Sunday, March 3, 2019

हिंस्त्रवन्य प्राण्यांच्या संचार व दहशतीमुळे शेतकरी / शेतमजूर यांचे होणारे उपजिविका नुकसानीकरीता अर्थसहाय्य निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकार द्वारे एक उच्चाधिकार अभ्यास समिती गठित : महाराष्ट्र सरकारचे फार चांगले सकारात्मक पाऊल : किशोर तिवा


हिंस्त्रवन्य प्राण्यांच्या संचार व दहशतीमुळे शेतकरी / शेतमजूर यांचे होणारे उपजिविका नुकसानीकरीता अर्थसहाय्य निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकार द्वारे एक उच्चाधिकार अभ्यास समिती गठित : महाराष्ट्र सरकारचे फार चांगले सकारात्मक पाऊल : किशोर तिवारी
दिनांक ३ मार्च २०१९

हिंस्त्रवन्य प्राण्यांच्या संचार व दहशतीमुळे शेतकरी / शेतमजूर यांचे होणारे उपजिविकेच्या नुकसानीकरीता अर्थसहाय्य निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक उच्चाधिकार अभ्यास समिती गठित केली असून वन्यप्राण्यांच्या शेती व नागरी क्षेत्रातील प्रचंड हैदोसाने होणाऱ्या अतोनात नुकसानीचे आकलन करण्यासाठी एक प्रभावी कायदा त्वरित अमलात आणावा , ही महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केलेली मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वन मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी मान्य केली आहे. 
या संबंधीचा शासन आदेश नुकताच काढण्यात आला असून राज्याच्या वन्य जीव संरक्षण चेअतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक सुनिल लिमये या समितीचे अध्यक्ष तर महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण चे विधी सदस्य तथा ज्येष्ठ विधितद्यं एड. विनोद तिवारी या समितीचे समन्वयक सदस्य असून नामवंत विधी तज्ञ एड. फिरदौस मिर्झा (नागपूर/यवतमाळ), एड. सुहास तुळजापूरकर (औरंगाबाद), सौ. मुग्धा रोहन चांदूरकर ( उच्च न्यायालय नागपूर), एड. इंतियाज खैरडी (सोलापूरकर), एड. नीतेश भूतेकर पाटील (वाशिम) व शेतकरी आंदोलक मोहन किसन जाधव (यवतमाळ) यांचे सह माजी प्रधान मुख्य वनसंरक्षक तस्निम अहमद , मुख्य वन संरक्षक रविकिरण गोवेकर हे या समितीचे सदस्य आहेत. मुख्य वन संरक्षक अमित कळसकर हे या उच्चाधिकार समिती चे सदस्य सचिव आहेत. 

यवतमाळ जिल्ह्यातील टी-१ अवनी वाघिणीच्या हल्ल्यात पांढरकवडा वनविभागांतर्गत १३ निष्पाप शेतकरी व आदिवासींचे बळी गेलेत. हे बळी घेणा-या वाघिणीला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशनुसार गोळी घालून ठार करण्यात आले. मात्र त्यावर देशभर मोठे वादळ उठले आहे. या पार्श्वभूमीवर किशोर तिवारी यांनी ही मागणी केली होती.
नागरी क्षेत्रात व जंगलाशेजारील शेतीमध्ये वन्यप्राण्यांनी घातलेल्या हैदोसाने व दहशतीने  महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील शेतकरी, ग्रामीण जनता त्रस्त आहे. त्यांचे कोट्यवधींचे  नुकसान व जीवितहानी होत आहे. त्याची भरपाई देण्यासाठी स्वतंत्र कायदा देशात अस्तित्वात नाही. म्हणूनच त्वरित एक सक्षम कायदा करावा, शेती व नागरी नुकसानीचे व दहशतीने झालेले अप्रत्यक्ष नुकसानाचे आकलन करण्यासाठी स्वतंत्र संवैधानिक आयोग स्थापन करावा, अशी महत्त्वपूर्ण सूचना वजा मागणी किशोर तिवारी यांनी सातत्याने केली होती. 

एकी कडे वन्यप्राण्यांच्या प्रेमापोटी व प्राणी संवर्धन संस्थांच्या दबावाखाली सरकार हिंस श्र्वपदांच्या बंदोबस्तासाठी कोणतीही उपाययोजना करू शकत नाही. प्राण्यांची शिकार व हत्या होऊ नये, हे जितके महत्त्वपूर्ण आहे, त्या पेक्षाही जास्त शेतकरी व ग्रामीण जनतेचा माल व जीवन सुरक्षित करणे व उपजीविका अबाधित राखणे आवश्यक आहे. ग्रामीण जनता व शेतकरी हतबल झाले असून विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांच्या सत्रामागे हे सुद्धा एक प्रमुख कारण पुढे आले आहे. मात्र त्याची शासनाने या पूर्वी दखल घेतली नसल्याने तिवारी यांनी या संबंधात मागणी रेटली होती. ती राज्य सरकारने मान्य करून नवीन कायदा व नुकसान भरपाई चे मूल्यमापन या साठी अभ्यास समिती स्थापन करून सकारात्मक पुढाकार घेणारे महाराष्ट्र आपल्या देशातील पहिले राज्य ठरले आहे.
हिंस्त्रवन्य प्राण्यांच्या संचार व दहशतीमुळे शेतकरी / शेतमजूर यांचे होणारे उपजिविकेचे नुकसानीकरीता अर्थसहाय्य निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने फार चांगले पाऊल उचलले आहे, अशी प्रतिक्रीया किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे.
==========================================

Thursday, February 28, 2019

ठाणेदार अनिलसिंग गौतम यांची बदली हा दोन नंबरच्या मस्तवालांचा जनतेच्या अस्मीतेवर झालेला विजय -किशोर तिवारी

ठाणेदार अनिलसिंग गौतम यांची बदली हा दोन नंबरच्या मस्तवालांचा जनतेच्या अस्मीतेवर झालेला विजय -किशोर तिवारी    
दिनांक -२८ फेबू. २०१९
मंत्रीपदा हुद्दा सरकारने दिलेल्या चळवळीच्या नेत्याने लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने चालू असलेला वरळी मटका जुगार भ्र्ष्ट पोलीस यंत्रणेसमोर व्हिडीओ शूटींग करून समाजाच्या वेशीवर टांगल्यानंतर सडलेली व कुचलेली व्यवस्था झोपेतुन जगल्याचे सोंग करते व लोकलाजेस्तव मस्तवाल ठाणेदाराची तात्काळ बदली करून  अनिलसिंग गौतम सारख्या कर्तव्यवेड्या जिंदादिल माणसाची ठाणेदार म्हणून पांढरकवड्यात बदली करण्यात येते व एका रात्रीतुन सारे अवैद्य धंदे बंद होतात अख्ख्या जिल्ह्यात या घटनेचे प्रतिसाद उमटतात सगळीकडे  शहरातीलच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात खेडयापाडयात दारू मटका गुटखा जवळपास बंद होतो यामुळे तालुक्यातील अवैध धंदे, दारू मटका गुटखा जुगार यावरील प्रतिदिन जवळपास दीड  कोटी  रुपये जनतेचे वाचणे सुरु होते ,विनाकारण जलणारा पेट्रोल डिझेल वरील खर्च कमी झाला, पूर्ण तालुक्यातील जनता रात्री १० वाजता घरी कुटूंबासोबत शांततेने राहतात ,शेतकरी शेतमजूर त्यांचे कुटुंब महिला मूले आनंदी व सुखी होतात म्हणूनच सर्व दोननंबरचे धंदे करणाऱ्या  लोकांच्या पोटदुखीतून ठाणेदार गौतम यांच्या विरोधात आरोप कटकारस्थान करण्यात येते व फक्त ३८ दिवसात समाजाच्या सुखाकरीता तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचे राज्य पुनर्स्थापीत करणाऱ्या ठाणेदार अनिलसिंग गौतम यांच्या उचलबांगडी म्हणजे दोन नंबरच्या मस्तवालांचा राजकीय दिवाळखोरीला लागलेला नेत्यांच्या मदतीने सामान्य वंचीत उपेक्षित जनतेच्या अस्मितेवर विजय असल्याची जळजळीत प्रतिक्रिया कै वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे . 
आपणास ही बदली निवडणूक आयोगाच्या सुधारीत सूचनांचा पालन करण्यास करण्यात आल्याचे सुरुवातीला सांगण्यात आहे मात्र यावर आपण निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना ठाणेदार गौतम यांच्या अभूतपूर्व कार्यशैलीची व पांढरकवडा परीसरात ३० दिवसात केलेल्या सुधारणेची माहीती दिल्यावर हा निवडणूक आयोगाच्या सूचनांचा पोटभरू अधिकाऱ्यांनी राजकीय दडपणाखाली झाल्याचे सांगण्यात आले त्यातच आपण मागील चार दिवसापासून तालुक्यात दौरे करीत असतांना मला प्रत्येक गावात दोनच दिवसात बंद झालेला दारू मटका गुटखा सुरु झाल्याची ओरड व तक्रारी करीत असुन दोन नंबरवाल्याची दलाली करणाऱ्या नेत्यांना शिव्या देण्यात येत असल्यामुळे आपले फिरणे कठीण झाले असल्याची खंत किशोर तिवारी यांनी व्यक्त केली असुन आता जनतेनी मशाली घेऊन या सर्व दोन नंबरचे धंदे करणारे त्यांच्या मदतीने राजकारण करणारे  ढोंगी नेते यांना बदलल्याशिवाय परिस्थिती सुधारणार नाही असा इशाराही किशोर तिवारी यांनी यावेळी दिला . 
मागील काही दिवसापासून संपूर्ण जिल्ह्यात  अनिलसिंग गौतम यांना कोणत्याही परिस्थितीमधे आई पी एल क्रिकेट पूर्वी व निवडणुकीच्या जुगारापूर्वी याला कंट्रोल रूम ठेवा यासाठी डी आई जी पासुन सर्व भाडखाऊ नेत्यांना मोठी रक्कम देण्यात आल्याची चर्चा सुरु होती त्यातच पोलीस स्टेशन विक्रीचा सोहळा नुकताच पार पाडण्यात आल्याची माहीती पोलीस स्टेशन विकत घेण्यात कमी पडलेल्या पोलीस अधिकाऱ्याने आपणास दिली असल्याची माहीती किशोर तिवारी यांनी दिली असुन आपण हा सर्व प्रकार पंतप्रधान नरेंद्र मोदींना सादर करणार असून यासर्व नेत्यांची हकालपट्टी करा वा आम्हचा रामराम घ्या अशी निर्वाणीची विनंती करणार असल्याची माहीती किशोर तिवारी यांनी यावेळी दिली . 
===============================================================================================================

Wednesday, February 27, 2019

Pradhan Mantri Kisan Samman Nidhi (PM-Kisan) scheme :Restrict it to Sustainable Agriculture : Kishor Tiwari

Pradhan Mantri Kisan Samman Nidhi (PM-Kisan) scheme :Restrict it to Sustainable Agriculture : Kishor Tiwari 
Dated -28th February 2019
After Prime Minister Narendra Modi launched the ambitious Pradhan Mantri Kisan Samman Nidhi (PM-Kisan) scheme,giving direct cash subsidy of Rs.6000 per year transferring the first installment of ₹2,000 each to  all the farmers whose land holding is less than 2 hector has come for larger criticism from the farm activist of Maharashtra who is heading special task force to-tackle the agrarian crisis of farm suicides capital of India advocating the demand of restricting this (PM-Kisan) scheme to rain fed drought hit  dying farmers instead of  all farmers who are consuming lot of water for farming and farmers taking cash crop by using chemical fertilizers as the facility of cash grant will not serve any purpose of addressing agrarian crisis of region , said Chairman of late Vasantrao Naik Sheti Swavalamban Mission (VNSSM), Kishor Tiwari. today.
A press release issued by Tiwari here on Thursday has mentioned that 70 per cent environmental pollution across the world has been a result of using chemical fertilizers and pesticides in agriculture. In the name of green revolution,a handful of industrialists have been selling chemical insecticides and fertilizers by adding toxin to each drop of water.The rampant use of chemical fertilizers and insecticides has resulted in degradation of environment and biodiversity hence to protect the environment and ecosystem it is must to stop this disaster . 
For the first time, in its interim budget, Government in cen­tre has declared Rs 6,000 as annul grant to farmers having two acres of agriculture land. Farmers having irrigation facilities and cultivating sugarcane , grapes, BT cotton by using chemicals have alleged that the grant amount was very less. These farmers should not given the grant as it is too less to assist the huge cost of their cultivation instead , Government should give the grant to the farmers cultivating crops by using traditional and sustainable methods,Tiwari said in a released.
Kishor Tiwari is working for farmers in suicide prone region of Vidarbha since last 30 years. The companies manufacturing chemical fertilizers and insecticides have inspired farmers to use chemicals and excessive water for farming.This has resulted in rise in carbon-dioxide and pollution. The developed countries have given the name climate change to this pollution. They have deprived farmers from organic farming and traditional methods. 
Tiwari is fighting with the Government to make soil rejuvenation  and  make soil-water free from chemicals.Unfortunately, Government has continued giving grant to those farmers using excessive water and chemicals for farming. 
Tiwari demanded that the real need of the time is to give the grant for farmers using traditional sustainable methods and using organic farming for the farmers really working for environmental protection by using organic farming methods, a release said.
===================================================================

Wednesday, February 6, 2019

ज्या खेड्यातून आंदोलनाची सुरवात केली त्या माळपठाराच्या पारध येथे किशोर तिवारी करणार ८ फेबु.ला मुक्काम


ज्या खेड्यातून आंदोलनाची सुरवात केली त्या माळपठाराच्या पारध येथे   किशोर तिवारी करणार ८ फेबु.ला मुक्काम 
दिनांक - ७ फेबु  २०१९
२५ वर्षांपूर्वी ज्या पुसद तालुक्यातील माळपठाराच्या कै वसंतराव नाईकांच्या जन्मस्थानाच्या लगतच्या  पारध प्रकल्पग्रस्तांसाठी साठी पुसदच्या उपविभागीय अधिकाऱ्याला  बदडा आंदोलन करून संपूर्ण  पारधवासीयांसोबत तुरंगवासाची दोन महीने हवा घेतल्यांनंतर आता पुन्हा एकदा त्याच पारधमध्ये यावेळी मात्र आंदोलक म्हणून नाहीतर   कै वसंतराव नाईकांच्याचे नाव अख्ख्या जगात गाजवीत महाराष्ट्र सरकारच्या मंत्रीपदाचा अधिकार घेऊन येत्या ८ फेबु. रात्री मुक्कामाला जात असुन  सारे    पारधवासी तयारीला लागले असुन किशोर तिवारी यांच्या सोबत सर्व विभागाचे अधिकारीसुद्धा जात असून  सध्या यवतमाळ जिल्ह्यात ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासनाच्या वतीने महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान राबवण्यात येत आहे. या अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात ३६ गावांत हे अभियान सुरू असून ग्राम विकासासाठी आता अधिकारी गावागावात मुक्काम करून नागरिकांशी संवाद साधत आहे. या अभिनव उपक्रमामुळे गावाच्या विकासाला चालना मिळत आहे. 

किशोर तिवारी यांच्यासोबत या भागातील लोकनेते आमदार मनोहरजी नाईक व निलयजी नाईक सर्व लोकप्रतिनिधी ,सर्व पक्षांचे व सामाजिक संस्थांचे नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत  तरी ८ फेबु.ला संध्याकाळी ७ वाजता पारध येथे  आयोजित सरकार आपल्या दारी कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन आयोजक मौजे पारध    येतील  नागरिक  जनार्धन महाराज  सरपंच उषा वसंत चव्हाण  उपसरपंच दयाराम जाणू  राठोड  व सदस्य प्रल्हाद चव्हाण शांताबाई राठोड  अनिता राठोड संदीप राठोड अनिता बोंम्बले उशाबाई  घेणेकर सत्यपाल राठोड सुलोचना  सहारे   इंगोले  पोलीस पाटील  विमा शंकर  राठोड  तंटामुक्ती  अध्यक्ष नारायण राठोड   नागरिक संजय हरणे   रमेश गावंडे मोहन चव्हाण रामधन जाधव मनोज  घेणेकर किशन गावंडे व इतर सर्व गावकऱ्यांनी केली आहे . 
यावर्षी नववर्षाच्या सुरुवातीलाच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुसद तालुक्यातील रोहदा येथे मुक्काम करून नागरिकांशी संवाद साधला होता. आतापर्यंत जवळपास २० अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या गावात मुक्काम केला असुन यातून गावातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यात यश येत आहे ,गावात मुक्काम केल्याने गावातील नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी अधिकाऱ्यांना बराच वेळ मिळतो या जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अनुभवाचा आदर्श घेऊन  कै वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी प्रकल्पग्रस्त पुसद  तालुक्यातील पारध या दुर्गम खेड्यात करण्याचा निर्णय घेतला आहे . 
किशोर तिवारी संध्याकाळी ६ वाजता पारध  येथे आरोग्य विभागाच्या प्रेरणा प्रकल्पाअंतर्गत परीसरातील गावातील सर्व शेतकरी शेतमजूर व  युवक सोबतच मुलांशी सामाजिक विषयांवर सल्लामसलत करतील व रात्री मुक्काम करतील  . ९ फेबु .ला सकाळी ७ ते ९ वाजता प्रत्येक घरात भेट देतील व संवाद साधणार आहेत . या संवाद कार्यक्रमात  परीसरातील गावातील सर्व शेतकरी शेतमजूर व  युवक सोबतच मुलांना निरोप व आणण्याची जबाबदारी प्रशासन, आरोग्य विभाग, महीला व बालकल्याण विभाग सोबतच पोलिसांची देण्यात आली आहे यावेळी परीसरातील अवैध धंदे व बेकायदेशीर दारू विक्री ,पोलिसांच्या मदतीने सुरु असलेले वरळी मटका ,चेंगळ कोंबडा बाजार यांच्या व्हिडीओसह तक्रारी सादर कराव्यात अशी विनंती किशोर तिवारी यांनी केली आहे . 
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुसद तालुक्यातील रोहदा येथे मुक्काम केल्यांनतर लोणी गावात बीडीओ समाधान वाघ यांनी मुक्काम केला. त्यानंतर कळंब तालुक्यात गणेशवाडी गावात एसडीओ संदीप अपार, नांझा येथे बीडीओ सुशील संसारे, सहायक बीडीओ पद्माकर मडावी, बेल्लोरीत तहसीलदार सुनील पाटील, नेरमधील चिकणी डोमगा येथे तहसीलदार अमोल पवार, पाथरड गोळे येथे बीडीओ युवराज मेहत्रे हे मुक्कामी होते. उमरखेडमधील चिंचोलीत तहसीलदार भगवान कांबळे व डिप्टी सीईओ मनोहर नाल्हे, करंजीत बीडीओ जयश्री वाघमारे, यवतमाळ तालुक्यातील मुरझडी चिंच येथे शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर, चौधरा गावात जि. प.चे खेरडे व ढोले, घोडखिंडी गावात बीडीओ अमित राठोड, पुसद तालुक्यातील शेलू (खु.) येथे तहसीलदार गरकल व अन्य अधिकाऱ्यांनी मुक्काम केला.या माध्यमातून प्रशासनाचे अधिकारी गाव स्तरावरील समस्या गावातच सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांच्या या मुक्कामामुळे गावाच्या विकासाला चालना  मिळत असल्यामुळे चला खेड्यात मुक्कामाला ही एक चळवळ व्हावी या आशेने आपण कोसारा नंतर पारध मुक्कामाला निवडला आहे . 
=======================================================================

Sunday, November 4, 2018

किशोर तिवारी यांचा उमरी पठार येथील वृद्धाश्रमात ऐन दिवाळीत सरकार आपल्या दारी कार्यक्रम

किशोर तिवारी यांचा  उमरी पठार येथील वृद्धाश्रमात ऐन दिवाळीत सरकार आपल्या दारी कार्यक्रम 
दिनांक -४ नोव्हेंबर २०१८
उद्या ५ नोव्हेंबर सोमवारला शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी उमरी पठार तालुका आर्णी ,जिल्हा यवतमाळ येथील संत श्री डोला महाराज वृद्धाश्रमातील अडचणीच्या व समस्यांची सुनावणी

समाज कल्याण अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी ,जिल्हा  जिल्हा अन्न पुरवडा अधिकारी यांच्या समवेत  करणार  आहेत . या   वृद्धाश्रमात  एकूण ९२ निराधार  वृद्ध आहेत यामध्ये ४१ महिला तर ३६  पुरुष वृद्ध आहेत मात्र प्रशासनातील अधिकारी फक्त २४ वृद्धांची मान्यता असल्यामुळे   यामधील अनेक  वृद्धाना आरोग्य सुरक्षा ,अन्न सुरक्षा ,सामाजिक सुरक्षा सर्वोच न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत .समाज सेवक शेषराव डोंगरे  मोबाईल नंबर ९३२६४४३४४७ मागील दोन दशकापासून अती दुर्गम शेतकरी आत्महत्याग्रस्त मागास भागात हा वृद्धाश्रम समाजाच्या सहकार्याने करीत असून यांना आपल्या  आई वडिलांपेक्षाही चांगली राहण्याची खाण्याची आरोग्याची देखभाल करीत असुन या वृद्धाश्रमात फार दूरवरून  वृद्धाची संख्या वाढतच असल्यामुळे नेर येथील समाजसेवक गणेशभाऊ राऊत यांनी वरील वृद्धाश्रमाच्या प्रकल्पाची माहीती किशोर तिवारी यांना दिल्यावर त्यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव दिनेशचन्द्रजी जैन यांना कल्पना दिल्यावर त्यांनी आपण त्या वृद्धाश्रमाला भेट देऊन आवश्यक सुचना सरकारला सादर करण्याची सूचना केली . 
ही दिवाळी उपेक्षित कोलाम पारधी समाजासोबत राहून साजरी करण्याचा मानस असतांना धन तेरस ह्या दिवाळी सणाच्या पहील्या दिवशी वृद्धाश्रमातील वृद्धांसोबत आपल्या आईच्या मायेची पोकळी कमी करण्यासाठी आपला प्रयन्त असल्याचे तिवारी यांनी यावेळी सांगीतले . यावेळी ब्राम्हण समाजचे कार्यकर्ते समाज सेवक विलासभाऊ महाजन यांनी प्रत्येक वृद्धांना मायेची उब देण्यासाठी ब्लॅंकेट  देण्याचा तसेच वणीयेथील आदीवासी सेवक डॉ महेंद्रभाऊ लोढा यांनी  वृद्धाश्रमातील सर्व वृद्धांना साडी चोळी वा सदरा लुगडे देऊन दिवाळी साजरा करण्याची घोषणा यावेळी केली . 
उद्या ५ नोव्हेंबर सोमवारला सर्व वृद्धांसोबत दुपारी ३ वाजता वृद्धाश्रमातील आजी-आजोबा यांना दिवाळी फराळ वाटप करून, त्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे ,आपला घरचा दिवाळी फराळ देऊन आपण या उपक्रमात सहभागी होऊ शकता यासाठी समाज सेवक शेषराव डोंगरे  मोबाईल नंबर ९३२६४४३४४७ आपण संपर्क साधावा अशी विनंती आदीवासी कार्यकर्ते अंकित नैताम यांनी केली आहे . उमरी पठार हे जवळा तालुका आर्णी वरून ८ किलोमीटर आत आहे . 
===========================================================

Saturday, October 27, 2018

Maha Agri Task Force Chief Pulls up firm for Load-Shedding- Press Trust of India

Maha Agri Task Force Chief Pulls up firm for Load-Shedding- Press Trust of India 
 October 27, 2018 Last Updated at 19:55 IST 
https://www.business-standard.com/article/pti-stories/maha-agri-taskforce-chief-pulls-up-firm-for-load-shedding-118102700638_1.html

Farm activist Kishor Tiwari Saturday lashed out at state-run Maharashtra State Electricity Board's power distribution arm for "undeclared load-shedding" here which he claimed was causing immense loss to farmers. Tiwari is the chairman of the Vasantrao Naik Sheti Swavalamban Mission, a special taskforce set up by the state government to look into agricultural issues and curb farmers' suicides in 14 districts in Maharashtra. 
Speaking to reporters, Tiwari said that power-cuts, which last for over 10 hours daily, were depriving farmers of benefits of state-run schemes like Jalyukt Shivar, a water conservation project that involves deepening and widening of streams, construction of cement and earthen stop dams and digging of farm ponds. "The MSEDCL (Maharashtra State Electricity Distribution Company Limited) officials are indifferent to the problems of farmers despite the state government's promise of uninterrupted electricity supply for 12 hours a day for agricultural purposes, Officials are not replacing defunct transformers for several weeks," Tiwari said. 

He claimed farmers are set to lose crops over an area of 10,000 hectares and face monetary loss of up to Rs 2,000 crore due to load-shedding. He was speaking here after touring villages in Ghatanji tehsil. 
The power firm's officials could not be contacted despite repeated attempts.
======================================

Wednesday, August 22, 2018

किशोर तिवारी करणार २३ ऑगस्टला पुरग्रस्त दुर्भा -सतपेल्ली भागाचा दौरा

किशोर तिवारी करणार २३ ऑगस्टला पुरग्रस्त दुर्भा -सतपेल्ली भागाचा दौरा 
दिनांक -२२ ऑगस्ट २०१८
पैनगंगेच्या पुराने झरी तालुक्यातील धानोरा दुर्भा दिग्रस सतपेल्ली वढोली या गावालगतच्या हजारो हेक्टर वरील उभे पीक खरडून गेल्याने तसेच धानोरा दुर्भा दिग्रस सतपेल्ली वढोली वस्तीतील घरे मोठ्याप्रमाणात नुकसानीच्या पाहणी करण्यासाठी कै वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी येत्या गुरुवार २३ ऑगस्टला पाहणी दौरा करणार असुन त्यांच्या सोबत जिल्हा परिषद सद्यस सुरेशभाऊ मानकर व  मीनाक्षी सुरेश बोलेनवर  दुर्भ्याचे सरपंच सतीशभाऊ नागले सुद्धा राहणार आहेत . 
 यावेळेस  झरी तालुक्यातील पैनगंगेच्या नदीच्या पुरबुडीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी सोबतच दुर्भा   येथे किशोर तिवारी यांचा येत्या २३ ऑगस्टला  दुपारी ३ वाजता  "सरकार आपल्या दारी कार्यक्रम "आयोजित करण्यात आला आहे  . 
झरी    तालुक्यातील लिंगटी धानोरा दुर्भा दिग्रस सतपल्ली वाढोली परीसरातील  शेतकऱ्यांच्या पुरबुडीचे नुकसान पीककर्ज वाटप,तसेच  आदीवासी ,कोलाम पारधी, शेतकरी यांच्या कडुन आदिवासी विकास ,ग्राम विकास ,कृषी ,महसुल ,वन ,आरोग्य ,सहकार ,वीज ,सिचन ,शिक्षण ,पोलीस , अन्न  सुरक्षा या विभागाच्या प्रचंड तक्रारी आल्यामुळे या विभागाच्या सर्व जिल्हा स्तरीय अधिकाऱ्यांसह तक्रारीचे  समाधान करण्यासाठी कै वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांचा  हा  सरकार आपल्यादारी कार्यक्रम  आयोजित करण्यात आल्याची माहीती आदीवासी नेते धर्माभाऊ आत्राम व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामलू इटवार यांनी दिली  . 
किशोर तिवारी २३ ऑगस्टला दुपारी २ वाजता धानोऱ्याला ३ वाजता दुर्भ्याला ३.३०वाजता दिग्रसला ४ वाजता सतपेल्लीला व ५ वाजता  वढोलीला भेट देणार आहेत अशी माहीती दौऱ्याचे संयोजक दुर्भ्याचे सरपंच सतीशभाऊ नागले यांनी दिली .