Wednesday, June 29, 2016

यवतमाळ जिल्यातील खैरी-धरमगोटा कोलम पोडावर १ जुलैला "सरकार आपल्या दारी" अभियान

केळापूर  तालुक्यातील  खैरी-धरमगोटा   कोलम पोडावर  १ जुलैला शेतकरी मिशनचा  "सरकार आपल्या दारी" कार्यक्रम
दिनांक ३० जुन २०१६ 
यवतमाळ जिल्यातील शेकडो कोलम पोडावर घरकुल ,शुद्ध पिण्याचेपाणी,उच्चन्यायालयाच्या  आदेशानंतर अंत्योदय अन्न  सुरक्षा योजनेचा लाभ ,तसेच आदीम काळापासून शेती करीत असलेल्या कोलम बांधवाना आज पर्यंत जमिनीचे मालकी हक्क मिळाले नसल्यामुळे व मागील २० वर्षांपासून आदीम आदिवासी जमातीला आलेल्या भारत सरकारच्या विविध योजनाचा लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी शेतकरी मिशनला दररोज मिळत असल्यामुळे जिल्यातील सर्व कोलम पोडावर सरकार आपल्या दारी हा कार्यक्रम राबविण्यात येत असुन यापुर्वी घोन्सी ,नांदगाव ,वांजरी ,पळसकुंड,डोंगरगाव ,मंगी  कोलम पोडावर कार्यक्रम झाल्यानंतर आता १ जुलैला केळापुर  तालुक्यातील खैरी -धरमगोटा कोलम पोडावर सरकार आपल्या दारी हा कार्यक्रम घेण्यात  येणार असल्याची माहिती शेतकरी मिशनचे अध्क्षश किशोर तिवारी यांनी दिली
शेतकऱ्यांच्या खरीप हंगाम तोंडवर आल्यावर आता नवीन पिककर्ज ,ग्रामीण जनतेला काम ,अन्न ,आरोग्य ,गुरांना चारा व पाणी यासह वीज वितरण ,शिक्षण ,प्रकल्पग्रस्तांचे अनेक  प्रश्न यांना सरकार ,प्रशासन ,लोक प्रतिनिधी व सामाजिक संस्था यांच्या पुढाकाराने केळापुर  तालुक्यातील खैरी -धरमगोटा कोलम पोडावर आता १ जुलैला  शेतकरी मिशनचा  "सरकार आपल्या दारी" कार्यक्रम हा कार्यक्रम कै वसंतराव नाईक शेतकरी  मिशनने आयोजित केला आहे या कार्यक्रमाला प्रशासनकडून जिल्हाधिकारी सिंगसाहेब ,प्रकल्प अधिकारी मिनासाहेब  सह  महसूल , कृषी ,ग्रामविकास ,वीज वितरण ,अन्न पुरवठा ,आरोग्य ,रोजगार ,शिक्षण , पोलीस प्रशासन यांच्या विभागाच्या  तालुका व  ग्रामस्तरीय अधिकारी -कर्मचारी उपस्थित राहणार असुन या भागातील लोकप्रिय आमदार प्रा .राजूभाऊ तोडसाम  यांचेसह सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सद्यस तसेच सर्व सरपंच व ग्रामपंचायतीचे  सद्यस यांना सादर आमंत्रित करण्यात आले असुन ,ग्रामीण जनतेनी आपल्या सर्व अडचणी व सरकारी योजनामध्ये होणाऱ्या गैरप्रकार समोर आणण्याकरिता कार्यक्रमात सहभागी होण्याचे  आवाहन शेतकरी मिशनचे अध्क्षश किशोर तिवारी यांनी केली आहे   
मा . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सूचनेनुसार "सरकार आपल्या दारी" या कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण भागातील महसूल , कृषी ,ग्रामविकास ,वीज वितरण ,अन्न पुरवठा ,आरोग्य ,रोजगार ,शिक्षण , पोलीस प्रशासन यांच्या विभागाच्या  तालुका व  ग्रामस्तरीय अधिकारी -कर्मचारी यांच्या तक्रारीची सुनावणी व  जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांकडून  समाधान व कारवाई साठी अधिकारी -कर्मचारी चेतना जागृती अभियानाचा एक भाग म्हणून  केळापुर  तालुक्यातील खैरी -धरमगोटा कोलम पोडावर आता १ जुलैला   जनसुनावणी ठेवण्यात आली आहे . तरी परिसरातील आदीवासी ,दलीत ,शेतकरी ,शेतमजुर  बांधवांनी आपल्या तक्रारी आण्याव्यात असे आवाहन शेतकरी मिशनचे अध्क्षश किशोर तिवारी यांनी केली आहे 

No comments:

Post a Comment