Monday, January 25, 2016

वाढोणाबाजारचे आरोग्य केंद्र चालते परिचारिकांवर- अनुपस्थित डॉक्टरांची सेवामुक्तीची कारवाई

वाढोणाबाजारचे आरोग्य केंद्र चालते परिचारिकांवर- अनुपस्थित डॉक्टरांची सेवामुक्तीची कारवाई 

■ दिनांक -२५ जानेवारी २०१६
२0 जानेवारी रोजी अध्यक्ष किशोर तिवारी हे लोणी-बंदर येथील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेण्यासाठी निघाले होते. दरम्यान त्यांनी वाढोणाबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. त्यावेळी या केंद्रावर नियुक्त डॉ. जीवन कुडमेथे आणि डॉ. महेश मनवर हे दोन दिवसांपासून अनुपस्थित असल्याचे तेथील कर्मचार्‍यांकडून सांगण्यात आले.परिचारिका रामटेके या त्या काळात इतर मोजक्या कर्मचार्‍यांच्या
सहकार्याने संपूर्णआरोग्य केंद्र सांभाळत असल्याचे त्यांच्या पाहणीत दिसले.
वाढोणाबाजार येथील दोनही वैद्यकीय अधिकार्‍यांवर सेवामुक्तीची करण्यात आली आहे , असे वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारीयांनी सांगितले. रुग्णालयास भेटीप्रसंगी तेथे १0 रुग्ण होते. मात्र त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टरच हजर नव्हते. कोणतीही सूचना न देता बेजबाबदारपणे ते कर्तव्यावर अनुपस्थित असल्याचे आढळून आले. यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी व त्यांच्या सहायकांना संपर्क केला. त्यांनीप्रतिसाद दिला नाही. जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांना आरोग्य विभागात सुरू असलेल्या या गंभीर प्रकाराची माहिती दिली. जिल्हाधिकार्‍यांनी अवघ्या एका तासात या डॉक्टरांवर कारवाई केली. डॉ.
मनवर यांना लगेच तेथून हलविण्यात आले, तर दोघांवर सेवामुक्तीची कारवाई केली जाणार आहे, असे ते म्हणाले. झाडगाव येथेही आरोग्य सेवेविषयी आपल्याला वाईटअनुभव आल्याचे ते म्हणाले. वारंवार सूचना, आदेश देवूनही आरोग्यसेवा देण्यात कुचराईकरणार्‍यांवर कडक कारवाईकेली जाईल, असे त्यांनी
सांगितले. राळेगाव :तालुक्याचा वाढोणाबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कारभाराचे वास्तव शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी स्वत: अनुभवले. या केंद्राचा कारभार परिचारिकेच्या भरवशावरच चालविला जात असल्याची बाब पुढे आली. दोनही वैद्यकीय अधिकारी अनुपस्थितआढळून आले. या बाबीची तक्रार तिवारी यांनी आरोग्य संचालक मुंबई व  उपसंचालक अकोला यांच्याकडे केली आहे.
वाढोणा हे राळेगाव-वडकी रोडवरील अडीच हजार लोकसंख्येचे मोठे गाव आहे. या केंद्रांतर्गत ३४ गावांचा समावेश आहे. २६ हजार लोकसंख्या या केंद्रांतर्गत येते. ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन
किशोर तिवारी यांनी आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांना केले. नागपूरवरून येताना वडनेर (ता.हिंगणघाट) येथील ग्रामीण रुग्णालयात तब्बल ४५0 रुग्ण तेथील डॉक्टरांनी तपासल्याचे पाहून तिवारी यांनी या रुग्णालयाच्या कारभाराविषयी समाधान व्यक्त केले. वाढोणाबाजार येथे मात्र या उलट चित्र  दिसल्याने ते संतप्त झाले. 

No comments:

Post a Comment