Tuesday, July 5, 2016

शेतकरी मिशन ग्रामीण रुग्नालयाची दशा व शेतकरी विधवांची व्यस्था जाणणार

शेतकरी मिशन ग्रामीण रुग्नालयाची दशा व शेतकरी  विधवांची व्यस्था जाणणार 

दिनांक - ५ जुलै २०१६

यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्नालय यांची अवस्था मागील काही   महीन्यात बिकट होत आहे प्रत्येक महिन्यांत ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्नालय डॉक्टरांच्या राजीनाम्यामुळे निराधार होत असुन अनेक ग्रामीण रुग्नालय प्राथमिक आरोग्य केंद्रापेक्षाही खराब अवस्थेत आली आहे . आरोग्य खात्याचा लालफीतशाहीमुळे मागील एक वर्षात शेतकरी मिशन दिलेल्या सूचनांचे पालन झाले नसुन सारे लोकप्रतिनिधी ओरड करीत असताना यवतमाळ येथील मागील महिन्याचा आढावा बैठकीत आपला त्रागा प्रगट केला होता मात्र    यवतमाळ जिल्यातील नेर,   कळंब ,झरी ,मारेगाव वणी ,करंजी येथील ग्रामीण रुग्नालयाच्या शेकडो तक्रारींवर वर उपसंचालक आरोग्य विभाग व जिल्ह्यातील सर्व जबाबदार अधिकारी   यांच्या सोबत ग्रामीण रुग्नालय  करंजी येथे मुख्यमंत्र्याना अहवाल देण्यासाठी  अडचणी व समस्यांवर बैठक शेतकरी मिशनने ६ जुलैला  आयोजीत केली आहे ,अशी माहीती शेतकरी मिशनचे प्रमुख किशोर तिवारी यांनी दिली . 
शेतकरी विधवा रेखा अशोक चिंतलवार यांना दिलासा 
कारेगाव बंडलं येथील अति अडचणीत असलेल्या शेतकरी विधवा रेखा अशोक चिंतलवार (मो . ०९०१११९४३१९) यांना व  बाल मधुमेहापासुन सतत लढा देत शेती करणाऱ्या त्यांचा मुलगा द्यानेश्वर अशोक चिंतलवार यांच्या उपचारासाठी आरोग्य विभागाकडून घरपोच आरोग्य सेवा देण्याकरीता व दुबई येथील अभियंता फारुख तारपोरवाला यांच्या कडुन शेतकरी विधवा रेखा अशोक चिंतलवार यांना मदत देण्याचा  पांढरकवडा येथे आयोजित कार्यक्रम बळीराजा चेतना अभियानाअंतर्गत शेतकरी  मिशनने आयोजीत केला आहे .    

No comments:

Post a Comment