Monday, June 20, 2016

२०१२-१४च्या थकबाकीदार शेतकऱ्यांचे पीककर्जाचे पुनर्वसनाचे आदेशासह ग्रामीण व सहकारी बँकेला निधी विलंबामुळे विदर्भ व मराठवाड्याचे ३० लाख दुष्काळग्रस्त शेतकरी अडचणीत -किशोर तिवारी


 २०१२-१४च्या थकबाकीदार शेतकऱ्यांचे  पीककर्जाचे पुनर्वसनाचे आदेशासह ग्रामीण व सहकारी बँकेला निधी  विलंबामुळे विदर्भ व मराठवाड्याचे ३० लाख दुष्काळग्रस्त  शेतकरी अडचणीत -किशोर तिवारी 

दिनाक २० जुन २०१६
कर्जबाजारीपणामुळे होणाऱ्या शेतकरी आत्महत्या लक्षात घेता किमान ८० टक्के शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या कक्षेत आणण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरीप आढावा बैठकीत २८ एप्रिलला  केली होती व तसा  २०१२-१४च्या थकबाकीदार शेतकऱ्यांचे  पीककर्जाचे पुनर्वसनाचा प्रस्ताव तात्काळ रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्याकडे सादर  केला होता मात्र रिझर्व्ह बँकेने या प्रस्तावाला मंजुरी न दिल्यामुळे  व तसेच मराठवाड्यात अग्रणी असलेल्या ग्रामीण बँकेला व राज्यातील सहकारी बँकांना पीककर्ज वाटपासाठी लागणारा निधी आजपर्यंत उपलब्ध न झाल्यामुळे यावर्षी वरुण राजाने कृपाकेल्यानंतरही  शेतकऱ्यांच्या आत्महत्या ,दुष्काळ यांच्या गंभीरता व संवेदनानसणाऱ्या प्रशासकीय व्यवस्थेमुळे विदर्भ व मराठवाड्याचे ३० लाख दुष्काळग्रस्त  शेतकरी  प्रचंड अडचणीत आले असुन  पीक कर्जाची पुनर्रचना झाल्याने राज्यातील शेतकऱ्यांना नवे कर्ज उपलब्ध होऊ शकत नसल्याची स्थिती असून, त्यामुळे शेतकऱ्यांना सावकारांकडे हात पसरावे लागत आहेत  या अभुतपुर्व   संकटातून शेतकर्याना दिलासा देण्यासाठी शेतकरी मिशनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा साकडे घातले असुन यावर येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होणार असा विश्वास शेतकरी मिशनचे प्रमुख किशोर तिवारी यांनी व्यक्त केला आहे . 


सरकारने  किमान ८० टक्के शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या कक्षेत यावे यासाठी राज्यात सतत २०१२ पासून नापिकी व दुष्काळ यामुळे कृषी संकट फारच कठीण होत असल्यामुळे राज्यातील २०१२ पासूनच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना नव्या पीक कर्जासाठी थकित कर्जाचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेऊन व रिझर्व्ह बँकेने हा प्रस्ताव तात्काळ मंजूर करावा अशी आग्रही विनंती केली होती  मात्र आजपर्यंत  रिझर्व्ह बँकेने राज्यातील२०१२ पासूनच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना नव्या पीक कर्जाच्या कक्षेत घेण्याचे व १४ जिल्हातील दुष्काळग्रस्त व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिलेला नाही . या रिझर्व्ह बँकेच्या विलंबामुळे राज्यातील २०१२ पासूनच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना सावकाराच्या दारावर जाण्याची वेळ आली आहे .  
यापुर्वी शेतकरी मिशनच्या वतीने रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांना निवेदन देण्यात आले असून, त्यात शेतकरी कर्जबाजारीपणामुळे होणाऱ्या आत्महत्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. त्यात मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी नमूद केले आहे की, कर्जबाजारीपणामुळे होणाऱ्या शेतकरी आत्महत्या लक्षात घेता किमान ८० टक्के शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या कक्षेत आणण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यात २०१२-१३ च्या हंगामापासून थकबाकीदार असल्याने पीक कर्जाची पुनर्रचना झालेल्या शेतकऱ्यांचा समावेश आहे. पीक कर्जाची पुनर्रचना झाल्याने राज्यातील शेतकऱ्यांना नवे कर्ज उपलब्ध होऊ शकत नसल्याची स्थिती असून, त्यामुळे शेतकऱ्यांना सावकारांकडे हात पसरावे लागत आहेत. अशा शेतकऱ्यांच्या कर्जाची पुनर्रचना करण्याची परवानगी रिझर्व्ह बँकेने बँकांना द्यावी, असा प्रस्ताव राज्य शासनाच्या वतीने रिझर्व्ह बँकेला सादर केला आहे. मात्र, रिझर्व्ह बँकेने अद्याप त्यावर विचार करून आदेश जारी केलेले नसल्याने सार्वजनिक क्षेत्रातील बँका हात आखडता घेत आहेत, याकडे तिवारी यांनी लक्ष वेधले. 
राज्यात एक कोटी ३६ लाख ४३ हजार खातेदार शेतकरी असून, सरकारने त्यापैकी किमान ८० टक्के शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या कक्षेत आणण्याची घोषणा केली आहे. राज्यस्तरीय बँकर्स कमिटीने आगामी वर्षासाठी ५१ हजार २३५ कोटींच्या कर्ज वाटपाचे लक्ष्य निश्चित केले असून, त्यापैकी मे अखेर १६ हजार २३ कोटीं रुपयाचे पिककर्जाचे नेमके वाटप झाले अाहेयावर किशोर तिवारी यांनी चिंता व्यक्त केली आहे
================================

No comments:

Post a Comment