Sunday, October 1, 2017

कीटकनाशकाने घेतले १७ जीव :या मृत्यूना कृषीविभाग व आरोग्य विभागच जबाबदार -किशोर तिवारी


कीटकनाशकाने घेतले १७ जीव :या मृत्यूना कृषीविभाग व आरोग्य विभागाचा नाकर्तेपणाचं जबाबदार -किशोर तिवारी   
दिनांक १ ऑक्टोबर २०१७
यवतमाळ जिल्ह्यात कापूसाच्या उभ्यापिकावर  बोडअळी ,गुलाबी बोडअळी, मलीबगचे प्रचन्ड हल्ला रोखण्यासाठी  प्रोफेक्स सुपर वा पोलो या सारख्या अतिविषारी 'कीटकनाशकाच्या  फवारणीमुळे १६ शेतमजूर व अल्प भुधारक शेतकऱ्यांच्या या पंधरवड्यात  मृत्यू झाला असल्याची व ६००च्या वर लोकांना विषबाधा  झाली असल्याची माहीती कै वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष  किशोर तिवारी यांनी यवतमाळचा गावोगावी दौरा केल्यानंतर दिली या मृत्यु पडलेल्या  शेतमजूर व अल्प भुधारक शेतकऱ्यांच्या कुटुंबाना सरकार प्रत्येकी ३ लाख रुपये नुकसान भरपाई देणार असल्याची व दवाखान्यावर आलेला संपुर्ण खर्च देणार असल्याची माहीती यावेळी दिली तसेच या मृत्यू तांडवाची सारी जबाबदारी शेतमजूर व अल्प भुधारक शेतकऱ्यांच्या डोक्यावर उच्चसमितीच्या अहवालाच्या नांवावर  मांडण्याचा घाणेरडा व खोटारडा  प्रकार आपण हाणून पाडणार असुन या मृत्युची संपुर्ण जबाबदारी कृषी व आरोग्य विभागाची असल्याने यांच्यावरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सरकारी नौकरीमधून हकालपट्टी करण्याची मागणीच तिवारी यांनी केली आहे  
 यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकरी मिशनने उमरखेड पुसद, आर्णी ,दिग्रस ,दारव्हा ,यवतमाळ ,राळेगाव , कळबं ,मारेगाव, केळापुर व वणी या ठिकाणी मागील चार दिवसात दौरे करून माहीती जुळविल्यानंतर जिल्हयात सुमारे ७५० रुग्णामध्ये आदीवासी   शेतमजूर व अल्प भुधारक शेतकऱ्यांच्या समावेश असुन आतापर्यंत  १७ पेक्षा जास्त प्रकरणांमध्ये किटकनाशची बाधा झालेले निरपधार जीव गमावले असुन  यामध्ये जीवगांवचे शंकरराव आगलावे ,आमलोनचे दत्ता टेकाम, शेंदूरघानींचे दीपक मडावी नायगांव गावचे दशरथ चव्हाण,कळंब शहराचे देविदास माडीवी, जामनी गावचे कैलाश पेंदोर ,कळंब गावचे आयुब शेख, कळंबचे अनिल चव्हाण, घाटंजी गावाचे रमेश चिरावार,उचेगाव गावचे रवी राठोड,पहापळचे  विठ्ठलराव पेरकेवार टेम्भीचे विलासभाऊ मडावी ,मारेगावचे वसंतराव  सिडाम, कालेगाव  मारोतराव  पिंपळकर ,घोडधरा  गावातील दिवाकर घोसी,टाकळी  गावचे शंकर कदम  ,मानोलीचा बंडूभाऊ सोनुर्ले यांचा समावेश असून जर आरोग्य विभाग व कृषी विभाग असाच झोपाकाढत असल्यास  या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात  वाढ होण्याची भीती किशोर तिवारी व्यक्त केली आहे . 
श्री. तिवारी यांनी मृतांसाठी अमेरीकेच्या  सुधारित बीटी कापूस बियांना दोष दिला. ते म्हणाले, "बीटी कापूस बियाण्यानी बोडअळी ,गुलाबी बोडअळी, मलीबग व इतर उपद्रव यांचे प्रतिकार करणे अपेक्षित आहे. तथापि, ते कीड हाताळण्यात अयशस्वी ठरले आणि यामुळे विषारी व आंतरराष्ट्रीय स्तरावर बंदी असलेल्या मोनोक्रोटोफॉसचा वापर करण्यात आला, एक अत्यंत विषारी कीटकनाशक, ज्यामुळे वनस्पती हिरव्या आणि निरोगी दिसतात परंतु गुलाबी बोल्मोंडची पुनरुत्थान होते. शेतकरी गैर-शिफारसीय जोड्या वापरतात म्हणून विषारी रसायनांच्या बाधेची  शक्यता वाढते. जिल्ह्यापरिषदेचे आरोग्य व कृषी जर पैसे खाण्यात गुंतले नसते व कामावर वेळेवर लक्ष दिले असते हे बळी टाळता आले असते याला जबाबदार यंत्रणा जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्हाला असेच आदिवासींचे व शेतकऱ्यांचे व्यवस्थेचे बळी मोजावे लागतील असा निर्वाणीचा इशारा तिवारी यांनी दिला "
 महाराष्ट्रातील कापसाच्या लागवडीखालील क्षेत्र सर्वात मोठा आहे (४० लाख हेक्टरपेक्षा जास्त)  जर राज्याने रासायनिक शेतीवर बंदी घातली नाही तर आणि आदिवासी शेतकरी कामगार मरतील,नापिकीमुळे  आत्महत्यांची संख्या वाढण्याची भीती तिवारी यांनी व्यक्त केली  आहे.

No comments:

Post a Comment