Sunday, October 25, 2015

विदर्भातील कोरडवाहू शेतकरी पुन्हा "नापिकीच्या संकटात "-तणावग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शेतकरी मिशन सरकारच्यादारी

विदर्भातील कोरडवाहू शेतकरी पुन्हा "नापिकीच्या संकटात "-तणावग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शेतकरी मिशन सरकारच्यादारी  
दिनांक -२५  ऑक्टोबर २०१५
यावर्षी आत्महत्याग्रस्त विदर्भात पाण्याने दगा दिल्याने व अभुतपुर्व तापमान सोबत आलेल्या रोगराईने कापसाचे व सोयाबीनचे पिकाचे विक्रमी नुकसान केले असुन ,महाराष्ट्राच्या १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्यातील सुमारे १५ हजारावर गावात दुष्काळाचे संकट असतांना उरलेल्या १० हजारावर खेड्यात शेतकऱ्यांना या दशकातील विक्रमी 'नापिकीला ' तोंड द्यावे लागणार अशी परिस्थिती कोरडवाहु शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या उताऱ्यावरून स्पष्ट झाली असुन ,मागील ४० दिवसाच्या कडक उन्हात कोरडवाहु शेतकऱ्यांच्या कापसाची उलगंवाडी होत असुन शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य सचिव (कृषी ) डॉ डी क़े . जैन यांचेशी प्रदीर्घ चर्चाकरून दिली असुन ,येत्या  वर्षासाठी शेतकऱ्यांच्या पतपुरवढा हा प्रश्न व या अडचणीत असलेल्या  तणावग्रस्त शेतकऱ्यांना १५ हजार दुष्काळग्रस्त गावच्या सारखी मदत व सवलती देण्याची मागणी रेटली आहे . 
आत्महत्याग्रस्त विदर्भात जे शेतकरी रबीचे पिक घेऊ शकतात त्या सर्वांना बीज ,भांडवलीसाठी मदतीचा  प्रस्तावही शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सरकार समोर ठेवला आहे . अनेक शेतकरी आपले उभे पिक वीज पुरवठा नियमित नसल्यामुळे वाचवु सकट नसून अनेक भागात  वीज पुरवठा कमी दबावाचा व जेमतेम ३ ते ४ तासच मिळत असल्याच्या तक्रार असुन यावर तात्काळ लक्ष देण्याची आग्रही विनंती  किशोर तिवारी यांनी केली आहे . 
महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य सचिव (कृषी ) डॉ डी क़े . जैन यांनी किशोर तिवारी यांना दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या पणन संघाने सी सी आय साठी कापसाची खरेदी करण्याची व सी सी आय  द्वारे सरळ खरेदी करण्याची संपुर्ण तयारी झाली असुन येत्या आठवड्यातच खरेदीची सुरवातही होणार आहे  ,यासाठी पणन महासंघाला लागणाऱ्या निधीलाही मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी मागील आठवड्यातच मंजुरी दिली असून शेतकऱ्यांनी पडेल भावात खेडा  खरेदीमध्ये न विकण्याच्या सल्ला शेतकरी मिशन दिला आहे . सरकारने यावर्षीची अभुतपूर्व नापिकी लक्षात घेता शेतकऱ्यांना विषेय बोनस वा नुकसान भरपाई देण्यासाठी शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी पुन्हा विनंती केली असल्याची माहीती यावेळी दिली . 
शेतकऱ्यांचे जे अनुदान कृषीखात्याकडे अनेक महिन्यापासून अटकले आहे व अडचणीत आलेल्या  शेतकऱ्यांना तात्काळ मिळावा यासाठी येत्या २८ व २९ ऑक्टोबरला कृषी आयुक्त पुणे यांचेशी आपण चर्चा करणार असून त्यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव (कृषी ) डॉ.डी.क़े.जैन हे सुध्या उपस्थित राहणार आहेत याच वेळी महाराष्ट्राच्या १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्यातील कर्जबाजारी सर्व शेतकऱ्यांना  येत्या  हंगामात नव्याने पीककर्ज देण्यासाठी आयुक्त (सहकार ) यांचेशी चर्चाकरून केंद्र व राज्य सरकारला अंतिम प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याची माहिती किशोर तिवारी यांनी दिली . 
सरकारने जुलै महिन्यात जाहीर केलेल्या उपाय योजना त्यामध्ये ६६ लाख शेतकरी कुटुंबाना अन्न सुरक्षा ,सातबाऱ्यावर आरोग्य सुरक्षा ,१५ हजार दुष्काळग्रस्त जिल्यातील शेतकर्याना शिक्षण सवलतीसह नव्याने शेतकऱ्यांच्या तणावाला कमी करण्यासाठी विस्तारीत उपाय योजना सरकारला सादर केल्या असुन प्रत्येक शेतकरी आम्ह्त्यांच्या कारणाचा मुळात स्वतः मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस जात असल्यामुळे या शेतकरी मिशन मार्फत ग्रामीण भागातील प्रशासन व कृषी संकटाच्या मुळात जाऊन उपाय सुचविण्याची संधी  समाजाच्या चिंतनशील  घटकाला असुन त्यांनी आपले योगदान द्यावे अशी विनंती  मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी केली आहे .
====================================

No comments:

Post a Comment