Monday, January 25, 2016

Doctors face axe for being absent in rural clinic-TIMES OF INDIA


Doctors face axe for being absent in rural clinic-TIMES OF INDIA 

http://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/Docs-face-axe-for-being-absent-in-rural-clinic/articleshow/50724412.cms

Jan 26, 2016, 03.08 AM IST
Doctors found to be absent from a rural hospital during duty hours in farmers' suicide prone Yavatmal district have been given marching orders. A junior doctor employed on contractual basis was outrightly sacked and the one posted on regular basis was served a show cause notice with a recommendation to terminate his services forwarded.
They two doctors were posted at the Wadona Bazar primary health centre (PHC) in Ralegaon tehsil of Yavatmal and were found absent from duty when the director of Vasantrao Naik Shetkari Swavalamban Mission (VNSSM) Kishore Tiwari visited.

"Dr Mahesh Manohar, junior doctor with a bachelor in Ayurvedic Medicine and Surgery, degree was employed on contractual basis, and has been relieved from the services with immediate effect. Dr Jivanchand Kurmete held the post of medical officer, which is a regular appointment. He was issued a show cause notice, to which he has submitted a reply. Now, recommendation to sack him has been sent to the higher ups," the district health officer KZ Rathod told
Tiwari also claimed to have received a message of a doctor being absent in Shibla, where a patient with critical illness had been brought. However, he could not visit there

वाढोणाबाजारचे आरोग्य केंद्र चालते परिचारिकांवर- अनुपस्थित डॉक्टरांची सेवामुक्तीची कारवाई

वाढोणाबाजारचे आरोग्य केंद्र चालते परिचारिकांवर- अनुपस्थित डॉक्टरांची सेवामुक्तीची कारवाई 

■ दिनांक -२५ जानेवारी २०१६
२0 जानेवारी रोजी अध्यक्ष किशोर तिवारी हे लोणी-बंदर येथील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेण्यासाठी निघाले होते. दरम्यान त्यांनी वाढोणाबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. त्यावेळी या केंद्रावर नियुक्त डॉ. जीवन कुडमेथे आणि डॉ. महेश मनवर हे दोन दिवसांपासून अनुपस्थित असल्याचे तेथील कर्मचार्‍यांकडून सांगण्यात आले.परिचारिका रामटेके या त्या काळात इतर मोजक्या कर्मचार्‍यांच्या
सहकार्याने संपूर्णआरोग्य केंद्र सांभाळत असल्याचे त्यांच्या पाहणीत दिसले.
वाढोणाबाजार येथील दोनही वैद्यकीय अधिकार्‍यांवर सेवामुक्तीची करण्यात आली आहे , असे वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारीयांनी सांगितले. रुग्णालयास भेटीप्रसंगी तेथे १0 रुग्ण होते. मात्र त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टरच हजर नव्हते. कोणतीही सूचना न देता बेजबाबदारपणे ते कर्तव्यावर अनुपस्थित असल्याचे आढळून आले. यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी व त्यांच्या सहायकांना संपर्क केला. त्यांनीप्रतिसाद दिला नाही. जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांना आरोग्य विभागात सुरू असलेल्या या गंभीर प्रकाराची माहिती दिली. जिल्हाधिकार्‍यांनी अवघ्या एका तासात या डॉक्टरांवर कारवाई केली. डॉ.
मनवर यांना लगेच तेथून हलविण्यात आले, तर दोघांवर सेवामुक्तीची कारवाई केली जाणार आहे, असे ते म्हणाले. झाडगाव येथेही आरोग्य सेवेविषयी आपल्याला वाईटअनुभव आल्याचे ते म्हणाले. वारंवार सूचना, आदेश देवूनही आरोग्यसेवा देण्यात कुचराईकरणार्‍यांवर कडक कारवाईकेली जाईल, असे त्यांनी
सांगितले. राळेगाव :तालुक्याचा वाढोणाबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कारभाराचे वास्तव शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी स्वत: अनुभवले. या केंद्राचा कारभार परिचारिकेच्या भरवशावरच चालविला जात असल्याची बाब पुढे आली. दोनही वैद्यकीय अधिकारी अनुपस्थितआढळून आले. या बाबीची तक्रार तिवारी यांनी आरोग्य संचालक मुंबई व  उपसंचालक अकोला यांच्याकडे केली आहे.
वाढोणा हे राळेगाव-वडकी रोडवरील अडीच हजार लोकसंख्येचे मोठे गाव आहे. या केंद्रांतर्गत ३४ गावांचा समावेश आहे. २६ हजार लोकसंख्या या केंद्रांतर्गत येते. ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन
किशोर तिवारी यांनी आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांना केले. नागपूरवरून येताना वडनेर (ता.हिंगणघाट) येथील ग्रामीण रुग्णालयात तब्बल ४५0 रुग्ण तेथील डॉक्टरांनी तपासल्याचे पाहून तिवारी यांनी या रुग्णालयाच्या कारभाराविषयी समाधान व्यक्त केले. वाढोणाबाजार येथे मात्र या उलट चित्र  दिसल्याने ते संतप्त झाले. 

Monday, January 18, 2016

पंतप्रधानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्राने "सिक्कीम सेंद्रीयशेती मॉडेल" विदर्भात लागू करावे -शेतकरी मिशनची मागणी

सिक्कीम "संपूर्ण सेंद्रीयशेती  राज्य"-पंतप्रधानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्राने "सिक्कीम मॉडेल"   लागू करावे -शेतकरी मिशनची मागणी 
दिनांक १९ जानेवारी 

गंगटोक येथे १८ जानेवारी रोजी शाश्वत शेतीविषयी परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी   यांनी सिक्कीम हे संपूर्ण सेंद्रीय शेती करणारे भारतातील पहिले राज्य औपचारिक घोषणा करून इतर राज्यांनी सिक्कीम सेंद्रीयशेती मॉडेल" आपल्या राज्यात एकातरी जिल्यात लागु करावे असे केलेल्या आवाहनाचा दुवा घेत महाराष्ट्रातील कोरडवाहू दुष्काळग्रस्त विदर्भ व मराठवाड्याचा १४ जिल्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने स्थापित केलेल्या शेतकरी मिशन संयोजक व शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी संपुर्ण विदर्भ व मराठवाड्यात विषमुक्त शेतीचे  "सिक्कीम सेंद्रीयशेती मॉडेल" लागू करावे अशी मागणीसाठी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी साकडे घातले आहे . 


सिक्कीम राज्यात ‘राष्ट्रीय सेंद्रीय उत्पादन कार्यक्रमातील मार्गदर्शक नियमांनुसार सेंद्रीय पद्धती आणि तत्त्वांचा वापर करून जवळपास 75 हजार हेक्टर शेतजमीन हळूहळू प्रमाणित सेंद्रीय जमिनीत रुपांतरीत करण्यात करण्यात आली.‘निसर्ग-पर्यावरणाच्या ऱ्हासाबाबत जगभर ओरड सुरू असताना या विषयावर अचूक मात्रा घेत सिक्कीमसारख्या एका छोटय़ाशा राज्याने संपूर्ण राज्यात केवळ ‘सेंद्रिय शेती’चे क्रांतिकारी पाऊल टाकले आहे. या प्रकारची शेती करणारे सिक्कीम हे देशातील पहिले राज्य ठरले  आहे. सध्या 
विदर्भ व मराठवाड्यात होत असलेल्या शेतकरी आत्महत्या ,रासायनिक खत ,कीटक नाशक व घेणाऱ्या रासायनिक रासायनिक औषधी यामुळे जीमिनीचे संपूर्ण पात गेली असुन आता शाश्वत विषमुक्त शेती हाच एकमेव पर्याय असून सिक्कीम राज्याने  पर्यटनाचा मुख्य स्रोत असलेल्या निसर्गाला गेल्या काही वर्षांमध्ये रासायनिक शेतीमुळे मोठा धोका उत्पन्न होऊ लागल्यावर या राज्याने  ‘सेंद्रिय शेती’चा प्रयोग.  १५ ऑगस्ट २०१० रोजी ‘सिक्कीम ऑरगॅनिक मिशन’ची घोषणा सुरु केला आता ही राष्ट्रीय चळवळ होणे गरजेचे असुन महाराष्ट्राच्या सरकारने तात्काळ आत्महत्याग्रस्त जिल्यात विषमुक्त शेतीचा पथदर्शी कार्यक्रम सुरु करावा अशी  मागणी शेतकरी मिशन संयोजक किशोर तिवारी  यांनी केली आहे . सध्या युरिया, नायट्रोजन व पोटाशिअम , फोस्फेट उत्पादने / रासायनिक खतांचा अती वापराणे जमीन हलकी पत गमावून बसली आहे  यामध्ये उत्पादक आणि त्याना मदत करणारे अधिकारी पुर्णपणे शामिल असुन आता कुठल्याही प्रकारची रासायनिक खते, औषधे, कीटकनाशकांच्या वापरावर र्निबध टाकणे वं  पारंपरिक निसर्गपूरक शेती पद्धती, प्रदेशनिष्ठ पिकांचीच निवड, बाह्य़ घटकांचा कमीतकमी वापर हा मंत्र असलेल्या  ‘सेंद्रिय’ पद्धतीची हाच एकमेव मार्ग असुन सरकारने तात्काळ आत्महत्याग्रस्त जिल्यात हा मार्ग स्वीकारावा अशी मागणी  किशोर तिवारी  यांनी केली आहे 

शेतकरी मिशन मागील सहा महीन्यापासून सर्व दुष्काळग्रस्त व नापिकीग्रस्त शेतकऱ्यांना नव्याने पत पुरवढा , शेती खर्चात बचत, बाजारपेठेशी जोडणी आणि वाढीव बाजारमूल्य यावर काम करीत असुन विषमुक्त शेतीच  कोरडवाहु जमीन , शेतकरी, समाज, आरोग्य, अर्थव्यवस्था आणि निसर्ग-पर्यावरण या साऱ्या घटकांमध्ये दुरुस्ती करू शकते तरी  सिक्कीममध्ये सुरू झालेली ही चळवळ आता देशव्यापी होणे हे मानवजातीच्या हिताचे आहे,यासाठी शेतकरी मिशन कालबद्ध देत असल्याची माहितीही किशोर तिवारी यांनी यावेळी दिली .