Friday, March 30, 2018

येत्या खरीप हंगामात अमरावती जिल्ह्यात २ हजार कोटीचे कर्ज वाटप व "मागेल त्याला पीक कर्ज " योजना मिशन मोडमध्ये राबविणार -शेतकरी मिशनच्या आढावा बैठकीत निर्णय

येत्या खरीप हंगामात अमरावती जिल्ह्यात २ हजार कोटीचे कर्ज वाटप व "मागेल त्याला पीक कर्ज " योजना मिशन मोडमध्ये  राबविणार -शेतकरी मिशनच्या आढावा बैठकीत निर्णय 
दिनांक - ३० मार्च २०१८
यावर्षी २००१ पासुन थकीत कृषीकर्जाला त्यामध्ये पिक कर्ज व सर्व मध्यम मुदतीचे शेतीसाठी घेतलेले कर्जाचा समावेश असल्यामुळे ९० टक्के कर्जबाजारी व अडचणीत असलेले शेतकऱ्यांना बँकांची दरवाजे पुन्हा उघडण्यात आली असुन आता यासर्व शेतकऱ्यांना नवीन पत  पुरवडा १ एप्रिल पासून सुरु करण्याचा व "मागेल त्याला पीक कर्ज " योजना मिशन मोडमध्ये राबविण्याचा महत्वाचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यलयात आयोजित कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनच्या खरीप हंगाम आढावा बैठकीत घेण्यात आला . या बैठकीला कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी ,विभागीय आयुक्त पीयूषसिंग ,जिल्हाधिकारी अभिजित बांगर , मुख्य कार्यपालन अधिकारी मनीषा खत्री उप संचालक कृषी नागरे  उप संचालक आरोग्य नितीन आंबडेकर   जिल्हा कृषी अधिकारी अनिल खर्चानं यासह आरोग्य ,वन ,वीज वितरण ,महसूल ,अन्न पुरवडा ,आदिवासी विकास, शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते . 
यावर्षी सरकारने शेतकऱ्यांवरील थकीत झालेले २००१ पासुन जून  २०१७ पर्यंतचे सर्व पिक कर्ज व सर्व मध्यम मुदतीचे शेतीसाठी घेतलेले दीड लाखपर्यंतचे कर्ज बँकांना दिले असुन आता आजच्या पिकाप्रमाणे प्रति हेक्टरी पत मर्यादेप्रमाणे पिक कर्ज वाटप करणे अत्यंत आवश्यक असुन यासाठी जिल्हा बँकर समितीने दोन हजार कोटीचे लक्ष निर्धारीत केले असुन त्याप्रमाणे " मागेल त्याला पीककर्ज " योजना सुरु करण्याची व बँकांनी सरकारच्या कर्ज माफीमध्ये न आलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरकारला दिलेल्या सवलती प्रमाणे फायदा देऊन नवीन पत पुरवडा करावा असा आदेश किशोर तिवारी यांनी यावेळी दिला . मागील २००८च्या कृषी कर्ज माफीमध्ये बँकांनी आपले खिसे भरले मात्र शेतकऱ्यांना नवीन  पत पुरवडा सुरु केला नाही हा प्रकार यावेळी होणार नाही यासाठी सर्व प्रशासनाने शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी नवीन पिक कर्ज वाटप होणार याची जबाबदारी घ्यावी अशा सूचनाही तिवारी यांनी यावेळी दिल्या  . 
सरकारी बँका कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांच्या यादी आपल्या बँकांच्या दर्शनी भागात लावत नसुन शेतकऱ्यांना माहीती देण्यासही नकार देत असल्याच्या प्रचंड तक्रारी वर विभागीय आयुक्त पीयुष सिंग यांनी नाराजी दाखवत सर्व बँकांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या रकमेसह यादी लावाव्या व खरीप हंगामासाठी १ एप्रिल पासुन पीककर्ज वाटप सुरु झाले असल्याचे फलक लावण्याचे आदेश यावेळी दिले . 
सध्या येत असलेल्या तक्रारी प्रमाणे शेतकऱ्यांची तूर मंदीच्या नावावर तीन  हजार पाचशे ते चार हजार रुपये क्विंटल या पडेल भावात घ्यावी व अधिकाऱ्यांच्या संगनमताने या खाजगी व्यापाऱ्यांची तूर सरकारी नाफेडच्या खरेदीमध्ये विकण्यात येत असल्याच्या प्रकारावर किशोर तिवारी यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली तसेच या मागील दोन वर्षांपासून राजरोसपणे सुरु असलेला धंदा बंद करण्यासाठी सरकारने सुरु केलेली पारदर्शक ऑन पद्धती सुरु केल्यांनतर आता शेतकऱ्यांकडून सातबारे गोळाकडून त्यांच्या नावावर नाफेडच्या खरेदी केंद्रावर हमीभाव ५ हजार चारशे दराने हेच व्यापारी विकत असल्याने  शेतकऱ्यांनी या व्यापाऱ्यांना आपला सातबारा वापर करू देऊ नये अशी विनंती  किशोर तिवारी यांनी केली व  जे व्यापारी व अधिकारी - कर्मचारी अशा प्रकारे त्यांनी माहीती शेतकरी मिशन द्यावी असे आवाहन केले आहे. 
प्रत्येक जिल्हापरिषद ब्लॉक मध्ये एक शेतकरी उत्पादक संस्था ,त्याला जोडलेले प्रत्येक गावाचे शेतकरी गट व ब्लॉकप्रमाणे कृषी कॅल्स्टर निर्माण करण्याची व यासर्व शेतकरी उत्पादक संस्थाचा जिल्हा स्तरीय फेडरेशन स्थापन करण्यात यावा व त्याला प्रक्रिया व बाजार उपलब्ध करण्यासाठी निधी देण्याच्या विविध योजनांचा सुरवात करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला . 
अचलपूर व मोर्शी येथे डायलिसीस सुविधा तात्काळ नाविन्यपूर्ण योजनेत सुरु करण्याचा निर्णय यावेळी जिल्हाधिकारी अभिजित बांगर घेतला व आरोग्य विभागाच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी तात्काळ प्रस्ताव देण्याचे आदेश यावेळी दिले . 
=========================================

No comments:

Post a Comment