Thursday, November 30, 2017

सोनुर्ली येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला किशोर तिवारी यांची भेट - मृतक पांडुरंग पिंपळशेंडे यांच्या दोन्ही मुलींचा शिक्षणाचा खर्च सरकार करणार

सोनुर्ली येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला किशोर तिवारी यांची भेट - मृतक पांडुरंग पिंपळशेंडे यांच्या दोन्ही मुलींचा शिक्षणाचा खर्च सरकार करणार 
दिनांक -३० नोव्हेंबर २०१७
यवतमाळ जिल्हातील केळापूर तालुक्यातील सोनुर्ली येथील प्रगतीशील युवा शेतकरी पांडुरंगजी पिंपळशेंडे यांनी गुलाबी अळीच्या हल्ल्याने चार एकरातील उभे कापसाचे पीक नष्ट झाल्यानंतर आता कर्ज कसे परत करणार . वणी येथे ११ वी व ८ वी मध्ये शिकणाऱ्या दोन्ही मुलींचा खर्च आता कसा करणार ह्या चिंतेने कालच आत्महत्या केल्याने संपुर्ण परीसरात व्यक्त होत असतांना आज  सकाळी कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी सोनुर्ली येथे भेट दीली सोबत भाजप नेते शेखर जोशी ,महाराष्ट्र राज्य जल नियामक मंडळाचे सदयस ऍडव्होकेट विनोद तिवारी हे सुद्धा उपस्थित होते . 
किशोर तिवारी यांनी पांडुरंगजी पिंपळशेंडे  यांच्या आई व पत्नीशी चर्चा केली व सरकार आपल्या दोन्ही मुलींचा पुढील शिक्षणाचा पुढील संपुर्ण खर्च करणार अशी माहीती दिली . 
यावेळी सोनुर्ली परीसरातील शेतकऱ्यांशी किशोर तिवारी यांनी चर्चा केली त्यावेळी अख्ख्या परीसरातील कापसाचे पीक गुलाबी अळीने नष्ट केले असुन त्यातच कापसाला व सोयाबीन भावही मिळत नसल्याचा तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या .कापसाचे पीक शेतकऱ्यांचे घरात जेमतेम ३० टक्के आले असतांना आता गुलाबी अळीने सर्वाचा सर्व पीकच खल्लास केल्याचे सांगीतले मात्र कृषी खात्याचा एकही अधिकारी साधी विचारपूसही करण्यास आला नसल्याची तक्रार यावेळी केली ,सरकार सर्व गुलाबी अळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी असुन सर्वाना नुकसान भरपाई मिळणार आपण रीतसर तक्रारी करा असा सल्ला यावेळी दिला. 
==================================================================

No comments:

Post a Comment