Wednesday, June 1, 2016

विदर्भातील युनियन बँका येत्या १५ दिवसात पिककर्ज वाटप :क्षेत्रीय प्रमुख पी के दास यांचे शेतकरी मिशनला आश्वासन

विदर्भातील  युनियन बँका येत्या १५ दिवसात पिककर्ज वाटप :क्षेत्रीय प्रमुख पी के दास यांचे शेतकरी मिशनला  आश्वासन   

दिनांक : १ जून २०१६
पिककर्ज  पुनर्गठण करून नवीन पिककर्ज देण्यास  क्षेत्रीय कार्यालयातून आदेश आले नाही अशी माहिती देवून शेतकऱ्यांचा  युनियन बँकांचे यवतमाळ जिल्हातील महागाव ,पुसद ,नेर ,उमरखेड व दारव्हा तालुक्यातील  शाखांचे अधिकारी नव्याने कर्ज वाटप केले नसल्याची तक्रार शेतकर्‍यांनी केल्यावर वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी नागपुर येथे युनियन बँकेच्या क्षेत्रीय कार्यालयावर थेट क्षेत्रीय प्रमुख पी के दास यांचेशी चर्चा केल्यावर यवतमाळ जिल्हातील महागाव ,पुसद ,नेर ,उमरखेड व दारव्हा येथील शाखांचे अधिकारयाना तात्काळ  शेतकर्‍यांच्या कर्जाचे पुनर्गठण आदेश आपण  दिले असुन जर युद्धस्तरावर  थकबाकीदार झालेल्या शेतकर्‍यांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्यास कर्मचारी कमी पडत असल्यास युनियन बँकेच्या क्षेत्रीय कार्यालयातुन कर्मचारी देण्याचे आश्वासन क्षेत्रीय प्रमुख पी के दास यांनी दिले यावेळी कृषी पत पुरवडा प्रबंधक हरिभाऊ कोगदे ,भटाचार्य, प्रबंधक बाबासाहेब गावंडे  उपस्थित होते . 
किशोर तिवारी यांनी युनियन बँकांमध्ये कर्ज मागण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍यांना तेथील अधिकारी व कर्मचार्‍यांकडून उर्मट वागणूक मिळत असल्याच्या जिल्हाभरातून तक्रारी आहे. कर्ज मागणार्‍या शेतकर्‍यांकडे कायमच 'थकबाकीदार' या नजरेतून पाहिले जाते. सातबारा देऊनही शेतकर्‍यांना हीन वागणूक देण्याचे प्रकार सुरू आहे.  मात्र प्रशासनाने गावे जोडून दिल्याने शेतकर्‍यांना नाईलाजाने राष्ट्रीयकृत बँकांची पायरी चढावी लागत असल्याची अनेक शेतकर्‍यांची भावना  बोलून दाखविली व  सहकारी बँकांमधील शेतकर्‍यांच्या कर्जाचे पुनर्गठण पूर्णत्वाकडे असले तरी राष्ट्रीयकृत बँकांना या पुनर्गठणाचे अद्याप आदेशच प्राप्त झाले नाही अशी बतावणी करीत असल्याची तक्रारही तिवारी यांनी केली . 
युनियन बँकेचे क्षेत्रीय प्रमुख पी के दास यांनी नेर तालुक्यातील मंगलादेवी येथील शाखेत तात्काळ फोन लाऊन संपर्क करून शेतकर्‍यांच्या कर्जाचे पुनर्गठण का थांबले आहे अशी विचारणा शाखा प्रमुखास केल्यावर आपण ५०० वर शेतकऱ्यांचे अर्ज घेतले असुन आज पासुन वाटप सुरु करीत असल्याचे सांगीतले त्यावेळी क्षेत्रीय प्रमुख पी के दास यांनी येत्या १५ दिवसात सर्व शेतकर्याना पिककर्ज वाटप करण्याचे आदेश दीले य़ेत्या आठवड्यात  मंगलादेवी सुलभ पिककर्ज वाटप मेळावा घेण्याची घोषणा सुद्धा  क्षेत्रीय प्रमुख पी के दास यांनी यावेळी केली . 
युनियन बँकांचे यवतमाळ जिल्हातील महागाव ,पुसद ,नेर ,उमरखेड व दारव्हा तालुक्यातील  शाखांमध्ये बँकांनी कर्ज सहायक नियुक्त केल्यामुळे पीककर्ज वाटपात भ्रष्टाचार होत असल्याची गंभीर तक्रार शेतकऱ्यांची असल्याची माहीती किशोर तिवारी यांनी क्षेत्रीय प्रमुख पी के दास यांना दिली असे असल्यास शेतकऱ्यांनी आपणास आपल्या मोबाईल नंबर -८८८८८४१६७६ वर तक्रार करण्याचे आवाहन केले . 
शेतकरी मिशन या आठवड्यात सर्वच सरकारी बँकांचा क्षेत्रीय अधिकाऱ्यांना भेटणार असुन शेतकरी वाचविण्यासाठी आपल्या बँकांना नव्याने पिककर्ज देण्यास बाध्य करण्यासाठी साकडे टाकणार असल्याची माहीती  वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिली . No comments:

Post a Comment