Tuesday, December 26, 2017

सर्व वाघग्रस्तांना वनखात्यामार्फत गॅस कनेक्शन देणार -घुबडहेटी कोलाम पोडावर किशोर तिवारी यांची घोषणा

सर्व वाघग्रस्तांना वनखात्यामार्फत गॅस कनेक्शन देणार  -घुबडहेटी कोलाम पोडावर किशोर तिवारी यांची घोषणा 
दिनांक -२६ डिसेंबर २०१७
राळेगाव तालुक्यातील वरध   परीसरातील घुबडहेटी व सुभानहेटी येथील   कोलाम कुटुंबाना तात्काळ उज्वला योजनेमध्ये वनखात्यामार्फत गॅस कनेक्शन देण्याची घोषणा कै वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष  किशोर तिवारी यांनी घुबडहेटी  येथे आयोजित सरकार आपल्या दारी कार्यक्रमात केली . या परीसरात नरभक्षक वाघामुळे एकामागोमाग बळी जात असतांना कोलामांच्या अन्न, वस्त्र ,निवारा ,रोजगार,जमिनीचे पट्टे ,पेसामधील अधिकार ,आरोग्य सेवा यासाठी आयोजित जनतादरबारीमध्ये यवतमाळ विभागाचे मुख्य वन्य संरक्षक चव्हाण साहेब यांनी यावेळी या वाघाचा निर्मुलन करण्यासाठी परवानगीची कारवाई युद्ध स्तरावर   करण्यात आली असुन लवकरच याचा नायनाट करण्यात येणार असल्याची दिलासा देणारी माहीती यावेळी दिली . या कार्यक्रमाला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ चव्हाण ,जिल्हा पुरवडा अधिकारी भराडी साहेब ,जिल्हा कृषी अधिकारी नवनाथ कोलपकर , उपविभागीय अधिकारी संदीप अपार , गटविकास अधिकारी खेडकर , तहसीलदार हेमंत गांगुर्डे ,जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी वानखेडेसाहेब तसेच वीज ,प्रकल्प ,पोलीस विभागाचे अधिकारी या दुर्मीळ कोलाम पोडावर जातीने उपस्थित होते . 
घुबडहेटी ते सुभानहेटी हा रस्ता ठक्करबाबा योजनेमध्ये जोडण्याची तसेच  घुबडहेटीला विषेय पाईप लाईन टाकुन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली . 
घुबडहेटी व  सुभानहेटी हे कोलमपोड कोलाम घरकुल योजनेपासुन वंचित असल्याची तक्रार यावेळी सदाशिव अस्वले ,कवडू रामगडे ,रामभाऊ खंगारे यांनी यावेळी केली तर अख्ख्या यवतमाळ जिल्हालाच आदिवासी विभागांनी फक्त ५०७ घरकुल दिल्याची माहीती यावेळी जिल्हा ग्रामीण विकास संस्थेच्या अधिकाऱ्यांनी दिली यावेळी किशोर तिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेस समोर मांडण्याची हमी दिली व २०१९ पुर्वी सर्व कोलामांना घरकुल देण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेची माहीती कोलामाना दिली . 
यावेळी वरध येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आजारी असल्याची तक्रार सरपंच सदाशिव महाजन यांनी केली व रुग्णवाहिका कधीच जनतेच्या कमी पडत नसल्याची माहीती सुद्धा यावेळी देण्यात आली यातच प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर यवतमाळ वरून उपचार करतात अशी माहीती पंचायत समितीचे उपसभापतींनी दिल्यावर जिल्हा आरोग्य अधिकारी चवं यांनी कारवाई करण्याचे संकेत यावेळी दिले . 
कोलाम पोडावर उच्चंन्यायालयाच्या आदेशानंतरही कोलाम अन्न सुरक्षेत नसल्याचे प्रकरणसमोर आल्यानंतर सर्व कोलाम कुटुंबाना तात्काळ अन्न सुरक्षेत घेण्याची घोषणा जिल्हा पुरवडा अधिकारी भराडी यावेळी केली . 
या  कार्यक्रमाला आदिवासी नेते भोनुजी टेकाम ,अंकित नैताम ,लेतु जुनघरे ,सामाजिक कार्यकर्ते विजयराव तेलंगे ,बबनराव राळे ,अशोकराव केवटे ,प्रफुल जिड्डेवार ,भीमराव नैताम सह परीसरातील आदीवासी व शेतकरी मोठ्याप्रमाणात उपस्थित होते . 






No comments:

Post a Comment