Thursday, August 24, 2017

खैरगाव (देशमुख) कोलाम पोड येथे २५ आगस्टला "सरकार आपल्या दारी" कार्यक्रम

यवतमाळ जिल्यात सर्वांना अन्न सुरक्षा ,घरासाठी व शेतीचे पट्टे यासाठी शेतकरी मिशनची मोहीम  : केळापूर  तालुक्यातील खैरगाव (देशमुख) कोलाम पोड   येथे २५ आगस्टला   "सरकार आपल्या दारी" कार्यक्रम 
दिनांक २४ ऑगस्ट  २०१७
 मा . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सूचनेनुसार "सरकार आपल्या दारी" या कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण भागातील महसूल , कृषी ,ग्रामविकास ,वीज वितरण ,अन्न पुरवठा ,आरोग्य ,रोजगार ,शिक्षण , पोलीस प्रशासन यांच्या विभागाच्या  तालुका व  ग्रामस्तरीय अधिकारी -कर्मचारी यांच्या तक्रारीची सुनावणी व  जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांकडून  समाधान व कारवाई साठी अधिकारी -कर्मचारी चेतना जागृती अभियानाचा एक भाग म्हणून  यवतमाळ जिल्यात  केळापूर  तालुक्यातील खैरगाव (देशमुख) कोलाम पोड   येथे २५ आगस्टला   "सरकार आपल्या दारी" कार्यक्रम   नसुनावणी ठेवण्यात आली आहे . खैरगाव देशमुख ,वांजरी ,झुली ,पहापळ,बोथ,जवाहर नगर,मारेगाव,जाम , कोदोरी सुकळी  रूढा घुबडी  वळवाट पिठापोंगरी खैरी येथील  कोलाम पोडावरील आदिवासींच्या येथील गावकऱ्यांच्या जमिनीच्या मालकीचा प्रश्न ,घरकुल योजनेच्या अडचणी  शेतकऱ्यांच्या शेती मालविक्रीसाठी येत असलेल्या अडचणी  आतापर्यंत  नवीन पिककर्ज ,मुद्रांकर्ज वाटप, ग्रामीण जनतेला काम व खावटी  ,अन्न ,आरोग्य ,गुरांना चारा व पाणी यासह वीज वितरण ,शिक्षण ,प्रकल्पग्रस्तांचे अनेक  प्रश्न यांना सरकार ,प्रशासन ,लोक प्रतिनिधी व सामाजिक संस्था यांच्या पुढाकाराने  सोडविण्यात  येतील अशी माहीती  मिशनचे  प्रमुख किशोर तिवारी यांनी आज एका पत्रकाद्वारे दीली . 

यवतमाळ जिल्यात आदिवासी बहुल भागात पिवळ्या  शिधा वाटप नाहीत अशा प्रचंड तक्रारी येत आहेत अनेक कोलाम  व पारधी पाड्यात जनतेला घरकुल योजना मिळत नसुन कारण घराचे पट्टे मालकीचे नाहीत   अनेक तांत्रिक अडचणी प्रशासन समोर करीत वर्षानुवर्षं हा प्रश्न रेंगाळत आहे तसेच वंचितांना  आजही अन्न ,आरोग्य ,गुरांना चारा व पाणी यासह वीज वितरण ,शिक्षण  यांच्या समस्या आहेत यासर्व बाबीवर गंभीरपणे तोडगा काढण्यासाठी केळापूर  तालुक्यातील  खैरगाव देषमुख  येथे  येत्या  ९ मार्चला   "सरकार आपल्या दारी" कार्यक्रम हा कार्यक्रम कै वसंतराव नाईक शेतकरी  मिशनने आयोजित केला आहे या कार्यक्रमाला प्रशासनकडून   महसूल , कृषी ,ग्रामविकास ,वीज वितरण ,अन्न पुरवठा ,आरोग्य ,रोजगार ,शिक्षण , पोलीस प्रशासन यांच्या विभागाच्या  तालुका व  ग्रामस्तरीय अधिकारी -कर्मचारी उपस्थित राहणार असुन या भागातील लोकप्रिय आमदार डॉ अशोक उईके व आमदार राजाभाऊ तोडसाम   यांचेसह सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सद्यस तसेच सर्व सरपंच व ग्रामपंचायतीचे  सद्यस यांना सादर आमंत्रित करण्यात आले असुन ,ग्रामीण जनतेनी आपल्या सर्व अडचणी व सरकारी योजनामध्ये होणाऱ्या गैरप्रकार समोर आणण्याकरिता कार्यक्रमात सहभागी होण्याचे  आवाहन शेतकरी मिशनचे अध्क्षश किशोर तिवारी यांनी केली आहे   

================================================

Sunday, August 20, 2017

किशोर तिवारी २१ ऑगस्टला यवतमाळ जिल्हात

किशोर तिवारी  २१ ऑगस्टला यवतमाळ जिल्हात   
दिनांक २० ऑगस्ट २०१७
स्व वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी २१ ऑगस्टला यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी व केळापुर तालुक्यातील आदीवासी वंचितांच्या वीज पुरवढ्यामध्ये खंड , आरोग्याच्या समस्या ,अन्न सुरक्षा ,निराधार , पीककर्ज ,शिक्षण ,ग्रामीण विकास ,आदीवासी योजना,वरळीमटका ,जुगार ,दारू विक्री   व टिप्पेश्वर अभयारण्यामुळे होत असलेला वन्यप्राण्याचा त्रास , टिप्पेश्वर अभयारण्यामध्ये होत असलेली जंगल तोड ,पारवा व अर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरावस्था याची पाहणी व जनतेच्या समस्याची सुनावणी जिल्ह्यातील सर्व उच्च अधिकाऱ्यासोबत करणार आहेत . या दौऱ्यात किशोर तिवारी दुपारी ४ वाजता    सावंगी (सगदा ),संध्याकाळी ५ वाजता मंगी  येथे  ,संध्याकाळी ६ वाजता भीमकुंड येथील टेकडीवर राहणाऱ्या आदिवासींच्या समस्यांची सुनावणी व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे तसेच संध्याकाळी ७ वाजता जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सोबत अर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट व प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचारी वर्गास पाऊसामुळे होत असलेल्या त्रासापासुन वाजविण्याकरिता उपाय योजनेवर चर्चा करतील . या जनसंपर्क दौऱ्याचा फायदा वंचितांना व आदिवासींनी घ्यावा अशी विनंती स्व वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे जनसपंर्क अधिकारी अशोक कापर्तीवार यांनी केली आहे . 




Saturday, August 12, 2017

आदीवासी भागात संपुर्ण दारूबंदी करा : पांढरकवडा येथे पेसा गावाच्या सरपंच मेळाव्यात एकमुखी ठराव


आदीवासी भागात संपुर्ण दारूबंदी करा : पांढरकवडा येथे पेसा गावाच्या सरपंच मेळाव्यात एकमुखी ठराव 
ग्रामसभेने विविध ठराव घेवून प्रशासनाकडे पाठवावे - किशोर तिवारी 
दिनांक -१३ ऑगस्ट २०१७ 

अनुसुचित क्षेत्र स्थानिक स्वराज्य विकास मंडळ (महासंघ) पांढरकवडा व पेसा कायदा वनहक्क कायदया अंतर्गत असलेल्या ग्रामसभांचा सरपंचाच्या  यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत पेसा लोकप्रतिनिधींचीमेळाव्यात  स्थानिक सुराणा भवन पांढरकवडा येथे आज शनिवारी  संपुर्ण दारूबंदी सह आदिवासींच्या घटनादत्त अधिकारांच्या पुनर्स्थापनेसाठी रणशिंग फुकण्यात आले .या मेळाव्यात    कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष मा. श्री किशोर तिवारी (राज्यमंत्री दर्जा) यांची प्रामुख्याने उपस्थित होते . यावेळी पांढरकवडा येथील तहसिलदार महादेवराव  जोरवार पांढरकवडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मधुकरराव घसाळकर. राळेगांव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी खेडकर, सरपंच महासंघाचे अध्यक्ष तुळशीराम कुमरे, पंचायत समीती पांढरकवड्याचे संतोषराव  बोडेवार , आदीवासी नेते धर्माभाऊ आत्राम, शेतकरी नेते सुरेशभाऊ  बोलेनवार यांच्या मेळाव्यात उपस्थित होते . यावेळी किशोर तिवारी यांनी  मार्गदर्शन करतांना पेसा अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायतच्या ग्रामसभेने कोणकोणते ठराव घ्यावेत यावर ठरावाचे वाचन करीत मार्गदर्शन केले. त्यात  प्रमुखपणे दारू विक्री व संपुर्ण दारूबंदी  ठराव, पेसा ग्रामपंचातमध्ये १००टक्के अंत्योदय लागू करावा ,पेसा गावात विविध संस्थांना प्रतिबंध घालून ग्रामसभेने ठराव मंजूर करूनच  परवानगी घेतलेल्यांना विकास कामे करण्यासाठी अनुमती मिळावी, पेसा गावाला थेट  निधी आवंटीत करावा, पेसा गावात आरोग्य उपकेंद्रे स्थापन करण्यात यावे, पेसा ग्रामपंचायतच्या वनपरिक्षेत्रातील वृक्ष कटाई पुढील १० वर्षाकरिता प्रतिबंधीत करावी असे महत्वाचे एकुण २५ ठराव मेळाव्यात ठेवण्यात आले व उपस्थित सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवकांनी त्याला आपले अनुमोदन दिले   त्यानंतर उपस्थितांना हे ठराव येत्या १५ आगस्टला आम सभेत पारीत करण्याचे  आवाहन मा.ना. किशोर तिवारी यांनी केले. त्यानंतर मंचावर उपस्थितांपैकी तुळशीराम कुमरे, धर्माभाऊ आत्राम, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी घसाळकर राळेगांव चे गटविकास अधिकारी खेडकर व काही सरपंचांनी मंचावर येवून पेसा अंतर्गत येणार्र्या ग्रामपंचायतींसाठी ठराव सुचविले त्यात गौण उत्खननाची परवानगी ग्रामसभेतून घ्यावी व हर्रास झालेली रक्कम त्या पेसा ग्रामसभेला मिळावी, गोडाऊन व मंगलकार्यालय बांधावे, पेसाचा एका गावाला  एकच ग्रामसेवक असावा, कम्युनिटी राईटस् च्या नावाखाली विकास कामांमध्ये असलेले वनसंस्थांचे सरकारी अतिक्रमण पेसा ग्रामपंचायत मधून हटवावे, पेसा अंतर्गत ग्रामंचायत मध्ये राहणाऱ्या  आदिवासी बांधवांना शुध्द पिण्याचे पाणी देण्यात यावे, मागेल त्याला घर ही योजना राबविण्यात यावी प्रत्येक गावाला विद्युत पुरवठा आणि मराठी गोंडी कोलामी भाषा येणारा शिक्षक पेसा ग्रामपंचायत मध्ये येणाऱ्या  शाळांमध्ये नियुक्त करावे  असे विविध ठराव सुचविण्यात येवून ते ग्रामसभेने पारीत करून शासनदरबारी पाठवावे अशा सुचना या मेळाव्यात  करण्यात आली . सदर मेळाव्याला पेसा अंतर्गत येणार्र्या ग्रामपंचायतशी संबंधीत लोकप्रतिनिधींची उपस्थिती  लाभल्याने कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी जनप्रतिनिधींना धन्यवाद दिलें  त्याचबरोबर सदर ग्रामसभेने जे जनप्रतिनिधी विकास कामांच्या आपल्या सेवेत खरे उतरणार नाही त्यांना परत बोलविण्याचा अधिकार प्रदान करावा असा ठराव घेण्याबाबतही यावेळी मेळाव्यात  उपस्थित ग्रामसेवक सरपंच व उपसरपंच यांना सुचविण्यात आले. या मेळाव्याचा  समारोप खेळीमेळीच्या वातावरणात झाला यावेळी उपस्थितांचे आभार पेसा अधिकारी आशिष विनकरे यांनी मानले . 

Tuesday, August 8, 2017

स्व. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन पत्रपरीषद निवेदन

स्व. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन पत्रपरीषद निवेदन   
दिनांक -९ ऑगस्ट २०१७
मागील पत्रपरीषदमध्ये  ठरल्याप्रमाणे शेतकरी मिशनच्या कारवाईचा अहवाल व पाठपुरावा या विषयावर आपणाशी चर्चा  करण्यासाठी आज ही पत्रपरीषद घेण्यात येत आहे . 
स्व. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनकडुन महाराष्ट्राच्या कृषीसंकटाचा व ग्रामीण भागातील आर्थिक समस्याबाबत नीतीआयोगासमोर व पंतप्रधान कार्यालयात  विस्तृत  मांडणीकरून  राज्य सरकारच्या कामाचा आढावा सादर करण्यात आला (नीती आयोगाच्या बैठकीचा अहवाल सोबत जोडला आहे ( जोड पत्र -१). शेतकरी मिशनकडून यवतमाळ ,वाशीम ,वर्धा व अमरावती जिल्ह्याचा कामाचा आढावा घेण्यात आला . स्व. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनची मासीक बैठक ३१ जुलै रोजी घेण्यात आली यामध्ये सर्व जिल्हाधिकारी ,मुख्यकार्यपालन अधिकारी ,पोलीस अधिकारी ,कृषी ,आरोग्य ,पतपुरवडा ,सहकार ,वीज ,सिंचन ,दुग्ध ,मत्स्य ,वन व आदिवासी विभागाच्या कामाचा आढावा घेण्यात आला व खालील निर्णय घेण्यात आले . 
ग्रामीण भागात मागेल त्याला अन्न 
ग्रामीण भागातील गरीब व पात्र असणाऱ्या  सर्वांना  अन्न सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला (पहा जोड पत्र २)
आदीवासी शेतकरी व शेतमजुरांना नव्याने खावटी कर्ज  
सर्व  आदीवासी शेतकरी व शेतमजुरांना जुने खावटी कर्ज माफ करून नवीन खावटी कर्ज देण्याचा प्रस्ताव मिशनने सरकारला दीला आहे .  (पहा जोड पत्र ३)

राज्यातील मक्तेदार वा बटाईदार शेतकऱ्यांच्या कर्जमाफी समावेश करावा 

राज्यातील मक्तेदार वा बटाईदार शेतकऱ्यांच्या कर्जमाफी समावेश  करण्याची अतिशय महत्वाची मागणी मिशनने सरकारला केली आहे (पहा जोड पत्र ४). 

पीक कर्जमाफी व पिकविम्याबाबत मिशनकडून राज्यपातळीवर शेतकऱ्यांना सहकार्य 

अडचणीच्या पात्र शेतकऱ्यांना तातडीची १० हजाराची मदत व पीक कर्जमाफीच्या व्याप्तीची संपुर्ण माहीती देण्याची   महत्वाची मागणी मिशन कामगीरी पार  पाडत  आहे . 

स्व. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन अस्तिव व सामाजीक बांधिलकी 
स्व. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन हे महाराष्ट्राच्या हरीत क्रांतीचे जनक व शोषितांचा आवाज म्हणुन अमर झालेले माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांचे स्वप्न साकार करण्यासाठी अशासकीय शेतकरी चळवळीच्या सामान्य कार्यकर्त्यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ व मराठवाड्याच्या १४ जिल्ह्यात सुरू केलेला प्रयोग असुन सरकारला आज पर्यंत कवडीची निधी न मागता आपण सर्व भ्रष्ट्र अधिकारी व पोटभरू नाकर्ते राजकीय नेते यांचे गोरखधंदे बंद करुन वंचितांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयन्त आहे आपण याला सहकार्य करावे 

आपला नम्र 



किशोर तिवारी