऱ्या ठाणेदार अनिलसिंग गौतम यांच्या उचलबांगडी म्हणजे दोन नंबरच्या मस्तवालांचा राजकीय दिवाळखोरीला लागलेला नेत्यांच्या मदतीने सामान्य वंचीत उपेक्षित जनतेच्या अस्मितेवर विजय असल्याची जळजळीत प्रतिक्रिया कै वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे . 
आपणास ही बदली निवडणूक आयोगाच्या सुधारीत सूचनांचा पालन करण्यास करण्यात आल्याचे सुरुवातीला सांगण्यात आहे मात्र यावर आपण निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना ठाणेदार गौतम यांच्या अभूतपूर्व कार्यशैलीची व पांढरकवडा परीसरात ३० दिवसात केलेल्या सुधारणेची माहीती दिल्यावर हा निवडणूक आयोगाच्या सूचनांचा पोटभरू अधिकाऱ्यांनी राजकीय दडपणाखाली झाल्याचे सांगण्यात आले त्यातच आपण मागील चार दिवसापासून तालुक्यात दौरे करीत असतांना मला प्रत्येक गावात दोनच दिवसात बंद झालेला दारू मटका गुटखा सुरु झाल्याची ओरड व तक्रारी करीत असुन दोन नंबरवाल्याची दलाली करणाऱ्या नेत्यांना शिव्या देण्यात येत असल्यामुळे आपले फिरणे कठीण झाले असल्याची खंत किशोर तिवारी यांनी व्यक्त केली असुन आता जनतेनी मशाली घेऊन या सर्व दोन नंबरचे धंदे करणारे त्यांच्या मदतीने राजकारण करणारे  ढोंगी नेते यांना बदलल्याशिवाय परिस्थिती सुधारणार नाही असा इशाराही किशोर तिवारी यांनी यावेळी दिला . 
मागील काही दिवसापासून संपूर्ण जिल्ह्यात  अनिलसिंग गौतम यांना कोणत्याही परिस्थितीमधे आई पी एल क्रिकेट पूर्वी व निवडणुकीच्या जुगारापूर्वी याला कंट्रोल रूम ठेवा यासाठी डी आई जी पासुन सर्व भाडखाऊ नेत्यांना मोठी रक्कम देण्यात आल्याची चर्चा सुरु होती त्यातच पोलीस स्टेशन विक्रीचा सोहळा नुकताच पार पाडण्यात आल्याची माहीती पोलीस स्टेशन विकत घेण्यात कमी पडलेल्या पोलीस अधिकाऱ्याने आपणास दिली असल्याची माहीती किशोर तिवारी यांनी दिली असुन आपण हा सर्व प्रकार पंतप्रधान नरेंद्र मोदींना सादर करणार असून यासर्व नेत्यांची हकालपट्टी करा वा आम्हचा रामराम घ्या अशी निर्वाणीची विनंती करणार असल्याची माहीती किशोर तिवारी यांनी यावेळी दिली . 
===============================================================================================================