Friday, September 11, 2015

युवा शेतकरी दत्ता लांडगे यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही -किशोर तिवारी


युवा शेतकरी दत्ता लांडगे यांचे  बलिदान व्यर्थ जाणार नाही -किशोर तिवारी 
दिनाक -१२ सप्टेंबर २०१५
वाशीम जिल्यातील मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथील युवा शेतकरी दत्ता उर्फ गुड्ड लांडगे (३५) यांनी सततच्या नापिकीला कंटाळून गळफास लावून आत्महत्त्या १०  सप्टेंबर रोजी रात्री केल्याची घटनेची   शेतकरी वाचवा मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी   गंभीर दखल घेतली असून  दत्ताभाऊ यानी  मुख्यमंत्र्यांच्या नावे पत्र लिहून त्यामध्ये उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांना समोर ठेऊन दत्ताभाऊचे बलिदान व्यर्थ जाणार नाही यासाठी सरकारने तातडीचे निर्णय घेतले असून व अनेक मुद्द्यावर सरकारशी बोलणी सुरु आहे मात्र ही घटना वेदना देणारी असून याची संपुर्ण जबाबदारी घेत असल्याचे त्यांनी म्हटले असून   व दत्ताभाऊना  मानसिक त्रास देणारी  नौक्ररशाही व शेतकरी विरोधी धोरणाचा मुद्या दिल्ली व मुंबई सरकारला तातडीने सोडविण्यासाठी आपण आपल्या अस्तीवाची लढाई लढण्याची घोषणाही तिवारी यांनी केली . दत्ता उर्फ गुड्ड लांडगे (३५) यांच्या आत्महत्त्याच्या कारणाची संपूर्ण चौकशी मिशन करणार असुन या  घटनेला जबाबदार सर्व अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाईचे संकेत तिवारी यांनी दिले आहेत . 
दत्ताभाऊ लांडगे यांच्या कुटुंबाची संपुर्ण जबाबदारी मिशनने  घेतली असुन आपण भेटून सर्व योजनांचा लाभ व त्यांच्या व मुलांच्या पुढील शिक्षणाची व ह्या पुढे दत्ताभाऊ लांडगे यांच्या सारखे युवा शेतकरी बलिदान करणार नाही व  शेतकरी चेतना अभियान राबवीतील कारण मिशनने वाशीम जिल्हा शेतकरी आत्महत्या मुक्त करण्याचा संकल्प घेतला  असुन प्रशासन प्रत्येक शेतकऱ्यांच्या दारावर जाणार आहे व समस्यांचे समाधान करणार आहे .
मा. देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री, महाराष्ट्र) यांनी दत्ताभाऊंचे सर्व  मुद्द्यावर पहिलेच निर्णय घेतले असुन सर्वाना अन्न ,आरोग्य ,शिक्षण ,शेतात पाणी व वीज पुरवठा तात्काळ देण्यात येत असून प्रत्येक युवा शेतकऱ्याला नवीन  धंदा करण्यासाठी मुद्रा योजना सुरु केली असून . दत्ताभाऊंनी शेतीसाठी पत व शेती मालाला रास्त भाव हे दोन मुद्दे मिशनने घेतले असुन यावर सरकारला आपले धोरण बदलावे लागेल ही काळाची गरज आहे . 
आज विदर्भ व मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांवर अभूतपूर्व संकट आले आहे नाना पाटेकर व मुकुंद अनासपुरे सारखी प्रत्येक जिल्यात जाऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसत आहेत ,आम्ही सरकार आग ओतणारे आंदोलक आज शेतकरी वाचवा यासाठी सरकार सोबत अहोरात्र काम करीत आहोत माझी सर्व शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे की मा. देवेंद्र फडणवीस वर विस्वास ठेवा आपण दत्ताभाऊचे बलिदान व्यर्थ जाणार नाही सर्व निर्णय घेण्यास त्यांना लाऊ मात्र तुम्ही दत्ताभाऊचा मार्गावर जाऊ नका तुम्हीच नसाल देवेन्द्र ,नाना आणी आम्ही कोणासाठी भांडू ,आम्हाला वेळ द्या ही विनंती किशोर तिवारी केली आहे . 

No comments:

Post a Comment